Nashik Bank Election : जिल्हा सरकारी व परिषद कर्मचारी बँक निवडणुकीचा कार्यक्रम घोषित झाला आहे. बॅंकेच्या २१ जागांसाठी २ जुलै रोजी मतदान होणार असून ३ जुलै रोजी मतमोजणी होईल. अर्ज दाखल करण्यास सोमवारपासून (ता. २९) सुरवात झाली आहे.
पहिल्या दिवशी अर्ज घेण्यासाठी इच्छुकांनी गर्दी केली होती. दिवसभरात ७० अर्जाची विक्री झाली. अर्ज विक्री झालेली असली तरी, एकही अर्ज दाखल झालेला नाही. (Voting for district government and council banks on July 2 Purchase of 70 applications on first day nashik news)
प्रभारी जिल्हा उपनिबंधक एस. वाय. पुरी यांनी निवडणूक कार्यक्रम घोषित केला असून, जिल्हा निवडणूक अधिकारी म्हणून विभागीय उपनिबंधक गौतम बलसाणे यांची नियुक्ती केली आहे.
जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने बॅंकेकडून कमी करण्यात आलेल्या सेवानिवृत्त सभासदांचा मतदार यादीत समावेश करून जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने १३ हजार २४० मतदारांची अंतिम मतदार यादी १६ मे रोजी प्रसिद्ध केली होती.
इच्छुकांकडून मोर्चेबांधणी
निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर इच्छुकांकडून मोर्चेबांधणीस सुरवात झाली आहे. निवडणूक कार्यक्रम घोषित झालेला नसताना सत्ताधारी व विरोधकांनी प्रचार कार्यालये थाटत, उमेदवारांची चाचपणी सुरू केली होती.
सत्ताधारी समता पॅनलला टक्कर देण्यासाठी विरोधकांनी सहकार पॅनल उतरविण्याची तयारी केली आहे. समता पॅनलचे सहा विद्यमान संचालक विरोधी गटात सामील झाले असल्याची चर्चा असून सत्ताधाऱ्यांनीच त्यांना दूर केल्याचेही बोलले जात आहे. अर्ज दाखल करण्यास प्रारंभ झाल्याने बैठकांना जोर आला आहे.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
असा आहे निवडणूक कार्यक्रम
२९ मे ते २ जून ११ ते ३ वाजेपर्यंत अर्ज खरेदी व अर्ज दाखल करणे
५ जून २०२३ ११ वाजता दाखल अर्जाची छाननी
६ जून २०२३ ११ वाजता वैध नामनिर्देशन पत्रांची यादी प्रसिद्ध करणे
६ जून ते २० जून ११ ते दुपारी ३ अर्ज माघारी घेण्यासाठीचा कालावधी
२१ जून २०२३ ११ वाजता उमेदवारांना चिन्हाचे वाटप व अंतिम उमेदवारांची यादी प्रसिद्ध करणे
२ जुलै २०२३ सकाळी ८ ते दुपारी ४ मतदान
३ जुलै २०२३ सकाळी ८ वाजेपासून मतमोजणी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.