वणी (जि. नाशिक) : आदिवासी ग्रामिण भागात ऐकीकडे रस्त्यांअभावी रुग्णांना वेळेवर उपचार मिळू शकत नसल्याची शोकांतीका तर दुसरीकडे आरोग्याची सुविधा असूनही आरोग्य सेवेचा उडालेला बोजवारा यामूळे आदिवासी गोरगरीब, सामान्य रुग्णांची होत असल्याची परवड, ही परिस्थिती अतिदुर्गम भागात नव्हे तर वणीे येथील ग्रामिण रुग्णालयात बघावयास मिळत असून रुग्णालय फक्त मलमपट्टी व ताप खोखल्याचे रुग्णांच्या उपचाराचे केंद्र बनले आहे.
इतर रुग्णांना ' रेफर टू नाशिक' चे पेपर देवून रुग्ण व नातेवाईकांची बोळवण केली जात असल्याने नागरिकांमध्ये मोठी नाराजी व्यक्त होत आहे. (wani Gramin Hospital becomes refer centre Tribal patients are being inconvenienced nashik Latest Marathi News)
ग्रामीण भागातील माता, नवजात बालक मृत्यूचे प्रमाण कमी करणे नागरिकांना गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा पुरवण्यावर एकीकडे शासन प्रयत्नशील असताना वणी ग्रामीण रुग्णालये फक्त नावालाच उरल्याचे दिसून येते.
त्यामुळे सर्व काही उपकरणे सुविधा उपलब्ध असताना स्त्री रोग तज्ञ वैद्यकीय अधिकारी नसल्याचे कारण पुढे करीत कार्यरत असलेले वैद्यकिय अधिकाऱ्यांना "रेफर टू नाशिक'चा रोग जडला आहे. वणीचा परिसर ग्रामीण व आदिवासी भाग आहे. या भागातील गरोदर माता यांच्या प्रसूती साठी आणले जाते.
पण वैद्यकिय अधिकारी कोणतीच जबाबदारी न घेता त्या रुग्णास घाबरवून देण्याचे काम केले जाते. बाळाचे वजन जास्त आहे. आदी करणे देत रुग्णाच्या नातेवाईकांना नाशिकला शासकीय रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला जात असल्याचा प्रकार वांरवार होत आहे. देण्यात येते. असाच प्रकार ता.१६ ऑगस्ट रोजी घडला.
फोपशी येथील एक महिलेस रात्री दहा वाजेच्या प्रसूती वेदना जानवू लागल्याने तीस नातेवाईकांनी ग्रामीण रुग्णालयात प्रसुतीसाठी दाखल केले. परंतु येथे कर्तव्यावर असलेले वैद्यकिय अधिकारी यांनी बाळाचे वजन जास्त आहे, जास्त दिवस झाले आहे, सिझर करावे लागेल असे सांगुण महिलेची तपासणी न करता १०९ रुग्णवाहिकेस फोन करुन नाशिक जिल्हा रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला.
यामुळे महिलेचे नातेवाईक चिंतीत होवून घाबरले गेले. दरम्यान संबधीत महिलेच्या नातेवाईकांनी नाशिक जिल्हा रुग्णालयात न नेता सदर महिलेस दिंडोरी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. दरम्यान आज पहाटे ही महिलेची नैसर्गिक प्रसूती झाली.
असेच प्रकार वारंवार वणी ग्रामीण रुग्णालयात होत असल्याचे रुग्ण, नातेवाईकांच्या तक्रारी आहेत. रात्रीच्यावेळी ग्रामीण आदिवासी कुठे जाणार गाड्या नाही कुठे जाणार ? वैद्यकीय अधिकारी, कर्मचा-यांना रात्रीचा त्रास नको म्हणून रुग्णांना दाखल करून घेतले जात नसल्याची तक्रारी होत आहे.
झालेल्या प्रकाराची माहिती निवासी जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ. अनंत पवार यांनी दिली असता झालेल्या प्रकाराची चौकशी करुन कारवाई करणार असल्याचे सांगीतले. वणी ग्रामीण रुग्णालय हे आरोग्य सेवेच्या बाबतीत नेहमीच चर्चेत राहीले असून रुग्णालयास पूर्णवेळ वैद्यकिय अधिक्षक, स्त्री रोग तज्ञाच्या मागणीसह इतर आरोग्य सुविधांबाबत लोकप्रतिनिधी, मंत्री, आरोग्य विभागाकडुन फक्त आश्वासने देऊन या भागातील जनतेची बोळवण करण्यात येत असल्याने नागरिकांत नाराजी व्यक्त होत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.