नाशिक : कधी काळी वाड्यांचे टुमदार शहर अशी शहराची ओळख (Introduction of city) होती. परंतु जुन्या वाड्यांची जपवणूक करण्याचा खर्च चौपट झाल्याने अनेकांनी हे वाडे विक्रीस(sale) काढल्याने राज्यातील मोठ्या वाड्यांचे शहर अशी नाशिकची ओळख पुसली जाण्याची चिन्हे आहेत. (The Wada culture in Nashik is coming to an end)
वाडे जपणे काही परवडेना!
साधारण दोन हजारपर्यंत म्हणजेच २०-२१ वर्षांपर्यंत शहरासह पंचवटीत मोठ्या प्रमाणावर वाडे होते. बरे या वाड्यांचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांचा मुख्य दरवाजा एका गल्लीत, तर मागील दरवाजा दुसऱ्या गल्लीत अशी स्थिती होती. थोडक्यात वाडा संस्कृती मोठ्या प्रमाणावर टिकून होती. मात्र जीर्ण झालेले वाडे दुरुस्त करणे मालकांच्या आवाक्याबाहेर गेल्यावर अनेकांनी वडिलोपार्जित वैभव असलेले हे वाडे विक्रीस प्राधान्य दिले. आता त्या जागी छोटे-मोठे अपार्टमेंट उभे राहू लागले आहेत.
वाडा संस्कृतीला अपार्टमेंटचे ग्रहण
वाड्याच्या मध्यभागी असलेले चौक हे तर वाड्यांचे वैभव होते. शहरातील सोमवार पेठ, तिवंधा, बुधवार पेठ, रविवार पेठ, बोहोरपट्टी, पाटील गल्ली या जुन्या परिसरातील पंचवटीतील सरदार चौक, शनी चौक, नाग चौक, पंचवटी कारंजा, मालवीय चौक आदी भागात जुने वाडे अस्तित्वात होते. अलीकडे या वाड्यांच्या जागांना सोन्याचे मोल आल्याने अनेकांनी वडिलोपार्जित वास्तू विक्रीस काढल्या. त्या काळात सर्वच बांधकामात सागाचा वापर मोठ्या प्रमाणावर होत असल्याने या लाकडासह जुने नक्षीदार दरवाजे, खिडक्या यांना मोठे मोल आले. त्यामुळे त्याच्या विक्रीतून चांगले पैसेही मिळू लागल्याने अनेकांनी हे वाडे पाडून त्या ठिकाणी सोसायट्या, अपार्टमेंट उभी केली. अर्थात अनेक आजी-माजी लोकप्रतिनिधींनीही यात रस दाखविल्याने नव्वदच्या दशकापासूनच वाडा संस्कृतीला घरघर लागली.
अल्प भाड्यामुळे दुरुस्ती अवघड
शहरासह पंचवटी विभागात अद्यापही मोठ्या प्रमाणावर जुने वाडे अस्तित्वात आहेत. ऐसपैस असलेल्या वाड्यांमध्ये अद्यापही अनेक भाडेकरू दाटीवाटीने राहत असल्याचे दिसून येते. अर्थात यामागे नवीन घर शक्य नसल्याने तसेच अधिक भाडेही देणे अशक्य बनले आहे. त्यामुळे अनेक जण वाडा कितीही जीर्ण व पडका झाला तरी सोडत नसल्याचे दिसून येते. यातील अनेक जणांना मोठ्या जागा वापरूनही दहा-वीस रुपयांपासून शे-दिडशे भाडे आहे. मात्र एकीकडे अल्प भाडे, दुसरीकडे दुरुस्तीचा मोठा खर्च आवाक्याबाहेर असल्याने अनेकांनी जुन्या वाड्यांच्या दुरुस्तीऐवजी विक्रीस प्राधान्य दिल्याचे दिसून येते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.