नाशिक : संततधार (constant rain) कोसळणाऱ्या वरुणराजाने मंगळवारी (ता. १२) काहीशी उसंत घेतली होती. पण बुधवारी (ता. १३) पुन्हा संततधार कोसळू लागला असताना गंगापूर धरणातील (Gangapur dam) विसर्ग आठ हजार ८८० क्यूसेक सुरू राहिला.
त्यामुळे सकाळी पुराची पातळी कमी झाली असताना सायंकाळनंतर पुन्हा पातळीत वाढ झाली. सायंकाळी सातनंतर होळकर पुलाखालील विसर्ग सात हजार ५१५ वरून १० हजार ५०२ क्यूसेकवर पोचला. रामकुंडाशेजारील दुतोंड्या मारुतीच्या गळ्यापर्यंत पुन्हा पुराची पातळी पोचली होती.
तसेच नाशिक-देवळा रस्त्यावरील भावडबारीमध्ये दरड कोसळल्याने एकेरी वाहतूक सुरू ठेवण्यात आली होती. हवामान विभागातर्फे जिल्ह्यात १५ जुलैपर्यंत अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. (Warning of heavy rains in district till July 15 Latest Nashik Rain Update)
दारणा धरणातून आठ हजार ८८६, कडवामधून दोन हजार ५९२, आळंदीमधून २४३, तर नांदूरमध्यमेश्वरमधून ३५ हजार ७५२ क्यूसेक विसर्ग सुरू होता. गेल्या दोन दिवसांमध्ये बुडालेल्या सातपैकी पाच जणांचा शोध घेण्यात येत होता.
बुधवारी सकाळी संपलेल्या चोवीस तासांत मालेगाव तालुक्यात ०.३, बागलाणमध्ये ०.५, कळवणमध्ये १३.८, नांदगावमध्ये ०.२, सुरगाण्यात ७१.७, नाशिकमध्ये ५.७, दिंडोरीत २२.३, इगतपुरीमध्ये ५४.१, पेठमध्ये ३८.५, निफाडमध्ये ३.५, सिन्नरमध्ये १.२, येवल्यात १.४, चांदवडमध्ये ३.१, त्र्यंबकेश्वरमध्ये ५४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली.
शहर-जिल्ह्यातील धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचे प्रमाण ५५२ मिलिमीटर राहिले. गोदावरीची पातळी ६०८.२४ मीटर होती. पूररेषेची पातळी ६०८.२४ ते ६१२.३५ मीटरदरम्यान होती. बुधवारी सायंकाळी पाचपर्यंत तालुकानिहाय झालेला पाऊस मिलिमीटरमध्ये : देवळा- २०.४, पेठ- ९८, इगतपुरी- ७७, त्र्यंबकेश्वर- ५३, मालेगाव- १, सिन्नर- १४, दिंडोरी- २४, कळवण- ५३, निफाड- ७, सुरगाणा- ९६.२.
याशिवाय धरणांच्या पाणलोट क्षेत्रातील बुधवारी सायंकाळी पाचपर्यंतचा पाऊस मिलिमीटरमध्ये : भावली- १०७, अंबोली- १०६, गंगापूर- ५६, कश्यपी- ५१, गौतमी- ५०, दारणा- ३०.
जिल्ह्यात १५६ टक्के पाऊस
जिल्ह्यात बुधवारी सकाळी संपलेल्या चोवीस तासांपर्यंत यंदाच्या पावसाळ्यात १५६ टक्के पाऊस झाला. तालुकानिहाय झालेल्या पावसाची टक्केवारी : मालेगाव- २०१.९, बागलाण- १९९.५, कळवण- २५३.३, नांदगाव- १५७, सुरगाणा- २०८.५, नाशिक- १४७.३, दिंडोरी- २९८.७, इगतपुरी- ६८.८, पेठ- २२२.१, निफाड- १९९.५, सिन्नर- १२५.७, येवला- १२४.८, चांदवड- २३५.४, त्र्यंबकेश्वर- १२९.१, देवळा- २०७.१. पावसाच्या संततधार हजेरीमुळे आळंदी, वाघाड, ओझरखेड, हरणबारी ही धरणे शंभर टक्के भरली आहेत.
