Bail Pola 2023: पाजण्यासाठी नाही, तर बैल धुण्यासाठी कुठून आणणार पाणी? बैलपोळा सणावर दुष्काळाचे सावट

Shops decorated with bullpen paraphernalia on Tuesdays in the weekly bazaar
Shops decorated with bullpen paraphernalia on Tuesdays in the weekly bazaaresakal
Updated on

Bail Pola 2023 : तालुक्याच्या उत्तर पूर्व भागात जनावरांना पिण्यासाठी पाणी मिळणे दुरापास्त झाले आहे. पोळ्यासाठी बैल कुठे धुवावीत, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.

मंगळवारी (ता. १२) येथील आठवडेबाजार बैलपोळ्याच्या साहित्याने फुलला. मात्र, खरेदीकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरवल्याचे दिसले. (water crisis for bulll wash Drought on Bail Pola festival 2023 nashik)

शहरात मंगळवारी भरलेल्या आठवडे बाजारात पोळ्यासाठी विविध साहित्याची दुकाने थायली होती. मोलाची साथ देणाऱ्या पशुधनाचा बैलांचा पोळा हा सण साध्या प्रमाणात साजरा करण्याच्या मनसुब्यातून खरेदीदारांची गर्दी जेमतेम दिसली.

पोळा सण बळीराजासाठी सर्वांत महत्त्वाचा सण समजला जातो. अतिशय जिव्हाळ्याचा, पारंपरिक अन् लोकसंस्कृतीचा वारसा असलेला हा सण यंदा महागाईसोबतच दुष्काळाच्या सावटाखाली दबला आहे.

मागील वर्षाच्या तुलनेत यंदा महागाई वाढल्याने बैलांच्या सजावटीसाठी लागणाऱ्या साहित्यांचे दर वाढले असले, तरी शेतकरी गरजेपुरती आवश्यक खरेदी करीत असल्याचे दिसून आले.

शेतकरी पोळा सणाला बैलांसाठी नवीन साहित्य खरेदी करून त्यांची सजावट करतात. शेतकऱ्यांनी महागाईमुळे जुनेच साहित्य वापरण्याचा निर्णय घेतल्याने यंदा बाजारात थंड प्रतिसाद मिळाल्याचे दिसले.

येथील आठवडे बाजारात विंचूर चौफुली, शनिपटांगण हा संपूर्ण परिसर बैलपोळ्याच्या साहित्याने सजला होता. मात्र, खरेदीसाठी शेतकऱ्यांचा प्रतिसाद अत्यल्प जाणवला.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Shops decorated with bullpen paraphernalia on Tuesdays in the weekly bazaar
Bail Pola Festival 2023 : शेतकऱ्यांच्या बैलपोळ्याला महागाईचा चटका! साहित्याच्या दरात 20 टक्क्यांनी वाढ

यंदा तालुक्यात जूनपासून गायब झालेल्या पावसामुळे खरीप पिकांची स्थिती नाजूक बनली आहे. खरीप हंगामात केलेला खर्च पदरात पडणे कठीण आहे. त्यातच रब्बीचेही चित्र धुसर असल्याने शेतकरी चिंतेत असून, ही चिंता पोळा सणावर दिसत आहे.

मागील काही वर्षांपासून शेतीकामासाठी यांत्रिकीकरणाचा उपयोग वाढल्याने बैलांची संख्या झपाट्याने कमी होऊन सणाची व्यापकताही कमी झाली. त्यामुळे साजश्रृंगाराच्या सहित्याला परिणामी शेतकऱ्यांकडून अत्यल्प प्रतिसाद मिळत आहे.

येवल्याच्या आठवडे बाजारात वेसण ४० ते ५० रुपये जोड, कासरा ८० ते २०० रुपये, मोरखी ५० ते १२५ रुपये, कवडी गेठा १०० रुपये, गोंडा ५० ते १५० रुपयांप्रमाणे किमती असल्याचे पाहवयास मिळाले.

घागरमाळ जोडी, भोरकडी, झुली, मोरक्या जोड याच्या किमतीतही काही प्रमाणात वाढ जाणवली. बैल असलेले शेतकरी खरेदी करीत असले, तरी नेहमीच्या तुलनेत अत्यल्प प्रमाण असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.

दुष्काळाचे सावट असले तरी बैल आमचा शेतीचा सोबती आहे. त्यामुळे हलकाफुलका सण साजरा करणारच, अशा प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी दिल्या.

Shops decorated with bullpen paraphernalia on Tuesdays in the weekly bazaar
Pola 2023: सर्जा राजा रं, यंदा तुला कसा सजवू रं..! बाजारपेठ फुलली, पण दुष्काळामुळे सजावटीच्या वस्तूंना मागणी नाही

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.