नाशिक : येथील लेखक प्राजक्त देशमुख लिखित गोदावरी चित्रपट अभिनेते विक्रम गोखलेंसाठी अखेरचा ठरला. परंतु, त्यांनी केलेले नाटक, चित्रपटातील अभिनय चिरकाल टिकणारे आहे. गोदावरी चित्रपटातील त्यांचा एकमेव अन् अखेरचा डायलॉग ‘मारुतीच्या पायाला पाणी लागलं का?’
महाराष्ट्रासह नाशिककरांसाठी अविस्मरणीय करणारा ठरला. या सिनेमात त्यांनी नारोशंकर ही भूमिका साकारली होती. जितेंद्र जोशी निर्मित व निखिल महाजन दिग्दर्शित गोदावरी चित्रपटातील आठवणी उलगडल्या आहेत लेखक प्राजक्त देशमुख यांनी. (Vikram Gokhale dialogue in Godavari is Unforgettable for Nashik Nashik News)
प्राजक्त देशमुख म्हणाले, गोदावरी चित्रपट करत असताना त्यांची तब्येत खराबच होती. परंतु, जितेंद्र जोशी यांच्या प्रेमापोटी त्यांनी चित्रपट केला. जितेंद्र जोशी पहिल्यांदा चित्रपटाची निर्मिती करीत असल्याने त्यांनी तब्येत बरी नसताना चित्रपटासाठी तारखा दिल्या. चित्रीकरणासाठी तीन दिवसाचे नियोजन केले होते. चित्रपटात त्यांना एकच वाक्य आहे.
परंतु, त्यांनी त्यासाठी अभ्यास, विचार केला. चित्रपटाच्या शूटिंगवेळी मारुतीच्या पायाला पाणी लागलं का ? या वाक्याचा अर्थ समजून घेतला. प्रगल्भ अभिनेत्याला इतक्या जवळून पाहता आले. तो अनुभव गाठीशी असल्याचे श्री. देशमुख यांनी नमूद केले. गोदावरी चित्रपटात विक्रम गोखलेंसह जितेंद्र जोशी, नीना कुलकर्णी, प्रियदर्शन जाधव, गौरी नलावडे, सखी गोखले, संजय मोने यांच्या भूमिका आहेत.
हेही वाचा : मुदत ठेवीच्या मुद्दलातून टीडीएस कपात? इथे करा तक्रार....
पूर्ण चित्रपटात त्यांचा वावर
गोदावरीचे चित्रीकरण जुलै २०२१ मध्ये झाले. गोदावरी चित्रपटात भूतकाळात तुम्ही अडकलेले आहात. आणि ते तुम्ही आज जगता आहात. या पद्धतीचे नारोशंकर यांचे पात्र होते. गोदावरी चित्रपटात विक्रम गोखले यांचा सहभाग भावनिकदृष्या जवळचा आहे. मारुतीच्या पायाला पाणी लागलं का ? ही एक ओळ असली तरी त्या ओळीत ताकद आहे. पूर्ण चित्रपटात त्यांचा वावर जाणवतो. जुन्या नाशिकच प्रतिबिंब त्यात दिसत असल्याचे श्री. देशमुख यांनी सांगितले.
"ताकदीचा अभिनेता दुर्दैवाने आपल्यात नाही. गोदावरी करीत असताना ज्या गोष्टी त्यांनी सांगितल्या तो अनुभव वेगळा आहे. एक लेखक म्हणून विक्रम गोखले यांनी दिलेली शाबासकी आजन्म पुरणार आहे."
-प्राजक्त देशमुख, लेखक
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.