Nashik Crime News : बीट मार्शलच्या सतर्कतेने चोरीतील मुद्देमाल हस्तगत

goods seized of theft from two-wheeler
goods seized of theft from two-wheeleresakal
Updated on

जुने नाशिक : भद्रकाली पोलिस ठाण्याच्या बीट मार्शलच्या सतर्कतेने अमरावती कोल्हापुरी गेट पोलिस ठाणे हद्दीतील मंदिर आणि घरात झालेली चोरी उघडकीस आणली आहे. संशयितांकडील चोरीच्या दुचाकीच्या डिक्कीतून चोरीचा लाखांचा ऐवज हस्तगत करण्यात आला. (Vigilance of beat marshall seizes stolen goods Nashik Latest Crime News)

goods seized of theft from two-wheeler
Nashik : अर्चित बिल्डरचे अतिक्रमित बांधकाम तोडण्यास सुरवात

संशयित चोरीच्या दुचाकीवरून (एमएच- २९- एयू- ९८९१) पंचवटीच्या दिशेने जात होते. दुचाकी बंद पडल्याने ते कन्नमवार पुलाजवळ थांबले. दरम्यान, महात्मा फुले बीट मार्शल विकी रुमणे आणि उत्तम खरपडे पुलाच्या वरच्या दिशेने येत असताना त्यांनी सायरन वाजविला.

आवाज ऐकून संशयितांनी दुचाकी सोडून पळ काढला. बीट मार्शल दुचाकी घेऊन पोलिस आले. वरिष्ठ निरीक्षक दत्ता पवार यांना याबाबत माहिती दिली. विकी रुमणे, दया सोनवणे आणि उत्तम खरपडे यांनी दुचाकीच्या क्रमांकावरून मालकाचा शोध घेतला. सारंग लाटेकर (रा. विठ्ठलनगर, अकोला रोड अमरावती) यांची दुचाकी असल्याचे निष्पन्न झाले.

goods seized of theft from two-wheeler
Nashik | सार्वजनिक जीवनात आमदारांचं हे वागणं बरं नव्हं : पालकमंत्री भुसे देणार खोसकरांना सल्ला

त्यांची अधिक चौकशी केली, असता बुधवार (ता. २) त्यांच्या घरातून रोख रक्कम, सोन्याची पोत चोरी झाली होती. तसेच, त्यांची दुचाकीदेखील चोरली होती. तत्पूर्वी त्यांनी गावातील मंदिरातील काही वस्तू आणि दानपेटी फोडून रोख रक्कम चांदीचे कॉइन चोरले होते. त्यासाठी वापरलेल्या दुचाकीचे पेट्रोल संपल्याने श्री. लाठेकर यांच्या घराजवळ सोडली. त्यानंतर त्यांच्या घरात चोरी करून त्यांची दुचाकी पळविली.

याबाबत कोल्हापुरी गेट पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असल्याची माहिती उघड झाली. त्यावरून दुचाकीच्या डिक्कीची तपासणी केली असता, रोख रक्कम, चांदीचे कॉइन, निरंजनी सोन्याची पोत, दोन आयफोन, दोन सॅमसंगचे स्मार्टफोन यासह अन्य विविध वस्तू मिळून आल्या.

goods seized of theft from two-wheeler
Dada Bhuse | मालेगाव गटविकास अधिकाऱ्यास सक्तीच्या रजेवर पाठवा : पालकमंत्री भुसे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.