Nashik Crime News : रविवार कारंजा येथील प्रसिद्ध चांदीचा गणपतीचे दागिने चोरण्याच्या उद्देशाने आलेल्या चोरट्याच्या हल्ल्यात वॉचमन गंभीर जखमी झाला आहे. (watchman was seriously injured in an attack by thief who intended to steal ornaments silver Ganesha nashik crime news)
यावेळी गणपतीच्या अंगावरील चांदीचे दागिने चोरून पोबारा करणाऱ्या चोरट्यास सरकारवाडा पोलिसांनी काही तासात अटक केली आहे. त्यास न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
निहाल यादव (२१, मूळ रा. ग्वाल्हेर, मध्यप्रदेश) असे संशयित चोरट्याचे नाव आहे. तर, चोरट्याच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या वॉचमनचे नाव नारायण हाके (रा. काजीपूरा, जुने नाशिक) असे आहे. सरकारवाडा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी (ता. १६) पहाटे तीन-साडेतीन वाजेच्या सुमारास संशयित यादव हा रविवारी कारंजा येथील सुप्रसिदध चांदीचा गणपती मंदिराजवळ आला.
हेही वाचा : What Is Moksha: ‘अण्णा तुमच्या गुरूला मिळाला का मोक्ष?’
त्याठिकाणी वॉचमन नारायण हाके असतानाही तो मंदिरात जाऊ लागला. त्यावेळी वॉचमन हाके यांनी हटकले असता, त्याने त्याच्याकडील लोखंडी रॉडने वॉचमन हाकेच्या डोक्यात मारले. गंभीर जखमी झाल्याने हाके जागेवरच कोसळले. संशयित यादव याने मंदिराची काच फोडून आत प्रवेश केला आणि गणपतीच्या अंगावर असलेले चांदीचे दागिने घेऊन त्याने पोबारा केला.
घटनेची माहिती मिळताच सरकारवाडा पोलिस घटनास्थळी दाखल झाले. तात्काळ पोलिसांनी संशयिताचा पाठलाग करीत त्यास गंगावऱ्हे परिसरातून अटक केली. त्याच्याकडून चोरीचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. सरकारवाडा पोलिसात यादव याच्याविरोधात जबरी चोरी आणि गंभीर दुखापतीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरील गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक प्रकाश नेमाने हे करीत आहेत. दरम्यान संशयित यादव यास न्यायालयात हजर केले असता, त्यास तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. संशयित यादव हा गेल्या दीड महिन्यांपासून नाशिकमध्ये वास्तव्याला असून, पोलीस तपासातून आणखी गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.