Water Crisis : पावसाने ओढ दिल्याने शहराला मुख्यत्वे पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणात अवघे ७८ टक्के पाणीसाठा असून त्यातही समन्यायी पाणीवाटपाचे भूत मानगुटीवर आहे.
जायकवाडीमध्ये ६५ टक्क्यांपेक्षा कमी साठा असल्यास वरच्या धरणांमधून पाणी सोडावे लागणार असल्याने पाऊस न पडल्यास शेतीवर संकट आहेच. त्याशिवाय पिण्याच्या पाण्यावरदेखील संकट ओढवणार आहे.
त्यामुळे शेतकऱ्यांबरोबरच शहरी भागातील नोकरदार वर्गाला पाण्याच्या चिंतेने घेरले आहे. (Water Crisis equitable water distribution Water scarcity crisis deepens 78 percent reserves in Dam Group nashik)
यंदा पावसाला विलंब झाला आहे. जूनअखेर तुरळक पावसाला सुरवात झाली. जुलैत राज्यभर मॉन्सून बरसत असताना नाशिकमध्ये मात्र दमदार पाऊस झाला नाही. त्यामुळे धरणांचे आकडे कागदावर फुगलेले दिसतं असले तरी प्रत्यक्षात पाण्याचे संकट कायम आहे.
शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर, दारणा व मुकणे धरणात सुरवातीच्या काळात पुरेसा पाणीसाठा निर्माण झाला. त्यानंतर मात्र पावसाने ओढ दिल्याने धरणातील पाणी पातळी घसरत आहे.
सध्या गंगापूर धरणात ६११ मीटरपर्यंत पाण्याची पातळी स्थिरावली आहे. ऑगस्टमध्ये पावसाची शक्यता मावळली आहे. सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात पावसाला पुन्हा सुरवात होईल व बॅकलॉग भरू निघेल, असे हवामान विभाग सांगतो.
परंतु सद्यःस्थितीत पाणीटंचाईने चिंता निर्माण केली आहे. ग्रामीण भागात दुबार पेरणीचे संकट आहे, तर शहरात पिण्याच्या पाण्याची चिंता आहे.
‘आधीच उल्हास त्यात फाल्गुन’
गंगापूर, मुकणे व दारणा धरणात आधीचं पुरेसा पाणीसाठा नसताना आता त्यात समन्यायी पाणीवाटप नियमाने चिंता निर्माण केली आहे.
राज्य शासनाच्या मेंढीगिरी समितीच्या समन्यायी पाणीवाटप धोरणात जायकवाडी धरण ६५ टक्के न भरल्यास वरच्या म्हणजे गंगापूर, दारणा, मुळा, प्रवरा, पालखेड, आळंदी व निळवंडे धरणातून पाणी सोडावे, असे २०१३ मध्ये प्रसिद्ध केलेल्या अहवालात म्हटले आहे.
समितीच्या अहवालानुसार नाशिक व नगर जिल्ह्यातील धरणांमधून पाणी सोडावे लागणार असल्याने सुलतानी संकटाने चिंता निर्माण केली आहे.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या
धरणांतील पाण्याची स्थिती
गंगापूर धरण समूह
धरण क्षमता (दशलक्ष घनफूट) साठा (कंसात टक्केवारी)
गंगापूर ५६३० ५१४० (९१)
कश्यपी १८५२ ११४६ (६१)
गौतमी १८६८ १०९१ (५८.४०)
-------------------------------------------------------------
एकूण ९३५० ६८५३ (७८.९०)
--------------------------------------------------------------
दारणा ७१४९ ६८५३ (९५.८६)
मुकणे ७२३९ ५६३६ (७७.८६)
---------------------------------------------------------------
पाण्याचे आरक्षण (दशलक्ष घनफूट)
धरण आरक्षण
गंगापूर ४४००
दारणा १००
मुकणे १६००
-------------------------------------
६१००
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.