Nashik Rain Crisis : ऑगस्ट संपत आला तरी देखील तालुक्यासह कसमादेत समाधानकारक पाऊस झालेला नाही. पावसाने पाठ फिरविल्याने दुष्काळाचे ढग अधिक गडद होत आहेत.
मालेगाव शहरासह कसमादेतील लहान मोठ्या ५२ पाणीपुरवठा योजनांना वरदान ठरलेले चणकापूर धरण ८७ टक्के भरत आले आहे. धरणातील उपलब्ध पाणी ३१ जुलैपर्यंत पुरवावे लागणार असल्याने या योजनांना पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे.
पावसाअभावी पाणीपुरवठा योजना देखील संकटात आल्या आहेत. मालेगाव शहराला दिवसाआड होणारा पाणीपुरवठा आता दोन दिवसाआड करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. (Water crisis continues despite filling of Chankapur 52 schemes of Kasmade including Malegaon in crisis nashik)
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
मालेगाव शहराला चणकापूर व गिरणा या दोन्ही धरणातून पाणीपुरवठा केला जातो. चणकापूर व पुनंद ही दोन्ही धरणे साधारणत: ऑगस्टमध्ये भरतात. त्यापूर्वी दोन्ही धरणातून मोठ्या प्रमाणावर विसर्ग होऊन गिरणा नदी पात्रातून पाणी गिरणा धरणात जाते.
हरणबारी ओव्हरफ्लो झाले असले तरी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस नसल्याने मोसमनदीला पूरपाणी आलेले नाही. परिणामी यावर्षी गिरणा धरण आतापर्यंत जेमतेम ३७ टक्के भरले आहे. त्यामुळे गिरणा धरणातून शहराला मर्यादीत पाणी उचलावे लागणार आहे.
चणकापूर धरण ८७ टक्के भरले असले तरी देखील यावर्षी धरणातून पुरेसा विसर्ग झालेला नाही. पंधरा दिवसांपूर्वी धरणातून काही प्रमाणात विसर्ग झाला. गिरणा नदीला आलेल्या पूरपाण्यातून ठेंगोडा उंचावणीच्या बंधाऱ्यात पाणी साचले.
डाव्या कालव्याद्वारे हे पाणी तळवाडे तलावात पोहोचले. तळवाडे तलावात ६८ दशलक्ष घनफूट जलसाठा असून कालव्याचे पाणी बंद झाल्याने उपलब्ध पाणी काटकसरीने वापरावे लागणार आहे.
यातूनच महापालिका प्रशासनाने दोन दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे. मालेगाव वगळता कसमादेतील इतर लहान- मोठ्या पाणीपुरवठा योजनांनाही पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे.
आगामी सप्टेंबर महिना महत्वाचा असून या कालावधीत मुबलक पाऊस झाल्यास किमान पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागू शकेल.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
पूरपाणी नसल्याने संकटात भर
दरवर्षी कसमादेतील धरणे भरण्याच्या आधी (१५ ऑगस्टपर्यंत) किंवा भरल्यानंतर मोठ्या प्रमाणावर धरणांमधून विसर्ग होतो. गिरणा व मोसम या दोन्ही नद्या किमान दोन महिने वाहतात. यातून गिरणा धरण भरण्यास मदत होते.
पूरपाण्यामुळे गिरणा उजवा व डावा हे दोन्ही कालवे किमान तीन महिने वाहतात. याचा मालेगावसह लहान-मोठ्या ५२ पाणीपुरवठा योजनांसह लाभ क्षेत्रातील शेतीला फायदा होता.
आवर्तन लवकर घ्यावे लागणार
गिरणा नदीचे पूरपाणी संपले तरी देखील ठेंगोडा उंचावणीच्या बंधाऱ्यात साचलेले पाणी तळवाडे तलावासह अनेक पाणीपुरवठा योजनांना दिलासा देते. गेल्या चार वर्षापासून चणकापूरमधून पहिले आवर्तन घेण्यास फेब्रुवारी महिना उजाडला होता.
यावर्षी पाऊस रुसला तर धरणातून नवे आर्वतन लवकर घ्यावे लागेल. एकूणच दुष्काळी परिस्थितीबरोबरच पाणीटंचाईचा सामना देखील करावा लागणार आहे. पाऊस पडावा यासाठी शेतकऱ्यांसह सर्वच घटक तसेच महसूल प्रशासनाचे अधिकारी आस लावून बसले आहे.
धरणाचे नाव - साठवण क्षमता- आजचा साठा - टक्केवारी
चणकापूर - २४२७ - २१०१ - ८७
हरणबारी - ११६६- ११६६- १००
केळझर - ५७२- ५७२ - १००
नाग्यासाक्या - ३९७ - ००- ००
गिरणा - १८५०० - ६८८५ - ३७
पुनंद - १३०६ - ८७८- ६७
माणिकपुंज - ३३५ - ०० - ००
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.