मालेगाव (जि. नाशिक) : शहरातील रस्त्याच्या कडेला असलेले पथदीप पंचवीस वर्षांपूर्वीची जुनी आहेत. जुन्या पथदिपांमुळे महापालिकेला दरमहा ४० लाख रुपये वीजबिल भरावे लागत आहे. येथील पथदीप सोडियम व मर्क्युरी व्हेपरचे आहे.
शहरात ३२ हजार पथदीपपैकी साडेसात हजार एलईडी पथदीप महापालिकेने बसविले आहेत. त्यामुळे शहराला अद्यापही पंचवीस हजार एलईडी पथदीपांची प्रतीक्षा आहे. (Waiting for 25 thousand LED street lights in Malegaon Nashik News)
राज्यात ऊर्जेची बचत होण्यासाठी २०१८ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील सर्व महापालिका, नगरपालिका, नगरपरिषदेतील येणाऱ्या सर्व पथदिपांना एलईडी दिवे बसविण्याची घोषणा केली होती.
या निर्णयामुळे राज्यातील सर्व रस्ते चकाकणार होते. जुने सोडियम व मर्क्युरी व्हेपरच्या पथदीपांमुळे जास्त वीज व वीज बिलही दुप्पट येत होते. राज्यातील काही महापालिकेत एलईडी पथदीप बसविल्यामुळे विजेची बचत होऊन महापालिकेवर पडणारा वीज बिलात पन्नास टक्के घट होणार असल्याचे त्यांनी सांगितले होते.
श्री. फडणवीस यांनी केलेल्या घोषणेची मालेगाव महापालिकेत अंमलबजावणीची पूर्तता झाली नाही. येथील महापालिकेत चार प्रभाग आहे. या चारही प्रभागात सुमारे ३२ हजार सोडियम व मर्क्युरी व्हेपरचे पथदीप आहेत.
शहरात सर्वात जास्त १२ हजार पथदीप हे प्रभाग एक मध्ये आहे. येथील विविध भागात सात हजार पाचशे एलईडी पथदीप बसविण्यात आले आहे. येथील जुना-आग्रा रोड, नवीन बसस्थानक व शहरातील असंख्य भागात जुनाट पथदीप बसविले आहे.
यातील असंख्य पथदीप खराब व बंद अवस्थेत आहेत. शहरातील असंख्य भाग, हद्दवाढ झालेल्या भागात तसेच नवीन झालेल्या वसाहतीत एलईडी पथदिपांची प्रतिक्षा आहे. राज्य शासनाने एलईडी दिवे करिता ईईएसएल या कंपनीशी करार केला होता.
हेही वाचा : नेट बँकिंग खात्यात ठेवा कमी रक्कम...जाणून घ्या कारण
सध्या मालेगाव महापालिकेला दरमहा पथदिपांचे सुमारे ४० लाख रुपये वीज बील येते. शहरात सर्वत्र एलईडी पथदीप बसविल्यास विजेची बचत होईल. तसेच येणाऱ्या वीजबिलात ३० टक्के महापालिकेची रक्कम वाचणार आहे.
शहरातील पथदीप
प्रभाग एक - ११ हजार ९५८
प्रभाग दोन - ६ हजार २७३
प्रभाग तीन - ६ हजार ५०८
प्रभाग चार - ६ हजार ६७५
"शहरात सर्वत्र एलईडी पथदीप बसविल्यास ४० टक्के विजेची बचत होऊन बिल वाचणार आहे. महापालिकेने तो पैसा शहरातील शासकीय दवाखाने, स्वच्छता या कामासाठी वापरावा."
- हाजी आसिफ नॅशनलवाले, शहरप्रमुख, उद्धव ठाकरे गट
"शहरातील विकासापासून वंचित असलेल्या भागात तसेच येथील बाजारपेठांच्या ठिकाणी महिलांसाठी स्वच्छतागृहासाठी हा पैसा वापरला पाहिजे."- जगदीश गोऱ्हे, वंदे मातरम संघटन
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.