Vijayadashami Festival 2022 : सोने खरेदीला झळाळी

gold shopping`
gold shopping`esakal
Updated on

नाशिक : दसऱ्याच्या मुहूर्तावर ग्राहकांकडून सोने खरेदीला विशेष पसंती दिली जात असल्याने सराफी पेढी व दुकानांमध्ये सोने खरेदीला उत्साह आला आहे. ग्राहकांच्या खरेदीने खऱ्या अर्थाने सोने खरेदीला झळाळी प्राप्त झाली आहे. ग्राहकांकडून सराफी दुकानांवर खरेदीसाठी चांगला प्रतिसाद मिळत असल्याने व्यवसायिकांकडून ग्राहकांच्या मागणीनुसार दागिने घडविले जात आहे.

दसऱ्याचा मुहूर्त साधत सोने खरेदीला मोठा प्रतिसाद मिळत असल्याने विजयादशमीला मोठी उलाढाल बाजारपेठेत होणार असल्याचे संकेत सराफ व्यावसायिकांनी दिले. (Vijayadashami Festival 2022 Gold buying spree nashik Latest Marathi News)

कोरोना महामारीनंतर प्रथमच सर्वच सण हे निर्बंधमुक्त साजरे केले जात आहे. दसरा सणदेखील मोठ्‌या उत्साहात नाशिककरांकडून साजरा केला जात आहे. दसऱ्याला सोन्याला खास महत्त्व असल्याने नाशिककरांकडून सोने खरेदीला विशेष प्राधान्य दिले जात असल्याने शहरातील सर्वच सराफी पेढ्यांवर खरेदीसाठी वर्दळ आहे.

यातच मागील वर्षीच्या तुलनेत सोन्याच्या दर हे पन्नास हजारांवर असले तरी खरेदीसाठी उत्साह दिसत आहे. अनेक ठिकाणी सोन्याच्या दागिन्यांची आगावू नोंदणी केली जात आहे. महिला व तरुणी यांच्याकडून खासकरून पेशवाई आणि तयार दागिन्यांना विशेष पसंती दिली जात आहे. सोन्याची शिक्के, वेढे, सोन्या, चांदीत घडवलेली आपट्यांच्या पानांना विशेष मागणी असून, त्याची खरेदी केली जात आहे.

gold shopping`
Dasara Festival 2022 : Digitization जमान्यात आधुनिक शस्त्रांचे पूजन

आगाऊ खरेदी

पितृपक्ष संपल्यानंतर आलेला दसरा सण आणि त्यानंतर दिवाळी आणि तुलसीविवाह नंतर लग्नसराईला सुरवात होत असल्याने आणि दिवाळीनंतर सोन्याच्या दरात काहीशी वाढ होण्याची शक्यता असल्याने खासकरून लग्नसराईसाठी आतापासून दसऱ्याचा मुहूर्त धरत सोने खरेदी केली जात आहे.

सोन्याचे दर

मंगळवारी सोन्याचा दर २२ कॅरेटसाठी प्रति दहा ग्रॅम जीएसटीसह ४९ हजार १०० रुपये इतका नोंदविला गेला. तर २४ कॅरेट सोने प्रति दहा ग्रॅमसाठी जीएसटीसह ५३ हजार १५० रुपये इतका नोंदविला गेला.

gold shopping`
City Beautification Drive : आता शहर सौंदर्यीकरण अभियान; कचरा विलगीकरणावर ‘फोकस’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.