Voter Registration: केंद्रीय निवडणूक आयोगाचा १ जानेवारी २०२४ या अर्हता तारखेवर आधारित छायाचित्र मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम ९ डिसेंबर २०२३ पर्यंत सुरू आहे. (Voter List Revision Special Programme camp for third gender homeless nomads today nashik news)
जिल्हा निवडणूक प्रशासनाकडून तृतीयपंथीय, देहविक्रय करणाऱ्या महिला, बेघर, भटक्या आणि विमुक्त जाती-जमाती घटकांतील व्यक्तींसाठी शनिवारी (ता. २) व रविवारी (ता. ३) विशेष शिबिर होणार असल्याने त्यात नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी केले.
मतदार यादी विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत २७ ऑक्टोबरला एकत्रित प्रारूप मतदार यादी प्रत्येक मतदान केंद्रावर व मतदार नोंदणी अधिकारी कार्यालयात प्रसिद्ध करण्यात आली आहे. प्रारूप मतदार यादीत आपले नाव आहे किंवा नाही, याची खात्री मतदारांनी करावी. मतदार यादीत नाव नसल्यास त्यासाठी आपला फॉर्म नमुना ६ म्हणजेच मतदार नावनोंदणीसाठी आवश्यक नमुना फॉर्म भरून संबंधित मतदान केंद्रस्तरीय अधिकारी किंवा तहसील कार्यालयातील मतदार मदत केंद्रात जमा करावा.
ज्या व्यक्तीचे १ जानेवारी २०२४ ला १८ वर्षे पूर्ण होत आहे; परंतु मतदार यादीत नाव नाही, अशा व्यक्तीने आपले नाव मतदार यादीत समाविष्ट करून घेण्यासाठी फॉर्म नमुना ६ भरून द्यावा. ता. १ जानेवारी २०२४ या अर्हता तारखेला १८ वर्षे वय पूर्ण करणाऱ्या मतदाराचे नाव मतदार यादीत समाविष्ट केले जाईल.
तसेच, https://voters.eci.gov.in/ या संकेतस्थळावर अथवा Voter Help line App द्वारेही मतदार आपली नावनोंदणी करू शकतात. अर्हता तारखेवर आधारित छायाचित्रासह मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम असल्याने जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदारसंघांतील मतदान केंद्राच्या परिसरात संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम राबविण्यात येणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.