Water Crisis: अपुऱ्या पावसामुळे लोकप्रतिनिधींची कसोटी! निवडणुकीच्या तोंडावर पाणीटंचाई गाजणार

water scarcity
water scarcityesakal
Updated on

Water Crisis : जिल्ह्यातील धरणांमध्ये वर्षभर पुरेल इतका पाणीसाठा उपलब्ध असला तरी अपुऱ्या पावसामुळे मराठवाड्यातील धरणे तहानलेली असल्याने पाण्याची तूट भरून काढण्यासाठी नाशिक जिल्ह्यातील धरणांमधून पाणी सोडावे लागणार आहे.

त्यापूर्वी जायकवाडी धरणात पाण्याची तूट दाखविण्यासाठी कालव्यांना पाणी सोडले जात असल्याने पावसाळ्याचा सीझन पूर्ण होत नाही तोच पाण्याचे राजकारण सुरु झाले आहे.

मराठवाड्यात पाण्यासंदर्भात अधिक संवेदनशीलपणा दिसून येत असल्याने निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नाशिक मधील लोकप्रतिनिधींची देखील कसोटी लागणार आहे. (Water Crisis Due to insufficient rain people representatives tested Water shortage will prevail in face of elections nashik)

नाशिक शहराला गंगापूर, दारणा आणि मुकणे धरणातून पाणी पुरवठा होतो. या तिन्ही धरणात पुरेसा पाणीसाठा आहे. ५५ टक्के शहराला गंगापूर धरणातून पुरवठा होतो.

सद्य:स्थितीत गंगापूर धरण समूहात समाविष्ट असलेली काश्यपी, गौतमी व आळंदी धरणांमध्ये एकूण ९४ टक्के पाणीसाठा आहे. गंगापूर धरणातून पाणी न सोडल्यास वर्षभर पुरेल इतका हा पाणीसाठा आहे.

यंदा पावसाचे प्रमाण कमी असले तरी वर्षभर पुरेल इतके पाणी नाशिक जिल्ह्यातील धरणांमध्ये आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याची चिंता नाही. परंतु मराठवाड्याला पाणी पुरवठा करणाऱ्या जायकवाडी धरणात ३७ टक्क्यांपेक्षा कमी पाणीसाठा आहे.

पाण्याचे नियोजन करण्यासंदर्भात नियुक्त मेंढीगिरी समितीने ३७ टक्क्यांपेक्षा कमी पाणीसाठा असेल तर नाशिक व नगर जिल्ह्यातील धरणांतून पाणी सोडावे असे म्हटले आहे.

सद्यःस्थितीमध्ये मराठवाड्यातील कालव्यांना जायकवाडी मधून पाणी सोडले जात असल्याने धरणातील पाण्याची टक्केवारी कमी होऊन ३५ टक्क्यांपर्यंत किंवा त्यापेक्षा कमी आणली जात आहे. जेणेकरून नाशिक व नगर जिल्ह्यातील धरणांमधून समितीच्या अहवालानुसार पाणी सोडणे भाग पडेल.

गोदावरी पाटबंधारे विकास महामंडळासह तेथील लोकप्रतिनिधी वरच्या धरणांमधील पाण्यासाठी आग्रही असतात. त्यांच्या दबावामुळे पाणी सोडले जाते. त्यामुळे नाशिक मधील लोकप्रतिनिधींना देखील येत्या काळात आक्रमक भूमिका घ्यावी लागणार आहे.

अन्यथा समितीच्या अहवालातील शिफारशी दाखवून नाशिकचे पाणी पळविण्याची भीती अधिक आहे. मेंढीगिरी समितीने पाण्याचे टप्पे ठरवून दिले आहेत.

पहिल्या टप्प्यात जायकवाडी धरणामध्ये ३७ टक्के पाणीसाठा असल्यास गंगापूर धरणात ६१ टक्के तर दारणा धरण समूहात ५४ टक्के पाणी साठा ठेवावा. दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यात जायकवाडी धरणात ५४ टक्के ते ६५ टक्के पाणीसाठा असेल तर गंगापूर धरण समूहात ७४ ते ८२ टक्के पाणी साठा ठेवावा.

पुढील वर्षात लोकसभा व विधानसभेच्या निवडणुका आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या देखील निवडणुका होण्याची शक्यता आहे. या परिस्थितीत लोकप्रतिनिधींना नाशिकच्या पाण्यासंदर्भात भूमिका स्पष्ट करावी लागणार आहे.

वरच्या धरणांमधून पाणी सोडण्याची मागणी छत्रपती संभाजीनगरमध्ये जोर धरू लागली आहे. नाशिकमध्ये अद्यापही पाण्या संदर्भात एक शब्द देखील काढला जात नाही.

water scarcity
Jalgaon Rain News : बोदवड, जामनेरला परतीच्या पावसाने झोडपले! बोरी, खडका नदीला पूर; सात्रीचा संपर्क तुटला

२५ लाख लोकसंख्येनुसार पाणी

नाशिक महापालिकेने जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाणी मागणीचा प्रस्ताव सादर केला आहे. त्यानुसार गंगापूर धरणातून ४ हजार ४००, दारणा धरणातून शंभर तर मुकणे धरणातून १ हजार ७०० दशलक्ष असे एकूण ६ हजार १०० दशलक्ष घनफूट पाण्याची मागणी आहे.

वॉटर ऑडिट नुसार शहराची लोकसंख्या बावीस लाख ३४ हजार आहे. तर तरल लोकसंख्या अडीच लाख आहे. जवळपास २५ लाख लोकसंख्या असल्याने त्यानुसार पाण्याचे आरक्षण ठेवावे लागणार आहे.

धरणातील पाण्याची सद्य:स्थिती

गंगापूर धरण समूह

धरण उपयुक्त साठा (दलघफुात) टक्केवारी

गंगापूर ५४६७ ९७

काश्यपी १६४५ ८९

गौतमी १५८३ ८५

आळंदी ८१६ १००

-------------------------------------------------

एकूण ९५११ ९४

-------------------------------------------------

मुकणे ६३०६ ८७

दारणा ७१४९ १००

water scarcity
Rain News : कासारसिरसी महसूल मंडळात मुसळधार पाऊस,उस्तुरी ओढ्याला पूर, सोयाबीनला जिवदान

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.