Nashik News : औद्योगिक क्षेत्रातील पंढरी म्हणून दिंडोरी तालुक्याचा नावलौकीक असला, तरी आजही तालुक्यातील महत्त्वाच्या गावांना लालपरीसाठी स्थानक नसल्याने प्रवाशांचे मोठे हाल होत आहे. (Waiting for Lalparila stations in Dindori taluka Plight of commuters during monsoons and summers Nashik News)
आदिवासी उपयोजनेतून दिंडोरी, पेठ, सुरगाणा, कळवण आदी ठिकाणच्या बसस्थानकांसाठी शासनाकडून ३५ कोटी रुपये मंजूर झाले असून, त्याठिकाणांच्या बसस्थानकांना झळाळी मिळणार आहे.
मात्र, तालुक्यातील लखमापूर, लखमापूर फाटा, वलखेड फाटा, अक्राळे फाटा, खतवड फाटा, वरखेडा, पश्चिम पट्ट्यातील अनेक गावांना बसस्थानक नसल्याने तेथील प्रवासी, विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणावर हाल होत आहेत.
फक्त ‘हात दाखवा, बस थांबवा’, या ब्रीद वाक्याप्रमाणे याठिकाणी बस थांबते व प्रवासी वर्गाला ने-आण करते. विशेष म्हणजे लखमापूर फाटा दळणवळणाच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा मानला जातो. तेथे मोठ्या प्रमाणावर प्रवासी, नागरिकांची गर्दी असते.
लखमापूर गावातून तालुक्यांच्या ठिकाणी जाण्यासाठी दहेगाव, वागळुद, म्हेळुसके, ओझे, करजंवण आदी ठिकाणचे प्रवासी येतात. येथेही बसस्थानक नसल्याने प्रवाशांमध्ये संताप व्यक्त होत आहे.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
बसस्थानक नसल्याने उन्हाळ्यात व पावसाळ्यात मिळेल, त्याठिकाणी आश्रय घेऊन उभे राहावे लागते. तोपर्यंत बस निघून जाते. त्यामुळे प्रवाशांची ची गैरसोय होते. १९८१ ते २००१ पर्यंत लखमापूर फाट्यावर बसस्थानक होते.
ते बसस्थानक आता नजरेआड गेले आहे. तालुक्यात काही गावांना बसस्थानक आहे, पण ज्या गावांमध्ये मोठ्या प्रमाणावर प्रवासी वर्दळ आहे.
नेमके त्याच गावांना बसस्थानक नाही. काही गावांना खासदार, आमदार निधीतून बसस्थानकांची निर्मिती करण्यात आली आहे.
लखमापूर, लखमापूर फाटा, वलखेड फाटा, वनारवाडी फाटा, अक्राळे फाटा, खतवड फाटा, पिंपळनारे फाटा आदी गावांना बसस्थानक का नाही, असा संतप्त सवाल परिसरातील नागरिकांनी उपस्थित केला आहे.
"ग्रामीण भागातील प्रवासी लालपरीच्या प्रवासाला पसंती देतात. मात्र, अनेक ठिकाणी बसस्थानके नाहीत. यामुळे पावसाळा, उन्हाळ्यात प्रवाशांना टपरी, हॉटेलजवळ अथवा दुकानच्या पडवीत जीव मुठीत घेऊन आश्रय घ्यावा लागत आहे. शासनाने निरीक्षण करून ज्या गावांना बसस्थानक नाही, त्याठिकाणी बसस्थानकाची निर्मिती करावी. जेणेकरून प्रवाशांची होणारी गैरसोय थांबेल."
-अजित कड, उपसरपंच, दहेगाव
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.