Rain Update: म्हसरूळ भागात जोरदार पावसाने वाघाडीला पूर; व्यावसायिकांची पळापळ

Flood at Waghadi River
Flood at Waghadi Riveresakal
Updated on

नाशिक : सोमवारी (ता. १०) दुपारी अचानक सुरू झालेल्या जोरदार पावसाने पादचाऱ्यांसह व्यावसायिकांची चांगलीच पळापळ झाली. म्हसरूळ भागात झालेल्या जोरदार पावसानंतर वरुणेच्या (वाघाडी) पाणीपातळीत मोठी वाढ झाली. त्यामुळे गंगाघाटावरील व्यावसायिकांसह रस्त्याने जाणाऱ्यांची चांगलीच धावपळ उडाली. (Waghadi floods due to heavy rain in Mhasrul area Nashik Latest Marathi News)

Flood at Waghadi River
Nashik News : 'बकऱ्या द्या, दप्तर घ्या'; शाळा बंद झाल्याने विद्यार्थी आक्रमक

गत दोन महिने थैमान घातलेल्या पावसानंतर गेल्या काही दिवसांपासून उघडीप दिलेल्या परतीच्या पावसाने वरुणेच्या पाणीपातळीत मोठी वाढ होऊन ते पाणी थेट वाघाडीची संरक्षक भिंत ओलांडून म्हसोबा पटांगणावर पसरले. या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर प्रवासी वाहने उभी केली जातात. त्यामुळे हातावर पोट असणाऱ्या व्यावसायिकांची संख्याही या ठिकाणी जास्त आहे. दुपारी साडेचारच्या सुमारास अचानक सुरू झालेल्या या जोरदार पावसानंतर वाघाडीला मोठा पूर आला.

त्यानंतर पुराचे हे पाणी संरक्षक भिंत ओलांडून थेट म्हसोबा व मरिमाता पटांगणावर पोचले. अचानक आलेल्या या पावसानंतर नागरिकांसह येथे व्यवसाय करणारे व्यावसायिक, वाहनधारकांची पळापळ झाली. त्यामुळे वर्दळीच्या या रस्त्यावरील वाहतूक अन्य मार्गाने वळविण्यात आली. या पुराने दिवाळीसाठी विक्रीसाठी केरसुण्या घेऊन आलेल्या व्यावसायिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. रात्री उशिरा येथील पाणीपातळी कमी झाल्यावर या मार्गावरील वाहतूक सुरळीत झाली.

Flood at Waghadi River
Nashik Bus Fire Accident : अपघातानंतर NMC ॲक्शन मोडवर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.