Nashik Crime : येथील युवक सलमान शेख याने बुधवारी (ता. १२) त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून धार्मिक तेढ निर्माण होईल, अशी पोस्ट टाकल्याने गुरुवारी (ता. १३) गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
ग्रामस्थांनी या घटनेच्या निषेधार्थ गावबंद ठेवले. सध्या पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, शांतता आहे. वादग्रस्त पोस्ट टाकणाऱ्याला युवकाला अटक झाली आहे. (Villagers shut down in Thengoda due to religious controversial instagram post of concerned youth arrested Nashik Crime)
संबंधित संदेशाचे स्क्रिनशॉट काही वेळातच सोशल मीडियावर व्हायरल झाले. यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाल्याने आणि अनेक गावांतील व पंचक्रोशीतील तरुण रात्री दहा ते अकरादरम्यान गावात दाखल होत ‘बजरंगबली की जय-जय श्रीराम’च्या घोषणा देत संताप व्यक्त करू लागले.
पोलिस पाटील कचरलाल बागडे यांनी ही घटना तातडीने सटाणा पोलिसांना कळविली. पोलिसांनी धाव घेत नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन करत संबंधित युवकाविरोधात गुन्हा दाखल करून कडक शासन करण्याचे आश्वासन दिल्याने मोठा अनर्थ टळला.
मात्र सकाळी या घटनेचे पडसाद पुन्हा उमटले. ग्रामस्थांनी आपले व्यवहार बंद ठेवत गाव बंद केले. संबंधित युवकावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करीत ग्रामपंचायत कार्यालयासमोर गर्दी केली.
उपविभागीय पोलिस अधिकारी पुष्कराज सूर्यवंशी, पोलिस उपनिरीक्षक किरण पाटील यांनी गावात भेट देऊन नागरिकांना शांततेचे आवाहन केले. संबंधित युवकाला अटक करून कायदेशीर कारवाई करण्यात येत असल्याचे सांगत शांतता राखण्याचे आवाहन केल्याने नागरिक शांत झाले.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
शांतता समितीची बैठक
ग्रामपंचायत कार्यालयात मुस्लिम पंच कमेटी सदस्यांसह शांतता समितीची बैठक झाली. उपविभागीय अधिकारी सूर्यवंशी, सहाय्यक उपनिरीक्षक किरण पाटील, सरपंच भारती वाघ यांच्या उपस्थितीत मुस्लिम पंच कमेटीच्या सदस्यांनी घटनेचा निषेध करीत संबंधित युवकावर कडक कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी केली.
हिंदू व अन्य धर्मीयांच्या भावना भडकतील, असे कृत्य करणाऱ्यांवर सामाजिक बहिष्कार टाकण्यात येईल, असे मुस्लिम पंच कमेटीचे कपिल शेख यांनी सांगितले.
माजी सरपंच मधुकर व्यवहारे, प्रदीप शेवाळे, वसंत शिंदे, शांताराम वाघ, पोलिसपाटील कचरलाल बागडे आदींनी शांतता समितीत मनोगत व्यक्त केले. सरपंच भारती वाघ, उपसरपंच सुनील निरभवणे, नारायण निकम, दौलत पगार, अंजनाबाई मोरे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.