Nashik News: मोकाट जनावरांच्या त्रासाने वणीकर हैराण! भररस्त्यावर ठाण मांडून बसल्याने अपघातांत होतेय वाढ

Herd of animals gathered at night on Pimpalgaon road in front of police station
Herd of animals gathered at night on Pimpalgaon road in front of police stationesakal
Updated on

Nashik News : वणी शहरात मोकाट जनावरांच्या त्रासाने नागरिक, व्यावसायिक सारेच प्रचंड वैतागलेले आहेत. पिंपळगाव रस्ता, नाशिक - कळवण रस्त्यावर मोकाट जनावरांची बसलेल्या झुंडीमुळे वाहतुकीस अडथळा तर होतोच अपघातांनाही निमंत्रण मिळत आहे.

मोकाट गुरांच्या उपद्रवामुळे येथील नागरिकांसह येणारे भाविक वाहनधारक तसेच व्यावसायिक पुरते हैराण झाले आहेत. आधीच भटकी कुत्री व डुकरांचा उपद्रव आहे, त्यात आता मोकाट जनावरांची डोकेदुखी वाढल्याने त्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांतून पुढे येत आहे. (wani people shocked by problem of free animals increase in accidents due to standing on road Nashik News)

दुकानांसमोर जनावरांचे पडलेले मलमूत्र.
दुकानांसमोर जनावरांचे पडलेले मलमूत्र.esakal
दिंडोरी रस्त्यावरील वाहनधारकांसाठी जनावरांनी मारलेला ठिय्या.
दिंडोरी रस्त्यावरील वाहनधारकांसाठी जनावरांनी मारलेला ठिय्या.esakal

पावसाळा सुरू होताच मोकाट जनावरे येथील पोलिस ठाण्यासमोर, आठवडे बाजार, सबस्टेशनसमोर, बसस्थानक, देवनदी पूल परिसर तसेच गावात ठिकठिकाणी झुंडीने फिरत असतात. रस्त्यातच ठाण मांडून बसलेले असतात. रहदारीस अडथळा होत असून जनावरांमुळे वाहनांना धक्का लागून अपघात होत आहे.

दोन दिवसांपूर्वी पोलिस ठाण्यासमोरच अचानक दोन जनावरांमध्ये जुंपली, एका जनावरांचा दुचाकीस धक्का लागल्याने दुचाकीवरील महिला व लहान मुलगी जखमी झाल्याची घटना घडली. त्यामुळे रस्त्याने जाणाऱ्या वाहनचालकांबरोबरच विद्यार्थी, वृद्ध यांच्यामध्ये दहशत निर्माण झाली आहे.

रात्रीच्या वेळी वीस ते पंचवीस जनावरांची झुंड रस्त्यावर तसेच दुकानांसमोरील शेडमध्ये आश्रयासाठी येत असल्याने दुकानांसमोरील शेड व पायऱ्यांवर दररोज मलमूत्र पडलेले असते. व्यावसायिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.

आरोग्याचा प्रश्न देखील निर्माण झाला आहे. परिसरातील मुख्य बाजार पेठ असल्याने त बहुसंख्य नागरिक हे शहरामध्ये येत असतात, शहरामध्ये शाळा, विद्यालये, महाविद्यालय असून विदयार्थ्यांची ही मोठी वर्दळ असते. अशा परिस्थितीत मोकाट जनावरांमुळे नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण झालेला आहे.

Herd of animals gathered at night on Pimpalgaon road in front of police station
NMC News: दीड महिन्यात मंजूर फायलींची यादी करा तयार; आयुक्त करंजकर यांच्या प्रशासनाला सूचना

वणी ग्रामपंचायतीचा शनी मंदिराजवळ कोंडवाडा असून तो नावालाच आहे. गेल्या पंधरा वर्षात एकाही मोकाट जनावराच्या मालकावर दंडात्मक व अन्य कारवाई झालेली नाही. मागीलवर्षी ग्रामपंचायतीने ग्रामस्थांच्या वाढत्या तक्रारीची दखल घेत मोकाट जनावरे, भटके कुत्रे, डुकरे यांचा बंदोबस्त करण्यासाठी निविदा काढत कारवाई करण्यास प्रारंभ केला होता.

यात भडके कुत्रे पकडण्यात येत असताना श्वानप्रेमीने वरिष्ठ पातळीवर तक्रार केल्याने कुत्र्यांच्या बंदोबस्ताबरोबर मोकाट जनावरांचा बंदोबस्त व मालकावर होणारी कारवाईची मोहीम बंद पडली.

गुन्हा मालकांवर दाखल करा

मोकाट जनावरांचा वाढता उपद्रव बघता ग्रामपंचायतीने केंद्र व राज्यशासनाच्या केंद्र, राज्याचे कायदे पशू क्रूरता नियम व अधिनियम 1960, मुंबई पोलिस कायदा 1951 अंतर्गत जनावरांच्या मालकांवर गुन्हे दाखल करावे तसेच बेवारस जनावरांची गोशाळेत रवानगी करावी अशी मागणी ग्रामस्थ करीत आहे.

"मोकाट जनावरांमुळे आम्ही व्यावसायिक त्रस्त झालो आहोत. रोज सकाळी दुकान उघडताना पहिले या मोकाट जनावरांनी टाकलेले शेण, गोमूत्र साफसफाई करावी लागते. त्यामुळे संपूर्ण दुकानात माशी मच्छर व शेणगोमूत्राच्या वासाने आम्ही दुकानदार त्रस्त झालो आहोत."

- बाळासाहेब गायकवाड, हॉटेल चालक

"रात्रीच्या वेळेस अंधारात रस्त्यावर बसलेली मोकाट जनावरे वाहनचालकांना दिसून येत नाही. अशा वेळी अपघात होण्याची शक्यता अधिक असते. वास्तविक पाहता स्थानिक प्रशासनाने अशा मोकाट जनावरांना पकडून कोंडवाड्यात जमा केले पाहिजे पण असे होताना दिसून येत नाही." - प्रवीण कड, ग्रामस्थ वणी

Herd of animals gathered at night on Pimpalgaon road in front of police station
Nashik: विद्यार्थ्यांची वर्षातून दोनदा होणार आरोग्य तपासणी! आदिवासी विकास आयुक्तालयाचा शासनाकडे प्रस्ताव

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.