Nashik BJP News: भाजप राबविणार महाजनसंपर्क अभियान : विजय चौधरी

Vijay Chaudhary, Ravi Anaspure, Raghunath Kulkarni, Kripashankar Singh, Ajay Bhole, Sachin Panpatil, Sunil Bachhao, Laxman Savji etc. on the occasion of North Maharashtra Extension Workshop.
Vijay Chaudhary, Ravi Anaspure, Raghunath Kulkarni, Kripashankar Singh, Ajay Bhole, Sachin Panpatil, Sunil Bachhao, Laxman Savji etc. on the occasion of North Maharashtra Extension Workshop.esakal
Updated on

Nashik BJP News : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून महाजनसंपर्क अभियान राबविले जाणार आहे. उत्तर महाराष्ट्र विस्तारकांच्या कार्यशाळेत पक्षाचे प्रदेश महामंत्री विजय चौधरी यांनी माहिती दिली.

भाजप वसंतस्मृती कार्यालयात लोकसभा व विधानसभा विस्तारकांची कार्यशाळा झाली. या वेळी ते बोलत होते.

व्यासपीठावर उत्तर महाराष्ट्र संघटन महामंत्री रवी अनासपुरे, महाराष्ट्र प्रदेश विस्तारक योजनेचे पालक रघुनाथ कुलकर्णी, प्रदेश विस्तारक योजनेचे संयोजक कृपाशंकर सिंह, भाजप प्रदेश सचिव अजय भोळे, सचिन पानपाटील, जिल्हाध्यक्ष सुनील बच्छाव, प्रदेश प्रवक्ते लक्ष्मण सावजी आदी उपस्थित होते. (Vijay Chaudhary statement BJP to implement Mahajansampark campaign nashik political)

या वेळी बोलताना चौधरी म्हणाले, की बूथ रचना सक्षम झाली पाहिजे. यासाठी पदाधिकाऱ्यांनी झोकून काम करावे. समाजातील सर्व घटकांची सर्वसमावेशक बूथ रचना करावी. बूथ समितीतील पदाधिकारी व लोकसभा, विधानसभा विस्तारक यांच्यातील सुसंवाद वाढावा.

श्री. कुलकर्णी म्हणाले, विस्तारक ज्या क्षेत्रात कार्यरत असतील, त्याच्या क्षेत्रातील प्रदेश जिल्हा व मंडल पदाधिकाऱ्यांबरोबरच शक्ती केंद्रप्रमुख व बूथ समित्यांचा ही परिचय करून घ्यावा. त्यायोगे महाजन संपर्क अभियानास आपोआपच गती मिळेल.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Vijay Chaudhary, Ravi Anaspure, Raghunath Kulkarni, Kripashankar Singh, Ajay Bhole, Sachin Panpatil, Sunil Bachhao, Laxman Savji etc. on the occasion of North Maharashtra Extension Workshop.
Nagar BJP News: भाजपचा 'हा' जेष्ठ नेता पोलिसांच्या ताब्यात, एक कोटी चौदा लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी कारवाई

कृपाशंकर सिंह म्हणाले, विस्तारकांनी पूर्णवेळ कार्यकर्ता म्हणून काम करावे. यासाठी प्रत्येक दिवशी नियोजन करावे व महत्त्वाच्या कामांचा रोड मॅप करावा. प्रवासाला जाण्याआधी त्या, त्या भागातील भौगोलिक रचनेचा अभ्यास व त्या, त्या भागातील जुन्या नवीन कार्यकर्त्यांची माहिती संकलित करावी व या माध्यमातून स्थानिक शहरातील कार्यकर्त्यांपर्यंत पोचावे.

त्यायोगे विस्तारक योजनेच्या अभियानात गती मिळू शकेल. रवी अनासपुरे म्हणाले, आपल्याला जे विषय माहीत असेल, त्याच विषयाची माहिती जनतेपर्यंत पोचवावी. जे विषय माहिती नसेल त्याची चुकीची माहिती जनतेला देऊ नये. बूथ समिती ही ३० सदस्यांची असावी व त्या त्या परिसरातील समाज घटकांची अंतर्भूत सर्वसमावेशक असावी.

Vijay Chaudhary, Ravi Anaspure, Raghunath Kulkarni, Kripashankar Singh, Ajay Bhole, Sachin Panpatil, Sunil Bachhao, Laxman Savji etc. on the occasion of North Maharashtra Extension Workshop.
Sharad Pawar News: अजित पवारांच्या बंडानंतर BJP ला शह देण्यासाठी शरद पवारांचे रेडी आहेत 3 मास्टरप्लॅन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.