Nashik News : गोदामाईला प्रतीक्षा महाआरतीची

पुरातन काळापासून दक्षिण भारतातील ‘गंगा’ म्हणून परिचित असलेली गोदावरी नदी सर्वज्ञात आहे.
Waiting for Mahaarti at godavari river artical nashik
Waiting for Mahaarti at godavari river artical nashikesakal
Updated on

Nashik News : पुरातन काळापासून दक्षिण भारतातील ‘गंगा’ म्हणून परिचित असलेली गोदावरी नदी सर्वज्ञात आहे. गंगा, यमुना नदीनंतर गोदावरीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. मृत्यूनंतरही पापमुक्ती देणाऱ्या गोदावरीचे धार्मिक महत्त्व पाहता, गंगा नदीच्या महाआरतीच्या धर्तीवर गोदावरी नदीचीही महाआरती नियमित सुरू व्हावी, यासाठी नाशिककर आग्रही आहेत.

परंतु शासकीय लालफितीच्या कारभारामध्ये ‘गोदावरी महाआरती’ची संकल्पना अडकली आहे. भक्ती-मुक्ती-शक्ती या कॉरिडॉर विकासाच्या माध्यमातून गोदावरी महाआरतीला चालना मिळाल्यास धार्मिक पर्यटनाच्या दृष्टिकोनातून ही बाब उल्लेखनीय ठरू शकेल. - नरेश हाळणोर (Waiting for Mahaarti at godavari river artical nashik news)

हिमालयात प्रत्यक्ष शिवशंकराच्या जटातून धर्तीवर अवतरलेल्या गंगा नदीचे गोदावरी ही प्रतिरूप म्हटले जाते. गोदावरीच्या उगमामागेही काही धार्मिक आख्यायिका आहेत. त्र्यंबकेश्वरच्या ब्रह्मगिरी पर्वतावर ध्यानधारणा करणाऱ्या गौतम ऋषींच्या हातून गोहत्येचे पाप घडले. त्याचे पापशालन होण्यासाठी, या पापातून मुक्ती मिळविण्यासाठी त्यांनी ब्रह्मगिरी पर्वतावर त्यांच्या जटा आपटल्या आणि तेथूनच गोदावरीचा उगम झाला, अशी आख्यायिका आहे.

ब्रह्मगिरी पर्वतावरून गुप्त झालेली गोदावरी ब्रह्मगिरीच्या पायथ्याशी दृश्यरूपात अवतरली, तेच कुशावर्त... याच गोदावरीत स्नान केल्यानंतर गौतम ऋषी पापमुक्त झाले, अशी आख्यायिका आहे. रामायणातही गोदावरीचा उल्लेख येतो. प्रभू श्रीरामचंद्र पत्नी सीता व बंधू लक्ष्मण यांच्यासमवेत वनवासात असताना पंचवटीतील गोदाकाठावरच निवासाला होते. गोदाघाटावर रामकुंड व लक्ष्मणकुंड, तर तपोवनात सीताकुंड आजही अस्तित्वात आहे.

गोदावरीचे आणखी एक महत्त्व म्हणजे, मृत्यूनंतरही पापमुक्ती करणारी ही गोदामाई आहे. रामकुंडात अस्थींचे विसर्जन केल्यास ते गोदावरीच्या पाण्यात वितळून जातात. याचाच अर्थ त्या व्यक्तीला पापमुक्ती मिळते, मोक्षप्राप्ती होते, असे मानले जाते. अशा या असाधारण महत्त्व असलेल्या गोदावरीची नियमित महाआरती व्हावी, यासाठी काही वर्षांपासून रामतीर्थ गोदा सेवा समितीच्या माध्यमातून सातत्याने पाठपुरावा सुरू आहे.

Waiting for Mahaarti at godavari river artical nashik
PM Modi Nashik Visit : पंतप्रधानांच्या स्वागतासाठी नाशिक सज्ज! जाहीर सभा, ‘रोड शो’सह घेणार श्री काळाराम दर्शन

गोदावरीचा जन्म माघ महिन्याच्या शुद्ध दशमीला जातो. यामुळे याच दिवशी गोदावरीचा जन्मोत्सव साजरा होतो. यानिमित्ताने अनेक वर्षांपासून गोदावरीचे विधिवत पूजन करून महाआरती केली जाते. याच पार्श्वभूमीवर गोदावरीचीही गंगा नदीच्या महाआरतीच्या धर्तीवर महाआरती नियमित व्हावी, अशी मागणी अनेक वर्षांपासून सुरू आहे. दक्षिण भारतातील सर्वाधिक लांबी असलेल्या गोदावरीने महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांना तारले आहे.

गोदावरी खोऱ्याच्या सुपीकतेमुळे नाशिक जिल्हा सुजलाम्‌-सुफलाम् झाला आहे. गंगा नदीच्या महाआरतीच्या धर्तीवर गोदामातेचीही महाआरती होण्याने नाशिकच्या धार्मिक पर्यटनात भरच पडणार आहे. प्रभू श्रीरामाच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पंचवटीमध्ये मोठ्या संख्येने भाविक येत असतात. सिंहस्थ कुंभमेळ्यामुळे नाशिकचा नावलौकिक आंतरराष्ट्रीय पातळीवर पोचला आहे.

परंतु असे असतानाही गोदावरीची महाआरती फक्त तिच्या जन्मोत्सवालाच केली जाते. ही महाआरती नियमित व्हावी, यासाठी रामतीर्थ गोदा सेवा समितीच्या माध्यमातून राज्य शासनाकडे मागणी करण्यात आली आहे. त्यास शासनमान्यता मिळावी, यासाठी समितीमार्फत सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. गंगेच्या धर्तीवर गोदामातेची महाआरती होऊ लागल्यास तिचे धार्मिक महत्त्व अधोरेखित होऊ शकेल. यामुळे शहराच्या धार्मिक पर्यटनालाही चालना मिळेल.

''गोदावरीचा जन्मोत्सव माघ महिन्याच्या शुद्ध दशमीला मोठ्या उत्साहाने साजरा होतो. त्याच दिवशी सायंकाळी महाआरती होत असते. या महाआरतीला शासनमान्यता मिळावी, गोदामायची महाआरती नियमित व्हावी, यासाठी शासनाकडे पाठपुरावा सुरू आहे. गंगेच्या धर्तीवर गोदामायची महाआरती व्हावी, अशी तिच्या लेकरांची मागणी आहे.''- जयंत गायधनी, अध्यक्ष, रामतीर्थ गोदा सेवा समिती, नाशिक

Waiting for Mahaarti at godavari river artical nashik
PM Modi In Nashik : मोदीमय वातावरणासाठी गिरीश महाजनांची शाळा; सभास्थळी नेतागिरी न करण्याचा पदाधिकाऱ्यांना सल्ला

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.