Nashik News : वर्षभरापासून साफसफाईची प्रतीक्षा; सप्तशृंगी माता उद्यानाची दयनीय अवस्था

Cidco Children Park News
Cidco Children Park Newsesakal
Updated on

सिडको : परिसरातील राजरत्न नगर येथील सप्तशृंगी माता उद्यानाची अतिशय दयनीय अवस्था झालेली असून गेल्या अनेक महिन्यांपासून येथील साफसफाई झालेली नसल्याचा थेट आरोप रहिवाशांनी केलेला आहे.

राजरत्न नगर सप्तशृंगी माता मंदिर उद्यानामध्ये खेळण्याची मोडतोड झालेली असून याला उदान म्हणायचे की नाही, असा नागरिकांमध्ये संभ्रम आहे. सदर उद्यानात लहान मुलांना खेळण्यासाठी एकही खेळणे शिल्लक राहिलेले नसून येथील खेळणी गेली कुठे असा प्रश्न मात्र या अनुषंगाने उपस्थित होत आहे. (Waiting for cleaning for a year Deplorable condition of Saptashrungi Mata Park Nashik News)

Cidco Children Park News
Nashik News : सायकलींग हा आरोग्यदायी व्यायाम

उद्यानाच्या परिसरामध्ये मोकाट श्वानांचा सर्रास वावर असून या गंभीर बाबीकडे महानगरपालिका प्रशासन कधी लक्ष देईल, असा सवाल देखील याप्रसंगी उपस्थित करण्यात आला होता.

उद्यान परिसराच्या अवतीभवती मोठ्या प्रमाणावर वृक्ष वाढलेले असून या वृक्षांच्या फांद्या कधीही तुटून गाड्यांवर पडण्याचे प्रमाण घरांवर पडण्याचे प्रमाण वाढलेले आहे. या फांद्या छाटण्यासाठी वारंवार उद्यान विभागात सांगितल्यानंतर देखील काही उपाययोजना होत नाही.

सप्तशृंगी माता मंदिर उद्यान

फांद्या पडतात

स्वच्छता पाहिजे

कचरा जाळतात, क्वचित भरायला येतात

पथदीप नादुरुस्त

गाजर गवत वाढलेले

सुरक्षा गेट तुटलेले

पथदीप वायर उघड्या आहेत

हेही वाचा : प्रेमाला धर्म आहे...?

Cidco Children Park News
Leopard News : बिबट्यांची पिंजऱ्यांना हुलकावणी; ग्रामीण भागातील नागरिकांचे पशुधन धोक्यात

"उद्यानाच्या सभोवतालच्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर वृक्षांच्या फांद्या वाढलेल्या असून या फांद्या कधीही तुटून गाड्यांवर पडतात घरांवर पडतात यामुळे रहिवासी यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असून एखाद्यावेळेस आपण यामुळे भीषण प्रसंग वाढवण्याची शक्यता ना करता येत नाही."

- कमल साळुंखे, गृहिणी

"उद्यान परिसरामध्ये मोकाट सोन्याचा भाव वाढलेला असून नाशिक महानगरपालिका प्रशासनाने यावर त्वरित उपाययोजना करायला हवी. या आधी राजरत्न नगर परिसरातच पिसाळलेल्या मोकाट श्‍वानाने अनेकांना चावा घेतल्याची घटना देखील घडलेली होती."

- सोनल पवार, गृहिणी

"उद्यानामधील कचरा साफसफाई केल्यानंतर हा एका ठिकाणी गोळा करून येथे जाळला जातो हा उचलून नेण्याची तसदी नाशिक महानगरपालिका प्रशासन घेत नाही. तिकडे नागरिकांनी उघड्यावर कचरा जाळला असल्यास त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येते तर या महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांवर किंवा कर्मचाऱ्यांवर का नाही."

- स्वाती गोंधळे, गृहिणी

"उद्यानातील विविध समस्या सोडवल्या गेल्या पाहिजे. वारंवार तक्रारी करून देखील उद्यानातील समस्या सोडवण्यात येत नसल्याने याला खरंच उद्यान म्हणावे का असा प्रश्न उपस्थित राहत आहे. प्रशासनाने त्वरित यावर दखल घेऊन येथील समस्या सोडवायला पाहिजे."

- साधना सोनवणे, गृहिणी

Cidco Children Park News
Nashik News : नायलॉन मांजामुळे तरुण गंभीर जखमी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.