नाशिक : मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या के. टी. एच. एम. महाविद्यालयातील ‘डिलिजंट बॅच'तर्फे व्यावसायिक अभ्यासक्रम परीक्षेची तयारी करून घेतली जाणार आहे. बारावीची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांसाठी सीईटी, नीट, जेईई परीक्षेच्या पूर्व तयारीसाठी २१ मार्चपासून ‘क्रॅश कोर्स' सुरु करण्यात येत आहे.
दहावीची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांसाठी ३ एप्रिलपासून पायाभूत अभ्यासक्रमाचे अध्यापन केले जाणार आहे. (Vocational Education by MVP Diligent Batch 10th 12th students admission for special class Nashik News)
नाशिक शहर आणि जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना पायाभूत अभ्यासासाठी दीड महिन्याचा आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘क्रॅश कोर्स'चा एक महिन्याचा वर्ग घेतला जाणार आहे. दरम्यान, ‘मविप्र'तर्फे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळासह सीईटी, नीट, जेईई अशा स्पर्धात्मक परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना ज्ञानदान करण्याकरिता संस्थेतर्फे १६ ऑगस्ट २०१६ पासून ‘डिलिजंट बॅच' सुरु करण्यात आली आहे.
गुणवत्तापूर्ण शिक्षणाची व्यवस्था करण्यासाठी प्राचार्य डॉ. आर. डी. दरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली ‘डिलिजंट बॅच'ला विविध सुविधा देण्यात येत आहेत. अकरावी आणि बारावीच्या विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांसाठी नियमितपणे ‘डिलिजंट बॅच'चे अध्यापन चालते.
विद्यार्थी परदेशात शिक्षण घेताहेत
‘डिलिजंट बॅच' सुरु झाल्यापासून सात वर्षांमध्ये विज्ञानच्या अकरावीच्या वर्गात एक हजार ३९३ आणि बारावीच्या ८६८ अशा एकूण २ हजार २६१ विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला आहे. बारावी विज्ञानचे शिक्षण पूर्ण झाल्यावर काही विद्यार्थी शिक्षणासाठी परदेशात गेले आहेत.
हेही वाचा : ही चाळीस वर्षे जुनी बलाढ्य बँक ४८ तासात बुडालीच कशी?
नीट, एनआयटी, आयआयटी, आर्किटेक्चर, नाटा, राष्ट्रीय संरक्षण अकादमीच्या प्रवेशासाठीच्या परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांनी यश मिळवले आहे. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी, पुण्याचे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, बायोटेक्नॉलॉजीचे शिक्षण विद्यार्थ्यांनी घेतले आहे.
परराष्ट्र शैक्षणिक देवाण-घेवाण योजनेतंर्गत रशिया आणि इटलीच्या विद्यार्थिनी ‘डिलिजंट बॅच'मध्ये शिक्षण घेऊन गेल्या आहेत. ‘डिलिजंट बॅच'साठी स्वतंत्र प्रवेश परीक्षा घेऊन प्रवेश दिला जातो. विद्यार्थी संख्या मर्यादित असल्याने अध्यापकांचे वैयक्तिक लक्ष विद्यार्थ्यांकडे असते.
विशेष म्हणजे, रविवारी देखील शिकवले जाते. प्रत्येक शनिवारी एससीक्यू चाचणी तर रविवारी लेखी परीक्षा घेतली जाते. परीक्षांसाठी स्वतंत्र ग्रंथालय व्यवस्था करण्यात आली आहे. स्पर्धा परीक्षा तयारीसाठी ऑफलाइन आणि ऑनलाइन परीक्षांची व्यवस्था आहे. विशेष वर्गांसाठी ‘डिलिजंट बॅच' प्रमुख प्रा. जी. एस. खुळे (९४२२७४६९९१) यांच्याशी संपर्क साधता येईल.
"‘मविप्र' संस्थेने गुणवत्तापूर्ण शिक्षणाची व्यवस्था केली आहे. अकरावी-बारावीच्या अभ्यासक्रमासाठी स्पर्धात्मक परीक्षांची तयार करून घेतली जाते. ‘डिलिजंट बॅच'चा निकाल चांगला लागत असल्याने इथल्या शिक्षणाकडे विद्यार्थ्यांचा कल वाढत चालला आहे. बहुजन समाजातील विद्यार्थ्यांनी व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये चमक दाखवावी यासाठी संस्थेतर्फे हा उपक्रम राबवण्यात येत आहे." - ॲड. नितीन ठाकरे, सरचिटणीस, मविप्र.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.