Nashik News : नामपूरच्या स्वच्छतागृहाला उद्घाटनाची प्रतीक्षा

A toilet waiting to be inaugurated surrounded by prickly acacia near the entrance of the central bus station.
A toilet waiting to be inaugurated surrounded by prickly acacia near the entrance of the central bus station.esakal
Updated on

नामपूर (जि. नाशिक) : येथील मध्यवर्ती बसस्थानकाच्या प्रवेशद्वाराजवळ गेल्या दोन वर्षांपासून लाखो रुपयांच्या विनियोगातून बांधलेल्या स्वच्छतागृहाच्या उद्घाटनाला परिवहन महामंडळाला मुहूर्त सापडत नसल्याने दुरवस्था झाली आहे.

उद्घाटनापूर्वीच स्वच्छतागृहाला काटेरी बाभळींचा विळखा वाढल्याने पैसा गेला पाण्यात अशी अवस्था झाली आहे. त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकामी लक्ष घालून स्वच्छतागृह कार्यान्वित करावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. (Waiting for inauguration of Nampurs toilet msrtc bus depot Nashik News)

गेल्या काही वर्षांपासून बसस्थानकाच्या आवरात अस्वच्छता, दुर्गंधी, सफाई कामगारांचा अभाव, डांबरीकरणाचे रखडलेले काम, प्रवेशद्वारासमोर असलेली खड्डे पिण्याच्या पाण्याची टंचाई, मोकाट जनावरांचा त्रास आदी बाबींमुळे येथील बसस्थानक असुविधांच्या विळख्यात सापडले आहे.

बसस्थानकात परिवहन महामंडळाने लाखो रूपये खर्च करत स्वच्छतागृह बांधण्यात आले होते. हे स्वच्छतागृह बांधून दोन वर्षाचा कालावधी उलटला असला तरी अद्यापही या स्वच्छतागृहाचे उद्घाटन झाले नसल्याने ते वापराविना पडून आहे. त्यामुळे या ठिकाणी काटेरी बाभूळ, वेलींचा विळखा पडला आहे.

बसस्थानकाच्या आवारात असणाऱ्या उघड्या गटारामुळे पसरलेली दुर्गंधी, आवारात वाढलेल्या काटेरी बाभळी, मोकाट जनावरांचा मुक्त संचार, यामुळे बसस्थानकाची अक्षरशः कचराकुंडी झाली आहे. याबाबत अनेकदा तक्रारी करूनही दखल घेतली जात नसल्याने नागरिक नाराज आहेत.

मोसम खोऱ्याची मध्यवर्ती व्यापारी बाजारपेठ म्हणून शहराचा विकास होत आहे. भविष्यातील तालुका म्हणूनही नामपुरकड़े पाहिले जाते. परिसरातील ३० ते ३५ खेड्यांच्या सहवासामुळे दिवसभर मोठ्या संख्येने प्रवाशांची बसस्थानकात वर्दळ असते.

हेही वाचा : शॉर्ट सेलर्स म्हणजे नक्की कोण?

A toilet waiting to be inaugurated surrounded by prickly acacia near the entrance of the central bus station.
Nashi news : आपसांत मिटतील शेतीतील वैरभावना : शरद घोरपडे

परंतु बसस्थानकात प्रवाशांना सुविधा मिळत नसल्याने प्रवासी वर्गाने नाराजी व्यक्त केली आहे. बसस्थानकाच्या आवारात गेल्या अनेक वर्षांपासून काटेरी बाभळी वाढल्या आहेत. आवारात मोकाट जनावरांचा मुक्त संचार असल्याने अस्वच्छतेत भर पडली आहे. परिसरातील नागरिक कचरा फेकण्यासाठी अनेक जण बसस्थानकाची निवड करतात.

काही वर्षांपूर्वी मध्यवर्ती बसस्थानक परिसरातील सांडपाण्याचा निचरा करण्यासाठी सार्वाजनिक बांधकाम विभागाच्या वतीने गटारीचे काम हाती घेण्यात आले होते, परंतु एसटी प्रशासनाने आक्षेप घेतल्याने काम रखडले. त्यांनतर अंतर्गत गटारीचे काम झाले असले तरी अस्वच्छ व खुल्या गटारामुळे प्रवाशांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

A toilet waiting to be inaugurated surrounded by prickly acacia near the entrance of the central bus station.
Nashik News : स्मशानभूमी शेडसाठी अवघे 24 लाख; सुविधांची वाणवा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.