Armory Exhibition: सह्याद्री प्रतिष्ठानच्या पुण्यातील शस्त्रागार प्रदर्शनात विंचूरकरांचे ‘शाही फर्मान'!

उद्यापासून पुरातन शौर्यातील वस्तू पाहण्याची संधी
Armory Exhibition
Armory Exhibitionesakal
Updated on

Armory Exhibition : सह्याद्री प्रतिष्ठानतर्फे पुण्यातील बालगंधर्व कलादालनात २६ ते ३१ जुलैदरम्यान मराठा साम्राज्यातील राज आणि सरदार यांच्या शस्त्रागारांचे प्रदर्शन होत आहे. या प्रदर्शनात सरदार विंचूरकर यांच्या १७५५ मधील ‘शाही फर्मान’चा समावेश असेल.

नाशिकमधून सरदार विंचूरकरांचे वंशज डॉ. नारायण विंचूरकर हे प्रदर्शनात सहभागी होत असून, ते काही दुर्मिळ वस्तू प्रदर्शनात ठेवतील. (Vinchurkar royal decree at armory exhibition of Sahyadri Pratishthan in Pune nashik)

दिल्लीच्या लढाईत १७५६ मध्ये नाजिब खान रोहिल्ला परास्त करून सरदार विठ्ठल शिवदेव विंचूरकर यांनी त्याला कैद केले. या शौर्यासाठी सरदार विंचूरकर पेशव्यांचे एन्हॉय म्हणून दिल्लीत असताना बादशाह आलमगीर (दोन) यांचे विरोधकांपासून जीवन रक्षण केल्याने त्यांना बादशाहांनी उमेद तुल मुल्क बहाद्दूर ही पदवी आणि जहागिरी, जड जवाहीर, स्वतःची तलवार, छत्री, पालखी, उंची पोशाख देऊन गौरव केला.

त्यांना चांदवड भागातील जहागिरी दिली. ते ‘शाही फर्मान’ विंचूरकर घराण्यात संग्रहित आहे. हेच २७० वर्षांपूर्वीचे ‘शाही फर्मान’ प्रदर्शनात असेल.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Armory Exhibition
Dada Bhuse: स्मारकासाठी निधी कमी पडून देणार नाही : दादा भुसे

शिवदेव हे विंचूरकर घराण्याचे मूळ पुरुष. श्री नृसिंह त्यांचे कुलदैवत. विठ्ठल शिवदेव विंचूरकर हे मराठा राज्यातील शूर सेनापती होते. १७५७ मध्ये दिल्ली ताब्यात घेत मोगल बादशहाची मर्जी संपादन केली.

बादशहाने विंचूरकरांना विंचूरसह पाच गावे, मनमाड, पाटोदे, दहिवड, वाखारी, चाटोरी, नाशिक, करंजी, कुंभारी असे नऊ परगणे इनाम दिले होते.

अशा सरदार विंचूरकरांच्या अनेक वस्तू डॉ. विंचूरकर यांनी संग्रही ठेवल्या आहेत. १८६५ मध्ये ब्रिटिश कलावंताने काढलेले पोट्रेट असून, त्याच काळातील महिलांचे सोन्याचे दागिने घालणारे दुर्मिळ पोट्रेट त्यांच्या संग्रहात आहे.

"पुण्यातील प्रदर्शनात महाराष्ट्रातील २५ राज व सरदार घराणे सहभागी होत आहेत. त्यांच्याकडील पुरातन शौर्य वस्तू प्रदर्शनात असतील. प्रदर्शनाला भेट देऊन इतिहास समजून घेण्याची एक संधी मिळणार आहे."- डॉ. नारायण विंचूरकर, वंशज, सरदार विंचूरकर घराणे

Armory Exhibition
Nashik News: वाडिवऱ्हेच्या नाल्यात सोडले केमिकलयुक्त पाणी; प्रदूषण नियंत्रण विभाग दखल घेणार का?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.