Diwali Greetings through Social Media
Diwali Greetings through Social Mediaesakal

दिवाळीत ना ‘शुभेच्छा कार्ड, ना ‘Greetings’चा पूर; Social Mediaवर Imagesचा ‘अभासी’ धूर!

Published on

मालेगाव शहर (जि. नाशिक) : नव्या आधुनिक व तंत्रज्ञानाने विकास होत असला तरी जुने लोप पावत आहे. संस्कृती व परंपरा खंडीत होत असल्याने याचा परिणाम थेट स्थानिक रोजगारावर दिसून येतो. दिवाळीसारख्या प्रकाशमान उत्सवाला ग्रिटींग्ज कार्ड, पोस्टकार्डद्वारे दिल्या जाणाऱ्या शुभेच्छा धूसर झाल्या आहेत.

दीपोत्सवात मोठ्या प्रमाणावर आपल्या नातलगांना, मित्र परिवाराला दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी ग्रीटिंग कार्ड, पत्र पाठवून भावना व्यक्त करीत होते. तो आनंदच अवर्णनीय होता. आता मात्र सोशल मीडियावर इमेजसचा ‘अभासी’ धूर दिसत आहे. (virtual Diwali this year greeting Images on Social Media nashik news)

गेल्या सात- आठ वर्षांपासून सोशल मीडियावरच दिवाळी संदेश पाठवले जातात. भेटकार्डच्या माध्यमातून मराठी भाषा संवर्धन, मराठी कविता, सण, संस्कृतीचे वैभव जपणूक, दरवर्षी नवा विचार दिला जात होता. व्हॉट्स ॲपच्या नव्या फिचरमुळे सेकंदात एकावेळी पाचशेवर मॅसेज ब्रॉडकास्टिंग होतात. अन्य अनेक मिडिया साधने जलदगती झाल्याने रिचार्ज डाटा मोठ्या प्रमाणावर खर्ची पडतो.

बदलत्या काळानुसार ग्रीटिंग कार्ड लुप्त झाल्यात जमा असून, बोटावर मोजण्याइतकेच लोक, शैक्षणिक संस्था, व्यापारी संस्था, सामाजिक कार्यकर्ते शुभेच्छापत्रांचा वापर करताना दिसतात. ग्रीटिंग कार्डचा बाजार थंडावला. दिवाळीत ग्रीटिंग कार्ड खरेदीसाठी पूर्वी विविध गिफ्ट गॅलरीच्या दुकानांवर नागरिकांची मोठी गर्दी दिसून यायची. अत्यंत महागडी ग्रीटिंग कार्ड बाजारात उपलब्ध असायचे. मात्र, आता ग्रीटिंग्जची जागा डिजिटल झाल्याने अनेकांच्या रोजगारास फटका बसला आहे.

अनेक छपाई कारागिर व व्यावसायिक, कागदाच्या उद्योगासह स्टेशनरी विक्रेत्यांच्या व्यवसायावर परिणाम झाला आहे. दरम्यान, दिवाळीनंतर आठ ते दहा दिवस हे कार्ड गल्ली, बोळात पोस्टाने पोस्टमन घरपोहच करत होते. काळाच्या ओघात बदल होत असला तरी नव्या क्रांतीत भाव भावनांचे कोंदण व मराठी भाषेचा हा उत्साह मावळत असल्याचे चित्र बघावयास मिळते.

जिल्ह्यातील उलाढाल

वार्षिक उलाढाल - ४० ते ५० लाख

दिवाळी ग्रीटिंग्ज उलाढाल - २५ ते ३० लाख

ग्रीटिंग्ज कार्ड - जन्मदिवस, मकर संक्रांत, व्हॅलेंटाइन डे, ख्रिसमस, दिवाळी.

सोशल मीडिया साधने - व्हॉट्‌स ॲप, फेसबुक, इन्स्टाग्राम शेअर चॅट, ट्विटर, टेलिग्राम, टेक्स्ट मॅसेज.

Diwali Greetings through Social Media
Police Bharati : वर्षामागून वर्षे निघून चालली, संधी केव्हा?

"भेटकार्ड हे भाव भावनांचे कृतिशील प्रतिक होते. आठवण म्हणून विविध सण, जन्मदिवस, विविध डेनिमित्त दिले जात. सर्वसाधारण अनेक जण मोठ्या प्रमाणावर वापर करीत असत. गेल्या पाच- सहा वर्षापासून ग्रीटिंग्जला मागणीच नसल्याने विक्रीच बंद झाली."

- ललित कांकरिया, कस्तुरी स्टेशनरी, मालेगाव

"पंचवीस पन्नास पैशांच्या पोस्टकार्डवर दीपावली शुभेच्छा एकमेकांना पाठवल्याचे आम्ही अनुभवले आहे. मात्र, सोशल मीडियामुळे आभासी इमेज यंदा पाठवल्याने प्रत्यक्ष हातात पोस्टकार्ड किंवा ग्रीटिंग वाचण्याची मजा मिळाली नाही. हा या युगाचा करिष्मा आहे. त्यात भावनाशून्यता वाढली आहे." - रवींद्र मालुंजकर, साहित्यिक, नाशिक

"वैयक्तिक व कौटुंबिक वापरात पोस्टकार्ड व भेटकार्ड पाठवणे सोशल माध्यमामुळे कमी झाले आहे. व्यावसायिकदृष्ट्या पोष्टाचा वापर आहे. दिवाळी फराळ पार्सल हा नवा ट्रेंड वाढीस लागला आहे. गेल्याकाळात दिवाळीनंतरही भेटकार्ड टपाल बटवडा मोठ्या प्रमाणावर करावा लागत होता." - भरत पगार, डाक अधिक्षक, मालेगाव मुख्य पोष्ट कार्यालय

Diwali Greetings through Social Media
Horse Funeral : बळीराजाची अशीही कृतज्ञता; कवडदरात होणार घोड्याची दशक्रिया

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.