Nashik Crime News : सटाणा, ताहाराबाद व मालेगाव परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून अवैध वृक्षतोड करून बिनबोभाट वाहतूक केली जात असल्याची बाब लक्षात घेऊन वनविभागाने विशेष पथकाकडून जागता पहारा सुरू केला आहे.
अवैध लाकूड वाहतूक रडारवर असल्याने अनेक वाहने वनविभागाच्या पथकाने जप्त केली आहेत. (Vigilance by forest department team on illegal felling trees nashik crime news)
वनविभागाकडून होत असलेल्या कारवाईमुळे अवैध लाकूड वाहतूकदारांचे मात्र धाबे दणाणले आहे. शासनाकडून जागोजागी वृक्षारोपणासाठी विविध उपक्रम राबवित असतानादेखील मालेगाव, सटाणा व ताहाराबाद परिसरात काही लोकांना हाताशी धरून छुप्या पध्दतीने अवैध वृक्षतोड करून बिनबोभाट वाहतूक केली जात होती. वृक्षतोड विरोधात काही वृक्षप्रेंमींकडूनही आवाज उठविण्याचा प्रयत्न केला होता.
पुर्वी या भागात मोठमोठे झाडे तसेच जंगल हिरवीगार दिसत होते कालांतराने अवैध वृक्षतोड झपाट्याने केली केली यामुळे बहुतांश भागातील जंगल बोडकी होत गेली. आता अवैध वृक्षतोड वनविभागाच्या रडारवर असल्याने सटाणा वनपरिक्षेत्रातील आवारात एका ट्रकवर कारवाई करण्यात आली तर मालेगाव येथील कार्यालयाच्या आवारात सात ते आठ वाहनांवर कारवाई करीत जप्त करण्यात आली आहेत.
ताहाराबाद येथील वनविभागाच्या ताब्यात आजमितीस एकही लाकडाचे वाहन आवारात दिसून आले नाही. वनविभागाने सुरू केलेल्या या कारवाईबाबत वृक्षप्रेंमींकडून कौतुक होत आहे. शेतातील शेतकऱ्यांना झाडांची अडचण असतील तर रितसर परवानगी घेऊन झाडे तोडावे असेही आवाहन वनविभागाकडून करण्यात आले आहे.
पोलिसदादा कुठे..?
रस्त्यावरील वाहतूक नियंत्रण व तपासणीचे काम पोलिसांकडून केले जात असते मात्र पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले जात असून पोलिसांनी गस्त वाढवून भुरट्या चो-या व वाहन तपासणीनंतर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
''मालेगाव वनक्षेत्रात अधिकारी कर्मचारी यांचे सह गस्त करत असताना अवैध लाकूड वाहतुक करणाऱ्या वाहनावर जप्तीची कारवाई करण्यात आलेली आहे. वन कायद्याच्या तरतुदी भंग केले प्रकरणी संबधितांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून दंडात्मक कारवाई करण्यात येईल. यापुढे देखील गोपनीय माहिती घेवून विशेष गस्तीच्या नेमणूक करून अश्या प्रकारे कारवाया करण्यात येतील.'' -वैभव हिरे, वनपरिक्षेत्र आधिकारी मालेगाव प्रादेशिक.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.