नाशिक : प्रभाग सात व आठमधील डीकेनगर, नरसिंहनगर परिसरात गेल्या काही दिवसांपासून पाण्याची तीव्र टंचाई जाणवत असल्याने नागरिकांना मोठ्या अडचणीला सामोरे जावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर माजी नगरसेविका स्वाती भामरे यांच्या नेतृत्वाखाली महापालिका आयुक्त डॉ. चंद्रकांत फुलकुंडवार यांना निवेदन देऊन पाणीपुरवठा सुरळीत करण्याची मागणी करण्यात आली. (Water Crisis Citizens are shocked by water shortage in Gangapur Road area Nashik latest marathi news)
प्रभाग सात व आठमधील डीकेनगर, श्रमिक कॉलनी, सिद्धिविनायक कॉलनी, विनय कॉलनी, श्रीरंगनगर, नक्षत्र कॉलनी तसेच नरसिंहनगर, सावरकरनगर आणि आकाशवाणी केंद्र परिसरात गेल्या चार दिवसांपासून कमी दाबाने आणि अपुरा पाणीपुरवठा होत आहे.
या भागात पाणीपुरवठ्याचे अन्य कोणतेही साधने उपलब्ध नसल्याने नागरिकांना मोठ्या संकटांना सामोरे जावे लागत असून, बुधवारी (ता. २४) संयमाचा बांध फुटला. माजी नगरसेविका स्वाती भामरे यांनी परिसरातील शंभराहून अधिक नागरिकांनी आयुक्तांची भेट घेऊन निवेदन दिले. परिसरात कोणतेही तांत्रिक कारण नसताना अचानक अघोषित पाणी कपात का करण्यात आली, यासंदर्भात जाब विचारण्यात आला.
आकाशवाणी टॉवर परिसरातील शिवसत्य क्रीडा मंडळाच्या मैदानावर महापालिकेने जलकुंभ प्रस्तावित केलेला आहे, तो तातडीने उभारावा अशी मागणी निवेदनात करण्यात आली. पाणीप्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन आयुक्तांनी दिले. पाणीटंचाई दूर होईपर्यंत सर्व परिसरात टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा, अशी मागणीही सौ. भामरे यांनी केली.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.