Wani Accident News: जखमींच्या मदतीसाठी धावले शेकडो हात! आपत्ती निवारण पथकासह नांदुरी, वणीच्या ग्रामस्थांची मदत

Troops from the disaster management team of the trust carrying the injured in a bus accident on stretchers and shoulders.
Troops from the disaster management team of the trust carrying the injured in a bus accident on stretchers and shoulders.esakal
Updated on

Wani Accident News : आदिमाया सप्तशृंगीमातेचे दर्शन घेऊन परतणाऱ्या भाविकांच्या महामंडळाच्या बसला सप्तशृंगगड (वणी) घाटात अपघात झाला. अपघाताची माहिती मिळताच सप्तशृंगी निवासिनी देवी ट्रस्टची रेस्क्यू टीम, नांदुरी व सप्तशृंगगडावरील ग्रामस्थांसह अनेक संवेदनशील व्यक्तींनी घटनास्थळी धाव घेतली.

केवळ बघ्याची भूमिका न घेता अनेकांनी मदतकार्यात प्रत्यक्ष सहभाग घेतला. जखमींना वेळीच वणी येथील ग्रामीण रुग्णालयात हलवून त्यांच्यावर वेळीच उपचार सुरू झाले.

या कार्यात मदत करून मदतीचा हात देणाऱ्यांसह नांदुरी व वणीचे ग्रामस्थ, वणी डॉक्टर असोसिएशन आणि रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी, आरोग्य कर्मचाऱ्यांचे मानवतेचे दर्शन घडले. (Wani Accident Hundreds of hands rushed to help injured Assistance to villagers of Nanduri Vani along with Disaster Relief Team nashik)

अपघाताची माहिती येताच वणी ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी जखमींवर उपचारांची पूर्वतयारी करून ठेवली होती. जखमींवर उपचारांसाठी वणी डॉक्टर असोसिएशनची टीमही रुग्णालयात दाखल झाली होती.

तोपर्यंत नांदुरी, सप्तशृंगगड व ट्रस्टचे पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांनी रुग्णवाहिकांना पाचारण केले होते. सकाळी पावणेआठला वणी ग्रामीण रुग्णालयात सप्तशृंगी निवासिनी देवी ट्रस्टच्या दोन रुग्णवाहिकांसह वणी, अभोणा, नांदुरी, दिंडोरी, कळवण, बोरगाव आदी ठिकाणच्या १०८ व १०२ रुग्णवाहिकांद्वारे जखमींना उपचारांसाठी आणण्‍यात येत होते.

जखमींवर तातडीने वणी ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी, आरोग्य कर्मचारी उपचार करीत होते. गंभीर जखमींना प्राथमिक उपचारांनंतर जिल्हा रुग्णालयात पाठविण्याची व्यवस्थाही तिथे उपस्थित असलेले नागरिक करीत होते.

घटनेनंतर कोणीही वैयक्तिक अथवा आपल्या संघटनेचे असे म्हणून काम न करता एकसंघ राहून दुपारपर्यंत मदतकार्य केले. यात सप्तशृंग निवासिनी देवी ट्रस्टच्या रेस्क्यू टीमने महत्त्वाची भूमिका बजावली. बस पडलेल्या ठिकाणाहून जखमींना स्ट्रेचरद्वारे वा उचलून सुमारे एक किलोमीटर अंतराचा अवघड डोंगर उतरून रुग्णवाहिकेपर्यंत आणत होते.

मदतीसाठी प्रशासनातर्फे पालकमंत्री दादा भुसे यांनी सामाजिक जाणीव दाखवून तत्परतेने वणी ग्रामीण रुग्णालयात येऊन संपूर्ण घटनेचा आढावा घेतला. जखमींना योग्य उपाचारांसाठी नाशिक येथे हलविण्याची सूचना करीत जखमींवर सर्वतोपरी मदत उपचार करण्याचे आदेश दिले.

सप्तशृंगगड घाटात होणाऱ्या प्रत्येक अपघातावेळी वणीकर तसेच सप्तशृंगगड, नांदुरी येथील कार्यकर्ते तत्परतेने मदतीसाठी धावत असतात, याची प्रचीती आज पुन्हा एकादा आली. यात प्रामुख्याने डॉ. अनंत पवार, डॉ. बी. एन. मोरे, डॉ. रोहन मोरे,

डॉ. प्रकाश देशमुख, डॉ. तन्मय राऊत, डॉ. शरद आहेर, डॉ. किशोर मोरे, डॉ. सोनाली गायधनी, डॉ. नेहा सिंगल, तुषार दुसाने, १०८ रुग्णवाहिकेचे डॉ. योगेश मांजरे, डॉ. केशव डुकरे, डॉ. यशस्वी दिघोळे, डॉ. अन्सारी, राजेंद्र परदेशी, प्रशांत चव्हाण, वणी डॉक्टर असोसिएशनचे डॉ. अनिल पवार, डॉ. प्रतीक बुरड, डॉ. महेंद्र आहेर, डॉ. राहुल भवर, डॉ. पुंडलिक राऊत आदींचा समावेश आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Troops from the disaster management team of the trust carrying the injured in a bus accident on stretchers and shoulders.
Nashik NCP Bhavan: राष्ट्रवादी काँग्रेस भवन कार्यालयास बॅरिकेडिंगचा वेढा!

सप्तशृंगी निवासिनी देवी ट्रस्टच्या आपत्ती व्यवस्थापन टीमचे जॉन भालेकर, मंगेश केदारे, संकेत नेवकर, रवींद्र पवार, नानाजी सोनवणे, गणेश राऊत, मंगेश निसलकर, देवा गवळी, विशाल शिंगाडे, भोजराज खिलारी, रूपेश गवळी, विशाल चौधरी,

ज्योती गायकवाड, दुर्गा भोये, अनिता सूर्यवंशी, शीतल पवार, लक्ष्मण गवळी, ज्ञानेश्वर गावित यांनी व्यवस्थापक सुदर्शन दहातोंडे, कार्यकारी अधिकारी भगवान नेरकर, भिकन वाबळे यांच्या मार्गदर्शनाखाली बचावकार्य केले.

प्रवासी भाविकांबरोबर असलेले साहित्य जमा करण्याचे कार्य केले. नांदुरीचे सरपंच सुभाष राऊत, सप्तशृंगगडचे सरपंच रमेश पवार, वणीचे सरपंच मधुकर भरसट, उपसरपंच विलास कड, संदीप बोनके, राजेश गवळी, अजय दुबे, भाऊ कानडे, सतीश जाधव आदींसह ग्रामपंचायत सदस्यांनीही कार्यकर्त्यांसह मदत केली.

घटनास्थळी व वणी ग्रामीण रुग्णालयात पोलिस अधीक्षक शहाजी उमप, सहाय्यक जिल्हाधिकारी विशाल नलवाडे, अप्पर पोलिस अधीक्षिका माधुरी कांगणे, सहाय्यक पोलिस निरीक्षक नीलेश बोडखे,

पोलिस निरीक्षक समाधान नागरे, अभोण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक नितीन शिंदे, पोलिस उपनिरीक्षक प्रवीण उदे, वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली गायकवाड, राज्य परिवहन महामंडळाचे आगारप्रमुख हेमंत पगार, नियंत्रक सुरेश पवार आदींनी मदत कार्यासाठी मार्गदर्शन केले.

Troops from the disaster management team of the trust carrying the injured in a bus accident on stretchers and shoulders.
Nashik ZP Schools: शाळा बांधकामाचे 25 कोटी पडून; साडेआठ कोटींचे नियोजनही रखडले

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.