नाशिक : 3 दिवसांपासून संपूर्ण गाव अंधारात, ग्रामस्थांचा आंदोलनाचा इशारा

Village power supply cut off from 3 days villagers warn of agitation
Village power supply cut off from 3 days villagers warn of agitationesakal
Updated on

अंबासन (जि. नाशिक) : बिजोटे (ता.बागलाण) गेल्या तीन दिवसांपासून गाव अंधारात असूनही वीज वितरण कंपनीकडून दखल घेतली जात नसल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. लोंबकळत असलेल्या जीर्ण तारा तसेच नेहमीच शॉट- सर्किट यामुळे जिवितहानीची शक्यता बळावली आहे. सात दिवसांत जीर्ण वीज वाहक तारा वीज वितरण कंपनीकडून बदलल्या नाहीत तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा ग्रामस्थांकडून देण्यात आला आहे.

रोहित्रावरील जीर्ण तारा तुटून पडल्या

बिजोटे गावाला विद्युत पुरवठा करण्यासाठी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व शाळेला लागून अंगणवडी जवळील रोहित्रावरून केला जातो. मात्र या रोहित्रावर असलेल्या जीर्ण तारा व केबल्स धोकादायक ठरत आहेत. गेल्या एक वर्षांपासून वीज वितरण कंपनीकडे पाठपुरावा करूनही दखल घेतली जात नसल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. शाळेजवळच रोहित्र असल्याने विद्यार्थ्यांची नेहमीच गर्दी असते दोन दिवसांपूर्वी रोहित्रावरील जीर्ण तारा अचानक तुटून पडल्या होत्या सुदैवाने विद्यार्थी शाळेत असल्याने पुढील अनर्थ टळला दरम्यान शाळेच्या सुट्टीत जीर्ण वीजवाहक तारा तुटली असती तर भयानक प्रकार घडला असता अशा संतप्त प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त होत आहेत. शाळेजवळील रोहित्राची जागा हलविण्यात यावी यासंदर्भात ग्रामपंचायत प्रशासनाकडून अनेक वेळा निवेदन सादर करूनही दाद दिली जात नसल्याने वीज वितरण कंपनीविरोधात संताप व्यक्त केला जात आहे.

Village power supply cut off from 3 days villagers warn of agitation
पैसे घेतल्याचा खडसेंनी पुरावा द्यावा; महाजन

3 दिवसांपासून गावाचा वीजपुरवठा खंडित

गेल्या तीन दिवसांपासून या गावाचा वीजपुरवठा खंडित झाला आहे. संबंधित कर्मचाऱ्यांना कळवूनही येत नाहीत असेही यावेळी ग्रामस्थांकडून सांगण्यात आले. पुढील काळात जीर्ण वीजवाहक तारांमुळे अनुचित प्रकार घडल्यास जबाबदारी वीज वितरण कंपनीचीच असेल असे उपस्थित नागरिकांकडून सांगण्यात आले. सात दिवसांत जीर्ण झालेले वीज तारा तसेच रोहित्र हलविण्यात आला नाही तर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराच ग्रामस्थांकडून देण्यात आला आहे.

''आम्ही गेल्या एक वर्षांपासून जीर्ण वीजवाहक तारा व रोहित्राची जागा बदलण्यासाठी पाठपुरावा करीत आहोत. मात्र वीज वितरण कार्यालयामार्फत दखल घेतली जात नाही. चार दिवसांपासून गाव अंधारात आहे. सात दिवसांत दुरुस्ती झाली नाही तर आंदोलन छेडणार.'' - पोपट जाधव, सरपंच बिजोटे.

Village power supply cut off from 3 days villagers warn of agitation
नाशिक : दुहेरी हत्याकांड - पोलिस आणखी तिघांच्या मागावर

''जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, अंगणवाडीतील मुले नेहमीच आवारात खेळतात. शेजारील जीर्ण वीजवाहक तारा व धोकादायक केबल्स कधी शाॅक सर्कीटने पडतील याचा अंदाज येत नाही. पुढील अनर्थ घडल्यास जबाबदार कोण?'' - बळीराम जाधव, माजी ग्रामपंचायत सदस्य तथा सामाजिक कार्यकर्ते बिजोटे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.