Health Care : ब्राह्ममुहुर्तावर उठा, ताजेतवाने व्हा! मानसिक संतुलन, बुद्धीच्या संरक्षणासाठी ठरते फायदेशीर

Brahmamuhurta
Brahmamuhurtaesakal
Updated on

पल्लवी कुलकर्णी-शुक्ल : सकाळ वृत्तसेवा

नाशिक : ब्राह्ममुहूर्त म्‍हणजे पहाटेपूर्वीचा मुहूर्त. सूर्योदय सकाळी सहाला असल्‍यास स्थानिक वेळेनुसार ब्रह्ममुहूर्त पहाटे ४ वाजून २४ मिनिटे ते ५ वाजून १२ मिनिटांच्या दरम्‍यान असेल. त्यात सूर्यादयाच्या वेळेनुसार बदल होत राहील. ब्राह्म मुहूर्तावर उठल्‍यास हृदयाच्या अथवा आत्‍म्‍याच्या जवळ जावून आपणाला काय परिणामकारक आहे, याचा शोध घेता येतो. स्‍वतःचा विकास साधता येतो. (Wake up on Brahmamuhurta Mental balance beneficial for protection of intellect Nashik News)

सूर्याने नव्या दिवसाची सुरवात करण्यासाठी सूर्य उगवण्यापूर्वीचा रात्रीचा हा शेवटचा काळ असतो. ॠषीमुनी, विद्वान या वेळेचा उपयोग स्‍वतःच्या ज्ञानवृध्दीसाठी करतात. या काळात ऊर्जा सर्वार्थांनी तेज, विद्वत्‍ता, उष्‍मा, उल्‍हास या रूपातून प्रकट होत असते. ब्राह्म मुहूर्ताचा काळ प्रखर प्रकाशापूर्वीचा शुभ्र, कोवळया सूर्यकिरणांच्या साहाय्याने झाडांनी प्राणवायूच्या निर्मितीच्या प्रक्रियेला गती दिल्याने वातावरण स्‍वच्छ असते.

'प्रदूषणकारी घटक अल्‍यल्‍प प्रमाणात असतात. आवाज-गोंगाट नसल्‍याने तसेच हलकेपणा, शुध्दता व सूक्ष्म ऊर्जा यामुळे वातावरण प्रसन्नदायी असते. वातावरणातील पवित्र लहरींचे वहन या काळात होते. या क्रियांमुळे आपले मन व आत्‍मा हे शरीर आणि आपण निर्माण केलेल्‍या जीवनाशी एकरूप होतात.

Brahmamuhurta
Nashik News : नाशिक फिल्म इंडस्ट्री होण्यासाठी तिसऱ्या मालिकेच्या चित्रीकरणाचा श्रीगणेशा!

ब्राह्म मुहूर्तावरील क्रिया

पहाटे लवकर म्‍हणजेच चार ते सहाची वेळ अत्‍मानुभूती, शांतता, निसर्ग, ध्यान, योग यासाठी सर्वोत्‍कृष्‍ट असते, त्यावेळी स्‍वतःसाठी एक ते दोन तास देणे आवश्‍यक आहे. या काळात ध्यान करणे अथवा धावायला जाणे फायदेशीर असते. आपल्‍या शरीराच्या प्रतिक्रियांचा अंदाज घेऊन आपल्‍यातल्‍या सहज प्रवत्‍तीनुसार व्यायाम करावा.

सकाळी सहा ते सात या वेळेत स्‍वतःला पुढील दिवसासाठी तयार करावे. विद्यार्थ्यांच्या ज्ञानवृद्धीसाठी हा उपयुक्त काळ असतो. ब्राह्म मुहूर्तात शरीर हलके असते, असे आयुर्वेद नमूद आहे. चिंताग्रस्‍त व्यक्‍तीचे असंतुलन दूर करण्यासाठी पहाटे उठून निसर्गाच्या सान्निध्यात फिरल्‍यास व व्यायाम केल्‍यास मन शांत होते.

सकाळी लवकर उठावे

ब्राह्म मुहर्ते उत्‍तिष्‍ठत स्‍वस्‍थो रक्षार्थम्‌ आयुष्‍यः|

संदर्भ-वाग्‍भटाचे अष्‍टांग हृदय (अध्याय २, श्‍लोक १). अर्थात, निरोगीपणाचे परिपूर्ण आयुष्‍य जगायचे असेल आणि बुध्दीचे संरक्षण करून आनंदी राहायचे असेल, तर प्रत्‍येकाने सकाळी लवकर ब्राह्म मुहूर्तावर उठले पाहिजे.

हेही वाचा : Love Jihad: प्रेमाला धर्म आहे...?

Brahmamuhurta
Nashik News : अखेर विधी अभ्यासक्रमांच्या वेळापत्रकात बदल; AISFच्या मागणीला यश

"पहाटे उठल्‍यावर शांतता असल्‍याने अभ्‍यासात एकाग्रता वाढते. त्‍यामुळे अभ्‍यास लवकर लक्षात आल्‍याने गती वाढते." - आर्यन जोशी (विद्यार्थी)

"पहाटे उठल्‍यावर वातावरणातील प्रसन्नता मनाला भावते. निसर्गाच्या सान्निध्यात फिरण्याचा मोह होतो. विसरायला होत होते, मात्र सकाळी उठल्‍यावर फिरायला जायला लागल्‍यापासून विस्‍मरणाचे प्रमाण कमी झाले आहे. ‍यामुळे शरीराला व मनाला दिवसभराची स्‍फूर्ती मिळते."

- वासुदेव शिंगणे, ज्‍येष्‍ठ नागरिक.

"पहाटे उठून केलेला व्यायाम, प्राणायाम केल्याने मनास शांत वाटते. तसेच ध्यानात मन व शरीर खूप हलके झाल्‍यासारखे वाटते. दिवसभरात ताजेतवाने राहता येते."

- चारूशिला शिंगणे (नाशिक)

Brahmamuhurta
Nashik News : भाऊसाहेब चौधरींचे नाव हटवण्यासाठी क्रेनचा वापर! शिवसैनिकांची संतप्त प्रतिक्रिया

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.