Water Crisis: विजयलक्ष्मी रो हाऊसेसमध्ये पाण्यासाठी वणवण! स्वखर्चाने 13 टँकरद्वारे पाणी, 39 कुटुंबांचा प्रश्न

Women filling water by private tanker.
Women filling water by private tanker.esakal
Updated on

Water Crisis : पाथर्डी फाटा भागातील विजय लक्ष्मी रो हाऊसेस प्रकल्पात सहा महिन्यांपूर्वी लाखोंचे कर्ज काढून रो हाऊस घेतलेल्या ३९ कुटुंबांची ऐन उन्हाळ्यात पाण्यासाठी भटकंती सुरू झाली आहे.

महापालिकेचे पाणीच नसल्याने कपडे धुण्यासाठी अक्षरशः नातलगांकडे जाण्याची वेळ आली आहे. मनपा आयुक्तांनी विशेष बाब म्हणून पाण्याची लाइन या भागात टाकण्याची व्यवस्था करून देण्याची मागणी येथील दोनशे नागरिकांनी केली आहे.

अन्यथा थेट महापालिकेवर हंडा मोर्चा काढण्याचा इशारा दिला आहे. (water crisis in Vijayalakshmi row houses Water through 13 tankers at own expense 39 families issue nashik news)

प्रभाग क्रमांक ३१ मधील धोंगडे पाटीलनगर येथे रो हाऊसेस आहेत. संबंधित बिल्डरने या ठिकाणी सहा बोअरवेलची व्यवस्था करून दिली होती. मात्र सहा महिन्यांपूर्वी सर्वच्या सर्व बोअरवेल कोरडेठाक झाले.

त्यामुळे दिवसाआड तीन घरे मिळून एक असे तेरा टँकर स्वखर्चाने मागवीत येथील रहिवासी आपली तहान भागवत आहेत. मात्र या टँकरच्या क्षारयुक्त पाण्यामुळे अनेकांना किडनी स्टोनचा त्रास सुरू झाला आहे.

तर लहान मुलांना गालफुगी, संपूर्ण अंगावर पुरळ येणे असे आजार उद्भवले आहे. अनेकांना थंडी तापाने ग्रासले आहे. १९ नोव्हेंबर २०२२ ला विभागीय अधिकारी यांना जलवाहिनी टाकून पाणी मिळावे यासाठी रहिवाशांनी निवेदन दिले होते.

मात्र त्यावर कोणतीही कार्यवाही झाली नाही. सुमारे ७०० मीटर अंतरावर असलेल्या एकता ग्रीन व्हॅलीपर्यंत महापालिकेची पाण्याची लाइन आली आहे. काही दिवसांपूर्वी येथील सर्व कुटुंबीय मनपा अधिकाऱ्यांना भेटले असता त्यांनी तातडीने सिडको पाणीपुरवठा विभागाचे अभियंता यांना याबाबत आराखडा तयार करण्याची सूचना करत पर्यायी व्यवस्था करण्याचे निर्देश दिले.

मात्र याकडेही दुर्लक्ष झाल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. पाण्याची लाइन टाकून हा प्रश्न मार्गी लावावा अन्यथा हंडा मोर्चा काढण्यात येईल असा इशारा रितेश शेलार, सचिन वाजे, किरण पाटील, शुभम डांगे, माधुरी पाटील, माधव मोरे, मयूरी वाजे, ललिता खोडे, अतुल पाटील, शरद केदारे, यश मिश्रा, विशाल झोपे, रविकिरण कुशवाह, उदय महाजन, किरण पाटील, विकास परमार, अमोल देशमुख आदींनी दिला आहे.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

Women filling water by private tanker.
Nandurbar: साहेब, आमची दऱ्याखोऱ्यांतील पायपीट थांबवा हो! नवीन महसूली गाव कोटीनगर स्वतंत्र रेशन दुकानाची मागणी

"ऐन उन्हाळ्यात पाण्यासाठी वणवण होत आहे. सर्व कामगार वर्ग असल्याने विकतचे पाणी घ्यावे लागत असल्याने कुटुंबाचे आर्थिक गणित बिघडले आहे. महापालिका आयुक्तांनी यात लक्ष घालून पाण्याची लाइन टाकून प्रश्न सोडवावा." -अतुल पाटील, रहिवासी

"उन्हातान्हात पाण्यासाठी वन वन फिरण्याची वेळ आली आहे. घरातील लहान मुलांना क्षारयुक्त पाण्यामुळे विविध आजार उद्भवत आहे. लवकर प्रश्न सुटला नाही तर नाइलाजाने हंडा मोर्चा काढावा लागेल." -ललिता खोडे, गृहिणी

जलवाहिनी टाकण्यासाठी आरखडा : पगारे

कोणतेही घरे बांधताना नागरिकांकडून वीज, पाणी ड्रेनेज या मूलभूत सुविधांसाठी बांधकाम व्यावसायिकाकडून अतिरिक्त रक्कम घेतली जाते. त्यामुळे या सुविधा उपलब्ध करून देण्याचे काम बांधकाम व्यावसायिकाचेच असते असा प्रघात आहे.

बांधकाम व्यावसायिकाकडून पाणीपुरवठा विभागाला अर्ज, पत्रव्यवहार करण्यात आला असला तरीही सदर भागात जलवाहिनी टाकण्यासाठी कोणतीही हालचाल नाही. त्यामुळे संबंधित बांधकाम व्यावसायिकाबाबत देखील आता रोष वाढत आहे.

परिसरात जलवाहिनी टाकण्यासाठी आरखडा बनविला असून निधी उपलब्ध झाल्या नंतर जलवाहिनी टाकण्याचे काम सुरू होईल. अशी माहिती पाणी पुरवठा अधिकारी गोकुळ पगारे यांनी दिली

Women filling water by private tanker.
Nashik News : मालेगाव पोलिस उपविभागात 7 नवीन वाहने

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.