सुरगाणा : आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी शेतीस जोडधंदाची आवश्यकता आहे. समाज स्वतःच्या पायावर उभा राहिला पाहिजे, असे प्रतिपादन आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी केले. (Vijayakumar Gavit statement Need for agribusiness to be economically viable Nashik News)
भोरमाळ येथे आदिवासी लाभार्थ्यांना दुधाळ जनावरांचे वाटपप्रसंगी ते बोलत होते.
व्यासपीठावर शबरी महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक लिना बनसोड, कळवणचे प्रकल्पाधिकारी विशाल नरवाडे, तहसीलदार प्रशांत कुलकर्णी, गटविकासाधिकारी महेश पोतदार, चिंतामण गावित, आदिवासी भाजप महामंत्री एन. डी. गावित, शबरी महामंडळाचे महाव्यवस्थापक बाबासाहेब शिंदे, बॅंक ऑफ बडोदाचे संजय वानखेडे, विक्रांत काशीकर, बॅंक ऑफ महाराष्ट्राचे चंद्रशेखर सिंग, शरद पडघणे, पंजाब बॅंकेचे सुनील लकाळे आदी उपस्थित होते.
मंत्री डॉ. गावित म्हणाले, की तालुक्यातील तीन हजार आदिवासी लाभार्थ्यांना दुधाळ जनावरांचे वाटप करण्यात येईल. दुधाळ जनावरांचे पालन पोषण करून आपल्याला आर्थिक सक्षम बनायचे आहे.
शिक्षण, आरोग्य, वीज, दळणवळण या मूलभूत सुविधा आदिवासी भागात देण्यासाठी प्राधान्य देण्यात येईल. केंद्र सरकारची जलजीवन मिशन योजनेतून प्रत्येकाला पाणी पिण्याचे पाणी मिळाले पाहिजे. हर घर नल योजनेतून विहिरीचे खोदकाम करायचे आहे.
दुर्गम भागात भगवान बिरसा मुंडा जोड रस्ता योजना राबविण्यात येत आहे. एकही वस्ती रस्त्याच्या सुविधापासून वंचित राहणार नाही. मेरी येथे पाचशे मुलींसाठी निवासाची सोय होणार आहे. शासकीय आश्रमशाळेत इंटरनेटची सुविधा देण्यात येणार आहे.
चिंतामण गावित यांनी मनोगत व्यक्त केले. एन. डी. गावित यांनी प्रास्ताविकात साडेबारा हजार लाभार्थ्यांना दुधाळ जनावरेवाटप करण्यासाठी आदिवासी विकास विभागाने शासनाकडे तरतूद केली आहे.
सुरगाणा तालुक्यातून रोज ४० हजार लिटर दूधाचे उत्पन्न होते. ते दूध गुजरातला डेअरीमध्ये पाठवले जाते. योग्य भाव न मिळाल्यामुळे शेतकऱ्यांची फसवणूक होत आहे.
त्यामुळे गुजरात राज्यातील सुमूल डेअरीशी करार करून हा पथदर्शी प्रकल्प राबविण्यात येत आहे. दुधाळ जनावरांचे वाटप पुढील पिढीला आर्थिकदृष्ट्या सक्षम व समृद्ध बनविणारा प्रकल्प आहे. तालुक्यातील तीन हजार लाभार्थी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.