Nashik News : आगामी गणेशोत्सव, ईद-ए-मिलाद यासह सणउत्सवांच्या पार्श्वभूमीवर कोठेही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू नये, यासाठी कडेकोट पोलीस बंदोबस्ताचे नियोजन करण्यासह दक्षता बाळगावी यासाठीच्या सूचना अपर पोलीस महासंचालक डॉ. रवींद्र कुमार सिंगल यांनी दिल्या. (vigilant in wake of upcoming festivals Strict security planning expected Notice at scope review meeting Nashik News)
गंगापूर रोडवरील पोलीस आयुक्तालयात नाशिक परिक्षेत्राची आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर डॉ. सिंगल यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये बैठक घेण्यात आली.
या बैठकीला परिक्षेत्राचे विशेेष पोलीस महानिरीक्षक बी.जी. शेखर-पाटील, नाशिकचे पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, नाशिक ग्रामीणचे अधीक्षक शहाजी उमाप, जळगावचे अधीक्षक एम. राजकुमार, धुळ्याचे अधीक्षक संजय बारकुंड, नंदूरबारचे अधीक्षक पी.आर. पाटील यांची उपस्थिती होती.
तर, अहमदनगरचे अधीक्षक राकेश ओला हे व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे उपस्थित होते. प्रारंभी, जिल्हा पोलीस अधीक्षकांकडून आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या पोलीस नियोजन व बंदोबस्ताची माहिती देण्यात आली.
तसेच, यंदाच्या गणेशोत्सवात शहर-जिल्ह्यांमध्ये सुरू असलेल्या तयारीचाही आढावा घेतला. त्याचप्रमाणे, सणउत्सवांमध्ये कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांकडून सुरू असलेल्या प्रतिबंधात्मक कारवाईचीही माहिती यावेळी घेण्यात आली.
यावेळी अपर पोलीस महासंचालक डॉ. सिंगल यांनी, आगामी सणसमारंभाच्या काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी कडेकोट पोलीस बंदोबस्तासह प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याच्या सूचना देत, परिक्षेत्रात करण्यात आलेल्या नियोजनाबाबत समाधान व्यक्त केले.
गणेश विसर्जन मिरवणुक नियोजित वेळेत पूर्ण करण्यासाठी मंडळांशी सुसंवाद राखून मिरवणुकीत अंतर राहणार नाही याची काळजी घ्यावी. जादा पोलीस बंदोबस्त तैनात करताना त्यांचे नियोजन करावे.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
बंदोबस्तावरील पोलिसांवर अतिरिक्त ताण येऊ नये, त्यांना वेळेवर फुडपॅकेट मिळतील याची व्यवस्था करावी, मिरवणूक मार्गांवर सीसीटीव्ही कॅमेरे बसवून त्यांची बारकाईने मॉनिटेरिंग करावी, तसेच उत्सव काळात होणाऱ्या गर्दीवर निगराणी ठेवण्यासाठी ड्रोनचा वापर करावा, साेशल मीडियावर वॉच ठेवून आक्षेपार्ह संदेश व्हायरल होऊन सामाजिक सलाेखा बिघडण्याची शक्यता असते, त्याबाबत सायबर सेलने दक्षता बाळगावी यासह विविध सूचना डॉ. सिंगल यांनी केल्या.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सूचना
- सामाजिक सलोखा कायम राखण्यासाठी मंडळांशी सुसंवाद
- जादा पोलीस बंदोबस्तासह होमगार्डस्ची मदत
- प्रतिबंधात्मक कारवाई करावी
- डीजे वाजविण्याविरोधात मंडळांची जनजागृती करावी
- विसर्जन मिरवणूक मार्गांवर सीसीटीव्ही कॅमेरे बसवावे
- उत्सव काळात गर्दीवर ड्रोनद्वारे करावी निगराणी
- मिरवणुकीच्या प्रत्येक हालचालीवर बारकाईने लक्ष ठेवावे
- कडेकोट पोलीस बंदोबस्ताची दक्षता घ्यावी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.