सिन्नर (जि. नाशिक) : तालुक्याचे राजकारण हे व्यक्ती केंद्रित मानले जाते. सद्यःस्थितीत आमदार माणिकराव कोकाटे व माजी आमदार राजाभाऊ वाजे, उदय सांगळे यांच्या भोवतीच सिन्नरचे राजकारण फिरत आहे. यातच नाशिक जिल्हा मजूर फेडरेशनच्या निवडणुकीत आमदार कोकाटे यांचे बंधू भारत कोकाटे यांनी आमदार समर्थक दिनकर उगले यांचा अवघ्या दोन मतांनी पराभव केला.
या पराभवाने मात्र कोकाटे यांच्यातील कौटुंबिक संघर्षाचा फायदा वाजे-सांगळे गटाला झाला आहे. आमदार कोकाटेंना त्यांच्या बालेकिल्ल्यात विरोध करण्यासाठी वाजे, सांगळे यांना भारत कोकाटे यांच्या रूपाने मोहरा सापडला आहे. (Waje faction gains political strength in family conflict nbharat kokate won Labor Federation Elections nashik news)
भारत कोकाटे यांच्याकडून आमदार माणिकराव कोकाटे यांना सातत्याने विरोध सुरू आहे. स्थानिक ग्रामपंचायत, विकास सोसायटीची निवडणूक असो किंवा होऊ घातलेल्या जिल्हा परिषद, पंचायत समितीची निवडणूक या सर्वच ठिकाणी भारत कोकाटे यांच्याकडून आमदार कोकाटे व त्यांच्या कन्या सीमंतिनी कोकाटे यांना आव्हान दिले जात आहे. हा कौटुंबिक संघर्ष असला तरी त्याचा थेट परिणाम सिन्नरच्या राजकारणात होत आहे.
भारत कोकाटे यांनी जिल्हा परिषदेच्या देवपूर-शहा गटामध्ये उमेदवारीसाठी जोरदार मोर्चे बांधणी केली आहे. सोमठाणे ग्रामपंचायत अथवा विकास सोसायटीच्या निवडणुकीत त्यांनी आपले उपद्रवमूल्य दाखवून दिले आहे. आता देखील मजूर फेडरेशनच्या निवडणुकीच्या माध्यमातून आमदार कोकाटे यांच्या गटाकडून दिनकर उगले व विरोधात वाजे-सांगळे गटाकडून भारत कोकाटे अशी दुरंगी लढत बघायला मिळाली.
हेही वाचा : क्रेडिट कार्ड वापरताय...मग या गोष्टी माहिती हव्याच....
आमदार कोकाटे यांनी स्वतः दिनकर उगले यांच्यासाठी रणनीती तयार केली. त्यामुळे दिनकर उगले सहज निवडून येतील अशी अटकळ असताना भारत कोकाटे यांनी आमदार गटाला सुरुंग लावत दोन मतांनी विजय मिळवला. मजूर फेडरेशनची निवडणूक केवळ आमदार समर्थक उगले यांचा पराभव व भारत कोकाटे यांचा विजय अशी नाही तर सिन्नरच्या राजकारणात वाजे-सांगळे यांच्या गटाला बळ देणारी ठरली आहे.
मतभेदांमुळे दोघे भाऊ आमने-सामने
कुटुंबातील मतभेदांमुळे भारत कोकाटे यांनी आमदार माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात दंड थोपटले. स्वतःच्या मतांवर ठाम राहण्याच्या स्वभावामुळे आमदार कोकाटे यांनी देखील सख्ख्या भावाला राजकीय शुभेच्छा दिल्या.
त्यातून सोमठाणे ग्रामपंचायत, सोसायटी निवडणुकीला सत्ता संघर्ष तालुक्याने पाहिला. माजी आमदार राजाभाऊ वाजे व उदय सांगळे यांच्या गटाने देखील कोकाटे यांना राजकीय राजकीय पाठबळ दिले आहे. त्यामुळे भाऊबंदकीचा हा वाद पराकोटीला पोचला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.