हरणबारी लाभक्षेत्रातील नागरिकांकडून उपोषण करण्याचा निर्धार

Warning of hunger strike as farmers are not getting water for farming
Nashik news
Nashik news esakal
Updated on

अंबासन (जि.नाशिक) : प्रलंबित हरणबारी उजवा कालव्याचे पाणी धगधगत असून गेल्या अनेक वर्षांपासून कालव्यासाठी पाठपुरावा करूनही प्रत्यक्ष कामाला सुरुवात होत नसल्याने हरणबारी लाभक्षेत्रातील नागरिकांकडून येत्या १ मे महाराष्ट्र दिनाला तहसील कार्यालयासमोर उपोषण करण्याचा निर्धार केला आहे.

वायगाव (ता.बागलाण) येथे राममंदिरात नुकतीच हरणबारी उजवा कालवा लाभक्षेत्रातील नागरिकांनी उपोषण छेडण्याबाबत बैठक आयोजित केली होती. बैठकीत लघु पाटबंधा-याचे आधिकारी अभिजित सहाणे, एस.बी.आहिरे, श्रीमती एच.एम.आहिरे उपस्थित होते. यावेळी लाभक्षेत्रातील नागरिकांनी सांगितले की, १९७४ मध्ये हरणबारी उजवा कालव्यासाठी पहिले आंदोलन केले होते. मात्र उजवा कालवा प्रश्न आजतागायत प्रलंबित आहे.

Nashik news
नागपूर : मुबलक जलसाठा, तरीही 'रामटेक' तहानलेले

दरम्यान आम्ही छेडलेले उपोषण थांबविण्यासाठी दबावतंत्र वापरले जात असल्याचा आरोप बैठकीत उपस्थित लााभक्षेत्रातील नागरिकांनी केला. शासनाच्या दुटप्पी भुमिकेचा उपस्थितांनी निषेध व्यक्त केला. राजकीय लोक पाच वर्ष निवडणुकीसाठी ओहापोहा करतात. मागील काळात पालकमंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) आले तेव्हाही तेच झाले. लोकनियुक्त पुढा-यांना यावेळी बळी पडणार नाहीत.

लााभ क्षेत्रातील गावात पाणीटंचाईमुळे मुलांना लग्नासाठी मुली देत नाहीत. आजरोजी प्यायला पाणी नाही हा तालुका देवमामलेदारांचा आहे. चार वर्षांपासून सतत पाठपुरावा करीत आहोत चार वर्षांपासून कागदपत्र नाचवले जात आहेत. या भागात डिझेल पाईपलाईन गेली ते काम अतिशय प्रगतीपथावर काम गेले. हरणबारी उजवा कालव्यासाठी राजकीय पुढारी अडसर करीत असतील तर शांत बसणार नाहीत. दोन पिढ्या खपल्या मात्र काम होत नाही आमची तळमळीची प्रशासनाने जाणिव करावी. तांत्रिक अडचणी दाखविण्यात येतात. शासनाकडून पोकळ आश्वासन ऐकून घेणार नाहीत. पंधरा ऑगस्ट रोजी होणारे उपोषण आधिका-यांनी हाणून पाडले.

Nashik news
औरंगाबाद : 'पाणीपुरवठा' सुरळीत करा, अन्यथा कारवाई

आम्हाला फक्त पाणी पाहिजे आधिकारी अभिजित शहाणे यांनी साांगितले की, सदर कामाचे सर्वेक्षण करून डिझाईन मंजूर झाले आहे. संपूर्ण माहिती संकलित करून वरीष्ठ कार्यालयात द्यावे लागते. याबाबत उपस्थितांना सविस्तर माहिती दिली व पुर्णपणे काम जोमात सुरू आहे. मात्र लाभक्षेत्रातील नागरिकांनी चर्चेअंती ठाम भुमिका घेऊन १ मे पर्यंत कामाला गती न मिळाल्यास उपोषण निश्चित करणार असा निर्धार केला आणि झालेली बैठक निष्फळ ठरली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()