Yeola Market Committee Election : येवला बाजार समितीसाठी 7 केंद्रावर होणार मतदान

Agricultural Market Committee Election
Agricultural Market Committee Electionesakal
Updated on

Yeola Market Committee Election : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी शुक्रवारी जनता विद्यालयात मतदान होणार आहे. त्यासाठी सात केंद्रावर विभागणी करण्यात आली आहे.

एकाच ठिकाणी मतदान प्रकिया असल्याने ग्रामीण भागातून मतदार आणण्यासाठी उमेदवारांना कसरत करावी लागणार आहे. (Voting will held at 7 centers for Yeola Market Committee election nashik news)

बाजार समितीच्या प्रचाराचा माहोल आज थंड होणार असून शुक्रवारी सकाळी आठ ते दुपारी चारपर्यंत मतदान होणार आहे. त्यासाठी निवडणूक अधिकारी तहसीलदार आबा महाजन तसेच सहकार विभागाचे अधिकारी विजय बोरसे, बाजार समितीचे सचिव कैलास व्यापारे व कर्मचाऱ्यांनी मतदानाची सर्व तयारी केली आहे.

विंचूर रस्त्यावरील जनता विद्यालयात मतदान केंद्र असेल. या ठिकाणी सात केंद्र करण्यात आले आहेत, पहिल्या तीन केंद्रावर सहकारी संस्थेचे एक ते १०४८ मतदार मतदान करणार आहेत. चौथ्या व पाचव्या केंद्रावर ग्रामपंचायत मतदारसंघातले एक ते ८३४ क्रमांकाचे मतदार मतदान करतील.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

Agricultural Market Committee Election
Election : बाजार समितीत निवडणुकीसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज! मालेगावला शुक्रवारी 4 केंद्रांवर मतदान

सहाव्या केंद्रावर व्यापारी मतदारसंघातील ४२३ तर सातव्या क्रमांकावर हमाल व तोलारी मतदारसंघातील ३५३ मतदार मतदान करणार आहेत. एकूण २६५८ मतदार या ठिकाणी मतदानाचा हक्क बजावतील.

येथे पहिल्या तीन केंद्रावर पाच कर्मचारी, चौथ्या व पाचव्या केंद्रावर चार तर सहाव्या व सातव्या केंद्रावर तीन कर्मचारी मतदान प्रक्रिया पूर्णत्वास नेतील. या ठिकाणी पुरेसा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. शनिवारी सकाळी आठपासून मनमाड रोडवरील सिद्धार्थ लॉन्स येथे मतमोजणी होणार आहे.

Agricultural Market Committee Election
Summer Season Disease : हवामानातील बदलाने मनमाडला रुग्णांच्या संख्येत वाढ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.