Nashik News : लेझर लाइटमुळे जीवनात दाटला अंधार; विसर्जन मिरवणुकीदरम्‍यान 6 ते 7 तरुणांची दृष्टी प्रभावित

Laser light burns to the inner part of the eye.
Laser light burns to the inner part of the eye.
Updated on

Nashik News : काही दिवसांपूर्वी झालेल्‍या गणेश विसर्जन मिरवणुकीतील अतिधोकादायक लेझर लाइटमुळे डोळ्याच्‍या पडद्याचा भाग भाजला गेल्‍याने सहा ते सात तरुणांची दृष्टी प्रभावित झालेली आहे. लेझर लाइटने या युवकांच्‍या जीवनात अंधार दाटले आहे.

यासंदर्भात नाशिक नेत्रविकार तज्‍ज्ञ संघटनेने सोमवारी (ता. २) पत्रकार परिषद घेताना नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. शालिमार येथील आयएमए सभागृह येथे झालेल्‍या पत्रकार परिषदेस संघटनेचे अध्यक्ष डॉ.अजित खुने, सचिव डॉ.अर्पित शाह, डॉ.सचिन कासलीवाल, डॉ.गणेश भामरे उपस्‍थित होते.

गेल्‍या तीन-चार दिवसांमध्ये अचानकपणे दृष्टी कमी झाल्‍याचे सहा ते सात रुग्‍ण शहरात आढळून आले आहेत. (Vision of 6 to 7 youth affected due to laser nashik news)

या सर्व रुग्‍णांचे वय २० ते ३० वर्षांच्‍या सुमारास होते. नेत्रविकार तज्‍ज्ञांची आपसांत चर्चा झाल्‍यानंतर हा धक्‍कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनांचे निष्कर्ष भयानक असून, सर्व रुग्‍णांचा लेझर लाइटशी थेट संपर्क आल्‍याने हा प्रकार घडल्‍याचे सांगितले जाते आहे.

इजा नाही, पण दृष्टी झाली कमी

आढळलेल्‍या रुग्‍णांच्‍या डोळ्यांना बाह्य स्वरूपात इजा किंवा तक्रारी नव्‍हत्‍या. मात्र दृष्टी गंभीर स्वरूपात कमी झालेली आढळली. सखोल नेत्र तपासणीदरम्‍यान निदर्शनात आले, की त्‍यांच्या दृष्टी पटलावरील केंद्रबिंदूवर रक्तस्राव व भाजल्‍यासारख्या जखमा होत्‍या. आणखी व्‍यापक तपासणीत धक्‍कादायक बाब समोर आली. उत्‍सवात वापरल्‍या जाणाऱ्या लेझर लाइट बिमबरोबर या रुग्‍णांचा थेट संपर्क आला होता.

अतितीव्र प्रकाशकिरणे धोकादायक

कोणत्‍याही कार्यक्रमात वापरले जाणारे लेझर किरणे जर अप्रमाणित, अमानांकित, असुरक्षित असतील किंवा त्‍यांच्‍या संपर्काचा कालावधी मर्यादेपलीकडे असेल तर त्‍यापासून नेत्र पटलावर गंभीर स्वरूपाचे दुष्परिणाम होऊ शकतात.

Laser light burns to the inner part of the eye.
Namami Goda Project : प्रशासकीय गटांगळ्यात अडकला प्रकल्प; प्रकल्पाचे बजेट वाढले तब्बल 1 हजार कोटींनी

व दृष्टीस कायमस्वरूपी इजा होऊ शकते. त्‍यामुळे लेझरचा अतिरेक अथवा अविवेकी वापर टाळण्याचे आवाहन नाशिक नेत्रविकार तज्‍ज्ञ संघटनेने यावेळी केले.

महाराष्ट्रभरातून तक्रारी

नाशिकच नव्‍हे तर उत्तर महाराष्ट्रात धुळे, जळगाव भागातही असे प्रकार निदर्शनात आले आहेत. तर पुणे, मुंबईमध्येही हा प्रकार घडलेला असल्‍याची शक्‍यता वर्तविली जाते आहे. राज्‍यस्‍तरावर संघटनेमार्फत यासंदर्भात अधिकृत आकडेवारी संकलित केली जाण्याची शक्‍यता आहे.

संबंधित रुग्‍णांना दुखापत किंवा वेदनांची तक्रार आढळलेली नाही. परंतु त्‍यांच्‍या दृष्टीत घट झालेली आहे. त्‍यामुळे लेझरच्‍या संपर्कात आलेल्‍या एखाद्या व्‍यक्‍तीस दिसण्यास कमी झाले असेल त्‍यांनी तातडीने नेत्रविकार तज्‍ज्ञांचा सल्‍ला घेण्याचे आवाहन केले आहे.

Laser light burns to the inner part of the eye.
Nashik ZP News : सर्वसाधारण सभेच्या मान्यतेआधीच जि.प.त वैकुंठ रथाचा पुरवठादार निश्चित

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.