Nashik News : आगामी निवडणुकांमध्ये ‘नोटा’ला मतदान! दिंडोरी तालुक्यातील मराठा बांधवांचा आढावा बैठकीत ठराव

All the Maratha community members present at the review meeting.
All the Maratha community members present at the review meeting.esakal
Updated on

वणी : दिंडोरी तालुका सकल मराठा समाजाची आढावा बैठक लखमापूर फाटा येथील योगराज लॉन्समध्ये झाली. तीत मुंबई येथे २४ जानेवारीला मराठा आरक्षणासाठी काढण्यात येणाऱ्या माेर्चात सहभागी होण्याचे ठरविण्यात आले.

आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीत दिंडोरी तालुका मराठा समाज फक्त ‘नोटा’ला मतदान करून सरकारचा निषेध नोंदवेल, असा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला. (Voting for NOTA in upcoming elections Resolution of review meeting of Maratha brothers in Dindori taluka Nashik News)

करण गायकर, चंद्रकांत बनकर, बाजार समितीचे सभापती प्रशांत कड, नानासाहेब बच्छाव, वैभव वडजे आदी उपस्थित होते. करण गायकर म्हणाले, की मराठा समाजाची आरक्षणाची शेवटची लढाई असून, त्यात सर्वांनी सहभागी व्हावे.

उद्योजक प्रशांत मोगल यांनी लोकसभा व विधानसभा निवडणुकीत ‘नोटा’चे बटन दाबून सर्व मराठा समाजाने सरकारचा निषेध नोंदवावा, असा ठराव मांडला. त्यास सर्वांनी मंजुरी दिली.

All the Maratha community members present at the review meeting.
Nashik Winter Update : निफाडचा पारा घसरला; 6.5 अंश सेल्सिअस

मुंबईत होणाऱ्या आंदोलनासाठी दिंडोरी तालुका अग्रेसर राहून सर्वतोपरी मदत करण्याची ग्वाही सोमनाथ जाधव यांनी दिली. ओझरखेडचे सरपंच गंगाधर निखाडे यांनी सूत्रसंचालन केले. योगराज निगळ यांनी आभार मानले.

सरपंच विनायक शिंदे, नितीन देशमुख, वाल्मीक मोगल, विक्रम मवाळ, कृष्णा देशमुख, सचिन बर्डे, रंगनाथ जाधव, सुभाष वाळके, सचिन पवार, सोमनाथ दिघे, विजय वडजे, विलास शिवले, भास्कर पाटील, बाळासाहेब घडवजे, मनोज पडोळ, शांताराम काळोगे आदी उपस्थित होते.

All the Maratha community members present at the review meeting.
Nashik News : इगतपुरीतील 40 व्हीला, रिसॉर्ट, हॉटेलला नोटिसा! कर चुकवीत असल्याने नगरपरिषदेची कारवाई

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()