Nashik Water Crisis: विंचूरकरांची पाण्यासाठी वणवण सुरूच; सोळागाव पाणी योजनेचे काम ठप्प

water crisis
water crisisesakal
Updated on

Nashik Water Crisis : लासलगाव विंचूरसह सोळागाव पाणीपुरवठा योजनेच्या ढिसाळ नियोजनामुळे येथील ग्रामस्थांचा संयम सुटला असून ग्रामस्थांनी पाण्याची समस्या न सुटल्यास हंडामोर्चा काढून सामुहिक उपोषणाचा इशारा दिला आहे.

योजनेचे काम सुरू असल्याचे सांगितले जात,मात्र प्रत्यक्षात काम ठप्पच असून मंत्री छगन भुजबळ यांचा दौरा असला तेवढेच अधिकारी येतात, ते गेल्यानंतर स्थिती जैसे थेच राहते, त्यामुळे आता भुजबळांनीच या योजनेचा एकदाचा सोक्षमोक्ष लावावा अशी मागणी विंचूरकरांनी केली आहे. (Vinchur people continue to fight for water work of Solagaon water scheme stopped Nashik Water Crisis)

विंचूरकर महिन्यापासून पाणीटंचाईला सामोरे जात आहे. योजनेची वाहिनी फुटत असल्याने विंचुरकरांनी स्वतःच दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे. परंतु वाहिनी वारंवार फुटत असल्याने विंचूर ग्रामपालिका हतबल झाली आहे.

ऐन पावसाळ्यात विंचूरकरांना पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. अधिकारीही कुठली जबाबदारी घेत नाही.

योजनेची देखरेख समितीचे अधिकारी तर दुसऱ्या अधिकाऱ्यांचे नंबर देऊन त्यांना माहिती विचारा असे सांगत ग्रामस्थांना उडवाउडवीची उत्तरे देतात. योजनेचे काम युद्ध पातळीवर सुरू असल्याचे सांगतात, पण प्रत्यक्षात मात्र काम चालू नसल्याचे निदर्शनास आले आहे.

विंचूर ग्रामपंचायतीने शुक्रवारी (ता.२१) लिकेज काढून झाल्यानंतर पाणीपुरवठा चालू केला, मात्र पुन्हा जलवाहिनी फुटल्याने आता आठ दहा दिवस पाणीपुरवठा होणार नसल्याचे ग्रामपंचायतीने जाहीर केले. परिणामी ग्रामस्थांमध्ये संतापाचे वातावरण आहे.

दहा ते पंधरा दिवसांपासून पाणीपुरवठा ठप्प आहे. काही लाभार्थी गावांना एक महिन्यांपासून पाणीपुरवठा नाही. नागरिक पिण्याच्या पाण्यासाठी त्रस्त असताना अधिकारी मात्र उडवाउडवीची उत्तरे देत आहेत.

जलवाहिनी दुरुस्ती कामाचे अंतिम वर्ष एप्रिल २०२४ असल्याने तोपर्यंत नागरिकांना पाण्याची सोय नसल्याने त्रास सहन करावा लागत आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

water crisis
Nashik News: मोकाट जनावरांच्या त्रासाने वणीकर हैराण! भररस्त्यावर ठाण मांडून बसल्याने अपघातांत होतेय वाढ

पाणीटंचाईला जबाबदार कोण?

आडातच नाही तर पोहऱ्यात कुठून येणार ? अशी म्हण आहे. पण विंचूरची परिस्थिती वेगळी आहे. आडात असूनही पोहऱ्यात पाणी येईना, मग पाणी मुरते कोठे?

विंचुरकरांच्या सहनशीलतेचा अंत पाहण्याचे काम प्रशासकीय यंत्रणा करीत आहे का? मोर्चे, आंदोलन या सारखे हत्यार उपसले तरच प्रशासन जागे होईल का? असे अनेक प्रश्न सध्या विंचूरना पडले आहेत.

याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांना विचारणा केली असता त्यांना जलवाहिनीच्या कामाबद्दल काही माहिती नसल्याचे उत्तर मिळाले. त्यामुळे दुरुस्तीचे काम सुरु नाही तर ते पूर्ण होईल केव्हा आणि गावाला पाणी मिळेल केव्हा ? हा प्रश्न अनुत्तरितच आहे.

"सोळा गाव पाणीयोजनेबाबत संबंधित अधिकारी व ठेकेदार यांच्याशी बोलून पाणीपुरवठा कधी होईल याबाबत सूचना करतो. योजनेचे काम कुठे चालू आहे याची माहिती नाही."

- महेश पाटील, गटविकास अधिकारी,निफाड.

"संबंधित योजनेबाबत अनेक वेळा निवेदने व अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा करूनही पाणीपुरवठा सुरळीत होत नाही. मंत्री छगन भुजबळ यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देऊन सुद्धा अधिकारी काम करत नसल्याची खंत आहे."

- सचिन दरेकर, सरपंच, विंचूर.

"विंचूरला महिनाभरापासून पाणीपुरवठा नाही. पाणीपुरवठा सुरळीत होणे गरजेचे आहे, अन्यथा महिलांचा मोर्चा काढून सामुहिक उपोषण करणार आहोत."

- वाल्याबाई शिंदे, ग्रामस्थ, विंचूर.

water crisis
Nashik Rain Update: भावली धरण शंभर टक्के भरले! यंदाही मारली प्रथम बाजी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.