Mission Bhagirath Prayas: भगीरथ प्रयासच्या बंधाऱ्यात साचले पाणी! कोरडवाहू असलेले गांडोळे गाव होणार पाणीदार

Completed embankment work at Gandole village in Dindori taluka
Completed embankment work at Gandole village in Dindori talukaesakal
Updated on

Mission Bhagirath Prayas : जिल्हा दुष्काळमुक्त करण्याच्या दृष्टीने जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांच्या संकल्पनेतून जिल्ह्यात नावीन्यपूर्ण राबविली जात असलेली मिशन भगीरथ प्रयास ही विशेष मोहीम राबविली जात आहे.

यात जिल्ह्यात मंजूर ६०९ कामांपैकी आतापर्यंत २५० कामे पूर्ण झाली आहेत. त्यात दिंडोरी तालुक्यातील ६४ कामांचा समावेश असून, यातील सद्यःस्थितीत तालुक्यात नऊ कामे भौतिकदृष्ट्या पूर्ण झालेली असून, नऊ कामे प्रगतीत आहेत.

तालुक्यातील कोरडवाहू गाव असलेल्या गांडोळे गावातील सिमेंट बंधारा क्रमांक एकचे काम पूर्ण झाले. यात पाणी साचण्यास प्रारंभ झाला आहे. सदर सिमेंट बंधाऱ्यामुळे २५ ते ३० हेक्टर इतके क्षेत्र ओलिताखाली येण्यास मदत होईल. (Water accumulated in dam of Mission Bhagirath Prayas Gandole village dry will become watery nashik zp)

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत मिशन भगीरथ प्रयास विशेष मोहीम जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. एप्रिल, मे व जूनमध्ये बंधाऱ्यांचे काम करण्यात आले. यातील पूर्ण झालेल्या कामांमुळे बंधाऱ्यांमध्ये पाणी साचण्यास सुरवात झाली आहे.

अशाच गांडोळे गावात बंधाऱ्यावर काम घेऊन ते पूर्ण करण्यात आले असून, आता तेथील बंधाऱ्यात पाणी साचते. मौजे गांडोळे हे गाव (आदिवासीबहुल) दिंडोरी तालुक्यातील दुर्गम व डोंगराळ भागात वसलेले आहे.

सदर गावाची लोकसंख्या दोन हजार २७९ इतकी आहे. तेथे उन्हाळ्यात मोठ्या प्रमाणात शेतीसाठी पाणीटंचाई भासते. त्या गावाची भौगोलिक परिस्थिती पाहता, दुर्गम व डोंगराळ भागात आदिवासीबहुल गाव असल्याने तेथील लोक मजुरीसाठी बाहेरगावी स्थलांतरित होत असतात.

तसेच, गावात कोरडवाहू शेती क्षेत्र भागात नागली व वरई आदी पिके निघाल्यावर उर्वरित आठ महिने सदर क्षेत्र पडीक राहते. तसेच, गावाशेजारी राखीव वनक्षेत्र मोठ्या प्रमाणात असल्याने वन्यजीव व शेतीसाठी पाण्याची मोठ्या प्रमाणात टंचाई भासते.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Completed embankment work at Gandole village in Dindori taluka
Inspirational News : ओमसाई चा जयघोष अन्‌ गरजूंच्या मुखी भोजन; 'तिचा' उपक्रम 3 वर्षांपासून नित्यनेमाने सुरू

सदर गावात खरीप हंगामात भात, नागली व वरई आदी पिके घेतली जातात. त्या गावात पावसाचे प्रमाण जरी जास्त असले तरी उन्हाळ्यात पाणीटंचाई भासते. तसेच, दुष्काळग्रस्त परिस्थिती निर्माण होते.

त्यामुळे या गावातील बंधाऱ्यांचे काम मिशन भगीरथ प्रयास अंतर्गत घेण्यात आले. सदर कामाची अंदाजपत्रकीय रक्कम अकुशल एक लाख ५५ हजार, तर कुशल आठ लाख अशी एकूण नऊ लाख ५५ हजार इतकी आहे.

सदर काम पूर्ण झाले असून, आतापर्यंत झालेल्या थोड्याफार पावसामुळे पाणी साचले आहे. या साचलेल्या पाण्यामुळे सार्वजनिक विहिरींमध्ये पाणीपातळीत वाढ होऊन गावातील होणारे स्थलांतर थांबविण्यास मदत होईल.

"जिल्हा दुष्काळमुक्त करण्यासाठी मिशन भगीरथ प्रयास मोहीम हाती घेतली आहे. यात जिल्ह्यात सिमेंट बंधाऱ्यांचे कामे हाती घेतली. यातील काही कामे पूर्ण झाल्याने पावसाळ्यात यात पाणी साचण्यास सुरवात झाली आहे. यामुळे गावातील टंचाई कमी होईल."

- आशिमा मित्तल, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद

Completed embankment work at Gandole village in Dindori taluka
Shasan Aplya Dari Citylinc Bus : ‘शासन आपल्या दारी’ साठी 75 बस

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.