इंदिरानगर (जि. नाशिक) : प्रभाग ४४ मधील १२५० नाही तर सुमारे ३ हजार ६०० मतदार (Voters) प्रभाग ३९ मध्ये गेल्याचे या प्रभागातील इच्छुक असलेल्या मंडळींनी तयार केलेल्या डेटामधून स्पष्ट होत आहे. त्यामुळे प्रभाग क्रमांकाची ३९ ची लोकसंख्या ३० हजार २६५ असताना मतदार यादीत (Voter List) मतदार संख्या मात्र ३४ हजार ८४ इतकी दाखवल्याने या प्रभागातील इच्छुकांसह नागरिकांनीदेखील डोक्याला हात मारून घेतला आहे. (Ward 39 has more voters than population NMC election nashik News)
गतवेळी प्रभाग ३१ मध्ये मतदान केलेल्या शेकडो नागरिकांची नावे शेजारच्या प्रभागात गेले आहेत. यादी क्रमांक २९९ मधील सुमारे ११००, यादी क्रमांक ३०० मधील ९१६, यादी क्रमांक ३०१ मधील ६४०, यादी क्रमांक ३०२ मधील ४५४, यादी क्रमांक ३०३ मधील १७० आणि यादी क्रमांक ३०५ मधील सुमारे २१२ नावे प्रभाग ३९ मध्ये गेल्याचा दावा यादीचा अभ्यास करणाऱ्यांनी केला आहे. नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघांतील याद्यांचा हा परिसर असून यादी वर चेतनानगर परिसर, पाण्याची टाकी, राणेनगर, पोलिस कॉलनी, चेतनानगर, हायवे कडेचा पूर्वेकडील भाग असे शीर्षक असल्याने आणि सध्या प्रभाग ३९ मध्ये चेतनानगर, राणेनगर आदी परिसर येत असल्याने सरसकट ही सर्व नावे तिकडे वर्ग करण्यात आल्याची शंका व्यक्त करण्यात येत आहे.
आयुक्तांची घेणार भेट
याबाबत विचारविनिमय करण्यासाठी माजी सभागृहनेते सतीश सोनवणे, माजी नगरसेवक ॲड. श्याम बडोदे, भगवान दोंदे, संजय नवले यांच्यासह शिवसेनेचे वसंत पाटील, रवींद्र गामणे, बाळकृष्ण शिरसाट, भाजपचे डॉ. राजेश पाटील, एकनाथ नवले, गणेश ठाकूर आदींनी एकत्र येत याबाबत चर्चा केली. प्रत्येकाने स्वतः तयार केलेला डेटा शेअर करत वस्तुस्थिती समजून घेतली. दरम्यान, याबाबत आता दोन्ही प्रभागातील सर्वपक्षीय इच्छुक आयुक्त रमेश पवार यांची भेट घेणार आहेत.
जागरूक करणे अशक्यप्राय
सद्यःस्थितीत हरकत घेण्यासाठी संबंधित मतदाराला रहिवासी पुरावा आदी बाबी निवडणूक शाखेने ठरवून दिलेल्या प्रक्रियेनुसार जमा करून हरकत घ्यावी लागते. त्यानंतर ग्राह्य असेल, तर तो बदल केला जातो. मात्र, एवढ्या मोठ्या संख्येने ही नावे जर गेले असतील तर हरकती दाखल करण्याच्या १ तारखेपर्यंत मुदतीत या सर्व नागरिकांपर्यंत पोचून त्यांना ती माहिती देऊन त्यासाठी जागरूक करणे हे अशक्यप्राय असल्याचे मत बैठकीत उपस्थित सर्वांनी व्यक्त केले. त्यामुळे सर्वांनी एकत्र जाऊन आयुक्तांना याविषयी धोरणात्मक निर्णय घेऊन याद्यांचा पुनर्विचार करून ही नावे त्या, त्या प्रभागात समाविष्ट करण्यात यावेत, अशी मागणी करण्यात येणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.