Nashik : विद्यापीठ अधिसभेसाठी जिल्ह्यात आज मतदान; 19 केंद्रे,नाशिकचे चौघे रिंगणात

Voting for Pune Vidyapith Adhisabha today
Voting for Pune Vidyapith Adhisabha todayesakal
Updated on

नाशिक : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्‍या अधिसभेवर नोंदणीकृत पदवीधर मतदार संघाकरीता निवडणूक प्रक्रिया राबविली जात आहे. याअंतर्गत दहा अधिसभा सदस्‍य निवडीसाठी रविवारी (ता.२०) सकाळी दहा ते सायंकाळी पाच या वेळेत मतदान होणार आहे. जिल्ह्यातील १९ मतदान केंद्रांवरील उपलब्‍ध चोवीस बुथवर नोंदणीकृत मतदार आपल्‍या मतदानाचा हक्‍क बजावतील. नाशिकचे चार उमेदवार निवडणूक रिंगणात असून, त्‍यांच्‍या कामगिरीकडे लक्ष लागून राहणार आहे.

गेल्‍या काही दिवसांपासून या निवडणुकीकरीता पॅनलच्‍या माध्यमातून प्रचार सुरू होता. याअंतर्गत पुणे विद्यापीठाचे कार्यक्षेत्र असलेल्‍या पुणे, नाशिक व नगर जिल्ह्यात दौरे काढत उमेदवारांकडून संस्‍थाचालक, शिक्षक, प्राध्यापक व नोंदणीकृत उमेदवारांशी संवाद साधला जात होता.

नियोजित वेळापत्रकानुसार रविवारी सकाळी दहा ते सायंकाळी पाच या वेळेत मतदान होणार आहे. एकूण दहा अधिसभा सदस्‍य निवडीसाठी होत असलेल्‍या या निवडणूक प्रक्रियेत पाच जागा खुल्‍या प्रवर्गासाठी असून, या गटातून खरी चुरस बघायला मिळते आहे. उर्वरित पाच जागा राखीव प्रवर्गासाठी असून, यापैकी प्रत्‍येकी एक एससी, एसटी, ओबीसी, एनटी, महिला राखीव आहेत. (Voting today in district for university assembly 19 centre Nashik News)

Voting for Pune Vidyapith Adhisabha today
Nashik Crime : बळी मंदिराजवळ महिलेची पोत खेचली

कोण मारणार बाजी?

अधिसभा निवडणुकीत विद्यापीठ विकास मंच, महाविकास आघाडीचे सावित्रीबाई फुले प्रगती पॅनल या दोन्‍ही पॅनलकडून प्रत्‍येकी दहा उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. तर छत्रपती शाहू महाराज परिवर्तन पॅनलकडून सहा उमेदवार या निवडणुकीला सामोरे जात आहेत. दरम्‍यान पदवीधर मतदार यापैकी कुठल्‍या पॅनलला पाठिंबा देतात, याकडे शैक्षणिक क्षेत्राचे लक्ष लागून राहणार आहे.

जिल्ह्यातील चौघांचा समावेश

निवडणुकीला एकूण ३७ उमेदवार सामोरे जात असून, नाशिक जिल्‍ह्‍यातील चौघांचा समावेश आहे. विद्यापीठ विकास मंचातर्फे सागर वैद्य आणि विजय सोनवणे हे दोघे नाशिककरांचे प्रतिनिधित्व करत आहेत. तर प्रगती पॅनलतर्फे ॲड.बाकेराव बस्‍ते आणि विश्‍वनाथ पाडवी अशा नाशिकच्‍या चौघा उमेदवारांच्‍या कामगिरीकडे लक्ष लागून राहणार आहे.

Voting for Pune Vidyapith Adhisabha today
CM Eknath Shinde Statement : उद्योगांना पायाभूत सुविधेसाठी कटिबद्ध

पॅनलनिहाय उमेदवार

महाविकास आघाडी : खुला गट : ॲड. बाकेराव बस्‍ते, संजय यादव, नारायण चापके, आकाश झांबरे, सोमनाथ लोहार. एससी- संदीप शिंदे, ओबीसी- महेंद्र पठारे, एसटी-विश्‍वनाथ पाडवी, एनटी- अजिंक्‍य पालकर, महिला गट- ॲड. तबस्‍सुम इनामदार.

विद्यापीठ विकास मंच ः खुला गट- सागर वैद्य, संतोष ढोरे, प्रसेनजित फडणवीस, युवराज नरवडे, दादाभाऊ शिनलकर. एससी- राहुल पाखरे. ओबीसी- सचिन गोर्डे, एसटी-गणपत नांगरे, एनटी-विजय सोनवणे. महिला गट- बागेश्री मंठाळकर.

छत्रपती शाहू महाराज पॅनल : खुला गट- सुनील दळवी, वाहिद शेख. एससी- शशिकांत तिकोटे. ओबीसी- मयूर भुजबळ. एसटी-देवराम चपटे. एनटी- अमोल खाडे.

निवडणुकीसाठी मतदार असे-

नाशिक जिल्‍हा----१६ हजार २२२

पुणे जिल्‍हा--------४५ हजार १९९

नगर जिल्‍हा------२७ हजार ३९१

दादरा नगर हवेली---१४

एकूण--------------८८ हजार ८२६

Voting for Pune Vidyapith Adhisabha today
Nashik Crime Update : शाळकरी मुलींची छेड काढल्याने तरुणाला चोप

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.