गंगापूरमध्ये ६३, पालखेडमध्ये ४९, करंजवणमध्ये ८०, पुणेगावमध्ये ६८, तिसगावमध्ये ९०, दारणामध्ये ६६, भावलीत ८०, मुकणेत ६२, वालदेवीमध्ये ७३, कडवामध्ये ६९, भोजापूरमध्ये ५०, चणकापूरमध्ये ५२, केळझरमध्ये ९३, गिरणामध्ये ६७, पुनंदमध्ये ५२ टक्के साठा झाला आहे. जिल्ह्यातील २४ धरणांमधील साठा ६९ टक्के झाला आहे. गेल्या वर्षी याच काळात २८ टक्के धरणसाठा उपलब्ध होता.
पावसाच्या पडसादाच्या ठळक नोंदी
० नाशिकमधील रविवार कारंजा आणि दहीपूल भागातील वाड्याचा भाग खचला
० गोदावरीच्या पुरामुळे नाशिकमधील आठवडाबाजार गणेशवाडीत
० नाशिकमधील धोकादायक वाड्यांचा वीज आणि पाणीपुरवठा खंडित करण्याची सूचना
० केळझर येथील गोपाळसागर धरण ‘ओव्हरफ्लो’ झाले असून, आरम नदीत ७५ क्यूसेक पाणी सोडले
० कारसूळ पाझर तलाव फुटल्याने रस्ता गेला वाहून
० त्र्यंबकेश्वर, सुरगाण्यातील प्रत्येकी दोघे, तर नाशिक, दिंडोरी व पेठमधील प्रत्येक एकजण वाहून गेला आहे. बालकाचा मृतदेह सापडला असून, इतरांचा शोध सुरू
० इगतपुरी, दिंडोरी, सुरगाणा, देवळा, कळवण व सुरगाण्यात ८४ घरांची अंशतः व एका घराची पूर्णतः पडझड
० दिंडोरीतील सात व सुरगाण्यातील तीन रस्ते पाण्याखाली गेले असून, एका ठिकाणी झाड कोसळले. त्यामुळे वाहतूक अन्यत्र वळण्यात आली
० सुरगाण्यातील अंगणवाडीची भिंत कोसळली असून, तालुक्यातील एका शेतकऱ्याच्या दीड हेक्टर भाताचे नुकसान झाले. तसेच एक बैल ठार झाला
० निंबोळा येथील गिरणा नदीतील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याच्या फळ्या न काढल्याने शेतीचे नुकसान
० मालेगावमध्ये गिरणा नदीचा पूर पाहण्यासाठी अलोट गर्दी
० भुसावळहून मुंबईकडे आणि मुंबईहून मनमाडमार्गे धावणाऱ्या रेल्वेगाड्यांना चार ते पाच तासांचा उशीर
० कोनांबे धरण तुडुंब भरल्यानंतर देवनदी दुथडी भरून वाहू लागल्याने सोनांबे गावात आनंदोत्सव
जायकवाडीचा साठा ५० टक्क्यांपर्यंत शक्य
नांदूरमध्यमेश्वर धरणातून बुधवारी सकाळपर्यंत १२ टीएमसी पाणी जायकवाडी धरणाकडे गोदावरी नदीतून रवाना झाले. तसेच गुरुवारी (ता. १४) सकाळपर्यंत आणखी चार टीएमसी पाणी रवाना होईल. त्यामुळे जायकवाडी प्रकल्पातील साठा आठवड्यात ५० टक्क्यांपर्यंत जाण्याची शक्यता आहे.
सद्यःस्थितीत जायकवाडीतील साठा ३४ टक्क्यांहून अधिक आहे. सध्याच्या पावसाची स्थिती पाहता, यंदाच्या पावसाळ्यानंतर जायकवाडीसाठी धरण समूहातून पाणी सोडण्याची वेळ येणार नाही, असा अंदाज अभ्यासकांचा आहे. बुधवारी सकाळपर्यंत दारणा धरणातून २.८, गंगापूरमधून १.४ टीएमसी पाणी सोडण्यात आले आहे. कडवामधून ८३८ दशलक्ष घनफूट सोडले गेले आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.