Nashik News : ग्रामपालिका आरक्षणाने प्रस्थापितांना धक्का! घोटीत काही ठिकाणी खुशी, काही ठिकाणी गम

Ghoti Gram Palika election
Ghoti Gram Palika electionesakal
Updated on

इगतपुरी : तालुक्यातील सर्वांत मोठी घोटी ग्रामपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी मंगळवारी (ता. १३) प्रभागनिहाय आरक्षण निश्चित करण्यात आले. एकूण सहा प्रभाग असून, वॉर्ड तीन वगळता पाचही वॉर्डात प्रत्येकी तीन सदस्य आहेत.

वॉर्ड तीनमध्ये सदस्य संख्या दोन आहे. सोडतीत अनेक वॉर्डात आरक्षणात फेरबदल झाल्याने अनेक इच्छुकांना धक्का बसला. विद्यमान प्रस्थापित सदस्यांच्या वॉर्डात महिला आरक्षण निघाले, तर काही वॉर्डात जोरदार चुरस होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. (Ward wise reservation decided on Tuesday for five yearly election of Ghoti Grampalika igatpuri nashik news)

घोटीच्या ग्रामपालिका सभागृहात वॉर्डनिहाय आरक्षण सोडत काढण्यासाठी प्राधिकृत अधिकारी तथा मंडलाधिकारी संसारे, तलाठी खादे यांच्या उपस्थितीत विशेष ग्रामसभा झाली. ग्रामसभेला ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

घोटी ग्रामपालिकेत अनुसूचित जातीसाठी आरक्षित असलेली एकमेव जागा वॉर्ड पाचमध्ये आरक्षित करण्यात आली, तर वॉर्ड १, २ व ४ मध्ये सर्वसाधारण प्रवर्गातील जागा महिलांसाठी राखीव झाल्याने अनेकांचा हिरमोड झाला, तर वॉर्ड ३, ५ व ६ मध्ये सर्वसाधारण जागा झाल्याने या वार्डात चुरस निर्माण होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

Ghoti Gram Palika election
Nashik Political News: येवला गट-गणाची शिवसेनेची कार्यकारिणी जाहीर! अनेक नव्या-जुन्या कार्यकर्त्यांना संधी

सतरा जागांसाठी आरक्षण पुढीलप्रमाणे :

● वॉर्ड १ : अ) अनुसूचित जमाती ब) अनुसूचित जमाती (स्त्री) क) सर्वसाधारण (स्त्री)

● वॉर्ड २ : अ) अनुसूचित जमाती ब) अनुसूचित जमाती (स्त्री) क) सर्वसाधारण (स्त्री)

● वॉर्ड ३ : अ) सर्वसाधारण ब) अनुसूचित जमाती (स्त्री)

● वॉर्ड ४ : अ) अनुसूचित जमाती ब) अनुसूचित जमाती (स्त्री) क) सर्वसाधारण (स्त्री)

● वॉर्ड ५ : अ) अनुसूचित जाती ब) अनुसूचित जमाती (स्त्री) क) सर्वसाधारण

● वॉर्ड ६ : अ) अनुसूचित जमाती ब) सर्वसाधारण क) सर्वसाधारण (स्त्री)

Ghoti Gram Palika election
Nashik: गंगासागर तलावाला सौंदर्यीकरणातून मिळणार झळाळी! अमृत 2 योजनेंतर्गत भुजबळाच्या प्रयत्नांतून 5 कोटींचा प्रकल्प मंजूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.