National Youth Festival : युवा राष्ट्रीय महोत्सवाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते शुक्रवारी (ता. १२) मोठ्या जल्लोषात उद्घाटन झाले. या महोत्सवात देशभरातून मोठ्या संख्येने तरुणांनी सहभाग घेतला आहे.
देशभरातून महोत्सवाच्या निमित्ताने नाशिकमध्ये आलेली तरुणाई आपल्यातील कला व क्रीडा गुणांचे सादरीकरण करणार आहे. (vision of country diversity through folk dance in national youth festival nashik news
महाकवी कालिदास कलामंदिरात शनिवारी (ता. १३) लोकनृत्य स्पर्धा रंगली. या वेळी लोकनृत्य सादरीकरणातून देशभरातील विविध लोकसंस्कृतीचे दर्शन घडले. केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांच्या हस्ते नृत्य स्पर्धेचे उद्घाटन झाले.
सोहळ्यानंतर विविध राज्यांच्या चमूने सादरीकरणातून आपल्या लोकसंस्कृतीचा परिचय करून देत आपली कला सादर केली. त्रिपुरा, छत्तीसगड, उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, दिल्ली, गुजरात, बिहार, हरियाना राज्यांच्या संघाने आपल्या राज्यातील लोकसंस्कृतीची दखल घेणारी लोकनृत्ये सादर केली.
युवा महोत्सवाच्या निमित्ताने देशभरातून तरुणाई नाशिक शहरात दाखल झाली आहे. यानिमित्ताने संस्कृती, भाषा आणि देशातील तरुणाईचा परिचय एकमेकांशी होत आहे. राष्ट्रीय पातळीवर होणाऱ्या या महोत्सवामुळे देशातील कला व क्रीडा सामर्थ्य दिसून येत आहे, अशा भावना तरुणांनी ‘सकाळ’शी बोलताना व्यक्त केल्या.
''महोत्सवाचा आनंद घेताना व राष्ट्रीय पातळीवर स्पर्धा करताना देशाची विविधता अनुभवली. देशात मोठ्या प्रमाणावर क्रिएटिव्हिटी आहे. त्यामुळे महोत्सवात विजय मिळवण्यासाठी मेहनत आणि सर्वोत्तम द्यावे लागेल.''- कार्तिक चौहान, दिल्ली
''मी युथ समीट आणि सांस्कृतिक कार्यक्रमात सहभाग घेतला आहे. कला आणि क्रीडा गुणांना या महोत्सवाच्या निमित्ताने राष्ट्रीय स्तरावर वाव मिळत आहे.''- राजवी कडिया, गुजरात
''युवा महोत्सवाच्या निमित्ताने पहिल्यांदा महाराष्ट्रात आलो आहे. मला आणि माझ्या सर्व युवा मित्र-मैत्रिणींना आपल्यातील कला आणि राज्याची संस्कृती सर्वांसमोर सादर करण्यास मिळत आहे, याचा विशेष आनंद होत आहे.''- चांदसल येएयान, त्रिपुरा
युवाशक्तीचा जागर
सुविचार कार्यक्रमाच्या पहिल्या सत्रात नाशिकचे सह्याद्री फार्मचे अध्यक्ष विलास शिंदे, दुसऱ्या सत्रात रॅम्प माय सिटीचे अध्यक्ष प्रतीक खंडेलवाल यांनी युवकांशी चर्चा केली. युवकांनी अडचणीचा सामना करताना हार मानू नये, असा संदेश दिला. देशभरातून आलेल्या कलाकारांनी उदोजी महाराज संग्रहालयामध्ये आपल्या हस्तकलेच्या प्रदर्शनात पोस्टर बनवले व गोष्टी लिहिल्या.
महायुवा ग्राम हनुमाननगरमध्ये विविध प्रकारच्या प्रदर्शनांचे आयोजन केले आहे. खेळाडूंनी स्वदेशी खेळात सहभाग घेतला. युवाशक्तीचा उद्योग क्षेत्रातील जागर युवकांनी अनुभवला. महाएक्स्पोच्या माध्यमातून युवकांनी केलेल्या मशिन्स, ई-बाइक, कृषी उपकरण प्रदर्शनात मांडण्यात आले आहेत.
युवा कृतीच्या माध्यमातून देशभरातील विविध राज्यांतील घरगुती सामानांचे प्रदर्शन लागले आहे. या कार्यक्रमात युवकांची गर्दी झाली होती. युवाग्राम मैदानावर झालेल्या फूड फेस्टिव्हलमध्ये देशभरातून आलेल्या विविध राज्यांचे खाद्य प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. त्याचा आस्वाद युवकांनी घेतला. गीत-संगीताने राष्ट्रीय युवा महोत्सवमध्ये रंग भरला. केंद्रीय राज्यमंत्री नीतीश प्रामाणिक यांनी आयोजित ठिकाणांचा दौरा केला.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.