Prajakta Mali | मला नाशिकमध्ये स्‍थायिक व्‍हायचंय! : प्राजक्‍ता माळीची भावना

Prajakta Mali at NAREDCO
Prajakta Mali at NAREDCO esakal
Updated on

नाशिक : पर्यावरणाच्‍या अनुषंगाने नाशिक अत्‍यंत सजग शहर आहे. हवामान, पाणी आणि येथील नागरिकही अत्‍यंत निर्मळ आहेत. त्‍यामुळे नाशिकमध्ये दुसरे घर घेत येथे स्‍थायिक होण्याची इच्‍छा आहे, अशी भावना अभिनेत्री प्राजक्ता माळी हिने व्‍यक्‍त केली. (I want to settle in Nashik Prajakta Mali statement at NAREDCO Homethon 2022 nashik news)

गंगापूर रोडवरील डोंगरे वसतिगृह मैदान येथे ‘नरेडको’तर्फे भरविलेल्‍या ‘होमथॉन’ गृहप्रदर्शनाची ब्रॅन्ड ॲम्‍बेसीडर प्राजक्ता माळी हिने शुक्रवारी (ता. २३) प्रदर्शनाला भेट दिली, त्या वेळी झालेल्‍या मुलाखत कार्यक्रमातून तिने दिलखुलास गप्पा मारल्‍या. नंदन दीक्षित आणि किशोरी किणीकर यांनी मुलाखत घेतली.

प्राजक्‍ताने गप्पांदरम्‍यान अभिनयाचा सुरवातीपासूनचा प्रवास उलगडून सांगितला. घरासंबंधी संकल्पना स्पष्ट करताना, घर केवळ भिंतीचे नसावे, तेथे राहाणाऱ्या महिलेचा उचित आदर सन्‍मान झाला पाहिजे. मुंबई आता गच्च भरले असून, पुण्यातही जागा उरलेली नाही. त्‍यामुळे अनेक दिवसांपासून नाशिकमध्ये घर घेण्याचा विचार करत आहे. येथील आल्‍हाददायक वातावरण, स्‍वच्‍छ पाणी, हवामान असल्‍याने राहाण्यास योग्‍य ठिकाण आहे. नाशिकमध्ये चांगले घर मिळाल्‍यास येथे राहायला नक्‍की आवडेल, असे ती म्‍हणाली.

हेही वाचा : Love Jihad: प्रेमाला धर्म आहे...?

Prajakta Mali at NAREDCO
Christmas Festival : नाशिक रोडला नाताळचा अभूतपूर्व उत्साह; 24 डिसेंबरच्या मध्यरात्रीपासून कार्यक्रम

चित्रपटातील काम आव्‍हानात्‍मक

चित्रपट, टीव्ही आणि नाटक यापैकी कुठल्‍या क्षेत्रात काम करणे आव्‍हानात्‍मक वाटते, यावर प्राजक्‍ता म्‍हणाली, की चित्रपटात काम करणे आव्हानात्मक वाटत आले आहे. चित्रपटामध्ये अभिनयाचा कस लागतो. अशा वेळी तणावदेखील येत असतो. त्‍यापासून बचावासाठी ध्यान, योगा आणि प्राणायाम या त्रिसूत्रीचा अवलंब करते, असे ती म्‍हणाली. आगामी काळात हिंदीत स्‍वतःला सिद्ध करण्याची इच्छा आहे.

लवकरच हीदेखील इच्छा पूर्ण होईल, असा विश्‍वास तिने व्‍यक्‍त केला. अभिनयासोबत कविता लेखन, प्रवास हे आवडते छंद असल्‍याचे तिने सांगितले. मुलाखतीच्या दरम्यान अभिनेता अंशुमन विचारे व अभिनेत्री प्रियदर्शिनी इंदलकर यांनीही प्राजक्ताला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे प्रश्‍न विचारले. नरेडको-होमथॉनचे सचिव सुनील गवांदे यांनी प्रास्ताविक केले.

प्रदर्शनात फ्लॅट बुक करणाऱ्या भाग्यवान विजेत्यांना मुलाखतीच्या कार्यक्रमानंतर प्राजक्ता माळी हिच्‍या हस्ते चांदीचे नाणे भेट देण्यात आले. अध्यक्ष अभय तातेड, वंदना तातेड, सचिव सुनील गवादे, समन्वयक जयेश ठक्कर, जयश्री ठक्कर, सहसमन्वयक शंतनू देशपांडे, आसावरी देशपांडे, पुरुषोत्तम देशपांडे, शाल्मली देशपांडे आदी उपस्थित होते.

Prajakta Mali at NAREDCO
Under 15 National League Cricket : सिन्नरची सुहानी कहांडळ महाराष्ट्राची उपकर्णधार!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.