साडेबाराशे नावे शेजारच्या प्रभागात

Election
Electionesakal
Updated on

इंदिरानगर : प्रभागनिहाय प्रारूप याद्यांमध्ये प्रभाग ४४ मधील वासननगर भागातील सुमारे साडेबाराशे नावे शेजारच्या प्रभाग ३९ मध्ये गेल्याने नागरिकांसह इच्छुकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. प्रभाग ४४ मध्ये एकमेव जागा खुल्या प्रवर्गासाठी आरक्षित झाली आहे. त्यामुळे या जागेसाठी शिवसेना आणि भाजपसह मनसे, राष्ट्रवादीमध्ये मोठ्या संख्येने इच्छुक आहेत.

प्रत्येक जण आपल्या भागात ताकदीने जम बसविण्याचा प्रयत्न करत आहेत. त्या भागातील पॅकेट आपल्या सोबतच राहण्यासाठी कसोशीने प्रयत्न करत आहेत. मात्र, प्रारूप याद्यांमध्ये यादी क्रमांक २९७ ते ३०६ मधील वासननगर, अक्षर कॉलनी, सराफनगर, ज्ञानेश्वरनगर, समर्थनगर, नागरे मळा, जायभावे मळा या भागातील सुमारे १२३५ नावे वरकरणी शेजारच्या प्रभाग ३९ मध्ये गेली आहेत, असे या मंडळीचे म्हणणे आहे. सर्वत्र सोशल मीडियावर हा मेसेज व्हायरल झाल्याने नागरिकांनीदेखील आश्चर्य व्यक्त केले आहे.

प्रभाग ४४ मध्ये हा भाग तसा मध्यवर्ती समजला जातो आणि याच भागातील एवढ्या मोठ्या संख्येने नावे शेजारच्या प्रभागात गेल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. या भागातून प्रमुख इच्छुक शिवसेनेचे माजी नगरसेवक सुदाम डेमसे, रवींद्र गामणे, बाळकृष्ण शिरसाट, वसंत पाटील, भाजपचे भगवान दोंदे, संजय नवले, सुदाम कोंबडे, एकनाथ नवले, गणेश ठाकूर, जितेंद्र चोरडिया, डॉ. पुष्पा पाटील (नवले) आदी सर्वच जण यावर हरकती घेण्याच्या तयारीत आहेत.

Election
फडणवीस पुन्हा सत्तेच्या ‘पीच’वर

मोठ्या संख्येने नावे शेजारच्या प्रभागात गेल्याने हा प्रभाग चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. इच्छुकांसोबत या भागातील नागरिकांनीदेखील पुढचा सगळा विचार करता ज्या भागात राहतो, त्या भागातच आमचे मतदान असावे असा सूर व्यक्त केला आहे. त्यामुळे घेतल्या जाणाऱ्या हरकतींवर आता नेमका काय निर्णय लागेल, याची उत्सुकता सर्वांना आहे.

"एवढ्या मोठ्या संख्येने हे नावे शेजारच्या प्रभागात कशी जाऊ शकतात हे अनाकलनीय आहे. याबाबत रीतसर हरकत घेणार आहे. अधिकाऱ्यांनी देखील प्रभागाच्या मध्यवर्ती भागात येणाऱ्या या भागातील नागरिकांचे नावे या ठिकाणीच राहावेत यासाठी धोरणात्मक निर्णय घेणे गरजेचे आहे."

- रवींद्र गामणे, शिवसेना

"जुन्या प्रभाग क्रमांक ३१ च्या वासननगर या मध्यवर्ती भागात राहतो. त्यामुळे त्यातूनच तयार झालेल्या प्रभाग क्रमांक ४४ च्या मतदार यादीत नाव राहिले पाहिजे. त्यासाठी संबंधितांनी आवश्यक ती कार्यवाही केली पाहिजे."

- योगेश भामरे, स्थानिक नागरिक

Election
Eknath Shinde बंड : 'योग्य मार्गाने पैसे कमावले नसल्याने ईडीची भीती

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.