Nashik Citylinc Bus Service: सिटीलिंक बससेवा बंद करण्याचा इशारा!

nashik city bus service
nashik city bus serviceSakal
Updated on

Nashik Citylinc Bus Service : सिटीलिंक कंपनीच्या बस नियमित रस्त्यावर धावत नाही, तोच आता बस ऑपरेटर्स कंपन्यांनी चार महिन्यांची अठरा कोटी रुपयांची थकबाकी द्यावी अन्यथा बसचे संचलन बंद करण्याचा इशारा दिला आहे. (Warning to stop Citylinc Bus Service by parent company nashil)

महापालिकेकडून सुरू झालेल्या बससेवेला दीड वर्षे पूर्ण होत असताना संपामुळे बससेवा गाजली आहे. तब्बल पाच वेळा संप झाला. तीन दिवसांच्या संपानंतर सोमवार (ता.८) पासून बस नियमित रस्त्यावर धावण्यास सुरवात झाली आहे.

असे असताना शहर बसचे संचलन करणाऱ्या ट्रॅव्हल टाईम मोबिलिटी इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने सिटीलिंकचे व्यवस्थापकीय संचालक तथा आयुक्त डॉ. अशोक करंजकर यांना पत्र दिले आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

nashik city bus service
Nashik News: गंगापूर धरण जलवाहिनीसाठी निविदा समितीची स्थापना

पत्रात थकबाकी अदा करावी, अशी मागणी करताना बस संचलन बंद करण्याचा इशारा दिला आहे. एप्रिल व मे या दोन महिन्यांच्या मासिक देयकातील २० टक्के रक्कम, जून व जुलै महिन्याच्या पूर्ण देयकाची सुमारे १८ कोटींची रक्कम अदा झालेली नाही.

दरम्यान, ऑपरेटर कंपनीचे कुठलेच देयके थकविले नसल्याचे सिटीलिंकचे महाव्यवस्थापक मिलिंद बंड यांनी सांगितले.

nashik city bus service
Nashik Eyes Infection: 10 दिवसात डोळ्यांचे साडेतीन हजार रुग्ण

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.