Wani Accident Case: घाटातील अपघात टाळण्यासाठी भक्कम संरक्षक कठडे अन् लोखंडी बॅरीकेटची आवश्यकता...

strong protective wall and iron barricade at this place in wani ghat
strong protective wall and iron barricade at this place in wani ghatesakal
Updated on

Wani Accident Case : नांदुरी - सप्तशृंगी गड घाट रस्त्यावरील धोकेदायक वळणावर चार फुटांपर्यंत संरक्षक भिंत व लोखंडी संरक्षक बॅरीकेट सह संपूर्ण घाट रस्ताच्या दोन्ही बाजुस सार्वजनिक बांधकाम विभागाने स्पार्कल रेडियम प्लेट रिफलेक्टर बसवण्याची मागणी भाविकांकडून सातत्याने होत आहे.

बुधवार, ता. १२ रोजी राज्य परिवहन महामंडळाची बस दरीत कोसळल्याने झालेल्या अपघातानंतर जिल्ह्यचे पालकमंत्री दादाजी भुसे यांनी भाविक व सप्तशृंग गड ग्रामस्थांच्या मागण्यांची गांर्भीयाने नोंद घेत सप्तशृंगी गडावर जाणाऱ्या रस्त्यावर तातडीने रिफ्लेक्टर लावणे व तेथील कठड्यांची उंची वाढविणे यासंदर्भात कामे पूर्ण करावीत, असे आदेश नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांनी जिल्हाधिकारी व बांधकाम विभागास केलेले आहेत. (Wani Accident Case Need for strong protective wall and iron barricade to prevent accident in ghat nashik)

बुधवारी, ता. १२ रोजी राज्य परिवहन महामंडळाच्या खामगांव - सप्तशृंगी गड या बसला सकाळी ६. ४५ वाजेच्या दरम्यान सप्तशृंगी गड घाटातील गणपती टप्पावरील घाट वळणावर घाटात असलेले दाट धुक्यामूळे बस चालकाला वळणाचा अंदाज न आल्याने दगड रचून ठेवेलेला कुमकुवत अशी संरक्षक अडीच फुटाची भिंत तोडून बस सुमारे ४०० फुट खोल दरीत कोसळली.

या अपघातात दुर्दैवाने एका महिला भाविकाचा मृत्यु झाला असला तरी सुदैवाने बस पलटी होवून घाटात हेलफाटे खात दरीत न कोसळल्या सरळ जावून दगड झुडुपांना अडकली त्यामूळे सुदैवाने मोठी जिवीत हाणी टळली.

या अपघाताचे व यापूर्वी घडलेल्या घटनांची कारणमिंमासा विचार करता वाहनचालकांची काहीशी चुक असली तरी गडावर पावसाळयात दाट धुके असते. पाऊस सुरु असतांना धुक्याचे प्रमाण हे काही प्रमाणात कमी असते, मात्र पाऊस उघडल्यानंतर दाट धुके असते.

यावेळी दिवसाही या भागाल वाहानांना साईड इंडीकेटर व हेड लॅम्प चालू करुन सावधानतेने व मर्यादीत वेगात वाहन चालवावे लागते. त्यात रात्री व पहाटेच्या दरम्यान वाहन चालविणे म्हणजे जीव मुठीत घेवूनच वाहन चालविण्याची मोठी कसरत वाहनचालकांना करावी लागते.

त्यामुळे चालकांबरोबर वाहानातील प्रवाशी भाविकांमध्ये काहीशी भिती असते. यासर्व बाबींचा विचार करुन सप्तशृंगी गड ग्रामपंचायत, सप्तशृंगी निवासिनी देवी ट्रस्टने सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वेळोवेळी पत्र व्यवहार केलेले आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

strong protective wall and iron barricade at this place in wani ghat
Nashik Bus Accident : सप्तश्रृंगी घाटात भीषण अपघात; मृत महिलेच्या वारसाला मिळणार दहा लाख, CM शिंदेंची घोषणा

मात्र याबाबत अपेक्षित कार्यवाही सार्वजनिक बांधकाम विभागाकडून होत नसल्याने भाविक व ग्रामस्थांमध्ये रोष आहे. आजच्या घटनेनंतर पालकमंत्री दादाजी भुसे यांनी गांभीर्याने दखल घेत कार्यवाहीचा आदेश दिला आहे. याबाबत सदरचा विभाग किती कार्य तत्परता दर्शवितो हे बघने औत्सुक्याचे ठरेल.

भविष्यात या घाट रस्त्यावर मोठा अपघात होवू नये यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने या घाट रस्त्यावर चार फुट उंची पर्यंत अडीच ते तीन फुट रुंदीची पक्या स्वरुपात संरक्षक भिंत तसेच वळण रस्त्यावर भिंती बरोबरच लोखंडी संरक्षक बॅरीकेटस व रस्त्याच्या दोन्ही बाजुस स्पार्कल रेडियम प्लेट रिफलेक्टर व जागोजागी दिशा दर्शक फलक लावणे अत्यंत गरजेचे आहे.

तसेच पावसाळ्यात यु टर्न पासून पुढील तीन किमी अंतरापर्यंत डोंगर कड्याचा धोकादायक भाग असून या भागात दरड पावसाळ्यात दरड कोसळण्याच्या घटनाही सातत्याने होत असतात. यातही सुदैवाने जिवीत हाणी झालेली नसली तरी मंदीर शिखरावर ज्या प्रमाणे लोखंडी जाळीचे कवच लावले आहे. त्याप्रमाणे लोखंडी जाळी बसविण्याचे कामही करणॆ अत्यावश्यक आहे.

strong protective wall and iron barricade at this place in wani ghat
Wani Accident News: जखमींच्या मदतीसाठी धावले शेकडो हात! आपत्ती निवारण पथकासह नांदुरी, वणीच्या ग्रामस्थांची मदत

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.