Sakal People Culture Forum : चांगले करिअर घडविण्यावर लक्ष केंद्रित करा : विनोद बिडवाईक

Vinod Bidwaik Director People and Culture  Sakal statement Focus on building a good career nashik news
Vinod Bidwaik Director People and Culture Sakal statement Focus on building a good career nashik newsesakal
Updated on

Sakal People Culture Forum : महाविद्यालयीन काळात नियमित शिक्षणक्रमासोबतच वाचनाची आवडही जोपासायला हवी. विविध उपक्रमांमध्ये पुढाकार घेत सहभागी झाल्‍याने व्यक्‍तिमत्त्वाचा विकास होतो. (Vinod Bidwaik Director People and Culture Sakal statement Focus on building a good career nashik news)

केवळ पैसे कमविण्यासाठी नोकरी किंवा व्‍यवसाय करण्याऐवजी निवडलेल्‍या क्षेत्रात सर्वोत्तमतेचा बिंदू गाठण्यासाठी प्रयत्‍न करावा. नोकरी, व्‍यवसायात सुरवातीची पाच-सात वर्षे समर्पण भावनेतून स्‍वतःला झोकून देत चांगले करिअर घडविण्यास प्राधान्‍य देत ‘कॅम्‍पस टू कॉर्पोरेट’चा यशस्‍वी प्रवास साधावा, असे आवाहन ‘सकाळ’चे संचालक (पीपल ॲन्ड कल्‍चर) विनोद बिडवाईक यांनी शनिवारी (ता. १६) केले.

मुंबई-आग्रा महामार्गावरील अशोका बिझनेस स्‍कूल येथे झालेल्या मार्गदर्शन कार्यक्रमात ते बोलत होते. ‘सकाळ’च्‍या उत्तर महाराष्ट्र आवृत्तीचे संपादक डॉ. राहुल रनाळकर, अशोका एज्‍युकेशन फाउंडेशनचे मुख्य प्रशासकीय अधिकारी डॉ. नरेंद्र तेलरांधे, संचालिका (पदवी अभ्यासक्रम) प्रा. डॉ. सरिता धवळे यांच्‍यासह ‘अशोका बिल्‍डकॉन’चे सहाय्यक सरव्‍यवस्‍थापक व्‍योम श्रीवास्‍तव, इन्स्टिट्यूटचे माजी संचालक डॉ. डी. एम. गुजराथी, ‘सकाळ’चे आयटी विभागाचे सरव्‍यवस्‍थापक दिनेश ओक, मुख्य व्यवस्थापक (एचआर) वासुदेव मेदनकर, वरिष्ठ व्‍यवस्‍थापक (एचआर) संजय पाटील आदी उपस्‍थित होते.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Vinod Bidwaik Director People and Culture  Sakal statement Focus on building a good career nashik news
Career News : 3 करोडच्या पॅकेजबरोबरच एलपीयूने रोजगार संधींमध्ये एक नवीन विक्रम केलाय!

श्री. बिडवाईक म्‍हणाले, की प्रत्‍येक पिढीला विभिन्न स्‍वरूपाच्या आव्‍हानांचा सामना करावा लागतो. सध्याची पिढी हुशार आहे. त्यांची आकलन क्षमता चांगली असली तरी सोशल मीडियासह अन्‍य विविध अडथळ्यांचा त्यांना सामना करावा लागत आहे. चांगले शारीरिक व मानसिक आरोग्‍य राखण्याचे आव्‍हान सध्या निर्माण झाले आहे. याअनुषंगाने स्‍वयंशिस्‍त राखताना युवकांनी तंत्रज्ञानाचा पूरक उपयोग करणे गरजेचे आहे.

डॉ. तेलरांधे यांनी प्रास्ताविकात संस्‍थेविषयी माहिती देताना राबविल्‍या जाणाऱ्या उपक्रमांचा आढावा घेतला. नोकरी शोधणारे नव्‍हे, तर नोकरी देणारे घडविण्याचा ध्यास राहिला आहे. त् ‍याअनुषंगाने विद्यार्थ्यांच्‍या सर्वसामावेशक विकासावर भर दिला जात आहे.

तसेच ‘सकाळ’ पीपल ॲन्ड कल्‍चर फोरमसोबत अशोका बिझनेस स्‍कूल जोडले जाण्यास उत्‍सुक असल्‍याचे त्यांनी नमूद केले. विद्यार्थिनी हर्षदा सातपुते हिने सूत्रसंचालन केले. साक्षी देशमुख हिने परिचय करून दिला. सिबिन जोसेफ हिने आभार मानले.

Vinod Bidwaik Director People and Culture  Sakal statement Focus on building a good career nashik news
Career Tips : घरबसल्या करिअर कसे कराल ?

स्‍वप्‍न साकार करण्याचे ध्येय बाळगा : डॉ. रनाळकर

सध्याची पिढी सजग, सुजाण व स्‍पष्टवक्ती असली तरी तंत्रज्ञानाच्‍या जाळ्यात ती गुरफटत चालली आहे. मोबाईल आपल्‍याला गुंतवून ठेवत असून, यामुळे उमेदीचा वेळ वाया जात आहे. अडथळ्यांवर मात करताना युवकांनी मोठे स्‍वप्‍न बघावे व ते ‍साकार करण्याचे ध्येय बाळगावे, असे आवाहन डॉ. राहुल रनाळकर यांनी केले.

ते म्‍हणाले, की ‘यिन’ व्‍यासपीठाद्वारे युवकांना मार्गदर्शनाच्‍या संधी उपलब्‍ध केल्‍या जात आहेत. सामाजिक जाणीव निर्माण करताना जीवनाला योग्‍य दिशा दाखविण्याचे कार्य या युवा व्‍यासपीठाच्‍या माध्यमातून घडत आहे. स्‍वतःसह कुटुंब व समाजासाठी काहीतरी योगदान देत सामाजिक बांधिलकी जपण्याचा सल्‍लाही त्‍यांनी या वेळी दिला.

Vinod Bidwaik Director People and Culture  Sakal statement Focus on building a good career nashik news
Career Tips : करियरमध्ये आता पुढे काय? असा प्रश्न पडत असेल तर लगेच फॉलो करा या टिप्स

बिडवाईक यांनी विद्यार्थ्यांना दिल्‍या टिप्‍स...

* चॅटजीपीटीवर अवलंबून न राहता पूरक साधन म्‍हणून करा उपयोग.

* आत्‍मविश्‍वास, निर्णयक्षमता, संभाषण कौशल्‍ये आत्‍मसात करा.

* महाविद्यालयीन जीवनात वाचनावर अधिकाधिक भर द्यावा.

* समर एन्‍ट्रनशिप, प्रकल्‍प, संपर्क वाढीवर भर देत साधावा व्यक्तिमत्त्व विकास.

* सामाजिक उपक्रमांतील सहभागातून प्रगल्‍भ करा जाणिवा.

* शिक्षण, प्रशिक्षण ही निरंतर प्रक्रिया; स्‍वतःला नेहमी ठेवा अद्ययावत.

* भारतीय नीतीमूल्‍यांच्‍या आधारे करा जीवनाचे व्‍यवस्‍थापन

* ताणतणावापासून दूर राहण्यासाठी नियमित ध्यान महत्त्वाचे.

Vinod Bidwaik Director People and Culture  Sakal statement Focus on building a good career nashik news
Sakal Training : व्यावसायिक मधमाशीपालन, फायदे, व्यवसाय संधी; दोन दिवसीय विशेष प्रशिक्षण

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.