Water Crisis : तालुक्यातील धरण पाणीपातळीत झपाट्याने घट; मॉन्सूनपूर्व नियोजनाची गरज

Archive photo of Dahegaon Dam which supplies water to Nandgaon city.
Archive photo of Dahegaon Dam which supplies water to Nandgaon city.esaka
Updated on

Water Crisis : वाढत्या उष्मामुळे शहर व तालुक्यात पाण्याची मागणी वाढू लागली आहे. बाष्पीभवनमुळे गेल्यावर्षी तुडुंब भरलेल्या तालुक्यातील धरणातील पाण्याची पातळी झपाट्याने कमी होऊ लागली आहे. (Water Crisis Rapid decline in dam water level in nandgaon taluka Need for pre monsoon planning nashik news)

गिरणा, माणिकपुंज, दहेगाव, नाग्यासाक्या आदी धरणातील पाण्याच्या बाष्पाचे प्रमाण दुपटीने वाढले आहे. सध्याचा पाणीसाठा जरी मुबलक असला तरी धरणातील गाळ, व मृतसाठा वजा करता उपयुक्त पाणीसाठा मॉन्सून सुरु होईपर्यंत पुरविण्याची आवश्यकता आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार पाऊल लांबण्याची शक्यता असल्याने मान्सूनपूर्व नियोजनाची गरज आहे.

तालुक्यात उन्हाचा पारा ३६ ते ३८ अंश सेल्सिअस राहत असल्याने तालुक्यातील धरणातील पाण्याची पातळी घटू लागली आहे. २००९ मध्ये मुसळधार पर्जन्यवृष्टी झाल्याने दहेगाव शंभर टक्के भरले होते.

त्यानंतर अकरा वर्षाच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर दहेगाव धरण लागोपाठ चारवेळेस भरत आलेले आहे. त्यामुळे शहर व तालुक्याला पाणी टंचाईच्या झळा खूप कमी बसल्या आहे. ७३ दक्षलक्ष घनफुट पाणीसाठ्याची क्षमता असलेल्या दहेगाव धरणातून शहराला पाणी पुरवठा होतो.

तर गिरणा धरणातील मिळणारे पाण्याचे आवर्तन अनियमित मिळत असून त्यामुळे सगळी मदार दहेगाव धरणाच्या पाण्यावर आहे. दहेगाव धरणातील पाण्याची पातळी मोजण्यासाठी किती व्हाल्व्ह पाण्यात बुडाले आहे.

यावरून किती महिने पाणी पुरेल याचा ठोकताळा जुन्या कर्मचाऱ्यांकडून मांडला जातो. तीच पद्धत परंपरेने अलीकडच्या काळात मान्य झाली आहे. जलपातळी मोजण्याची पट्टी देखील येथे नसल्याने पर्याय म्हणून धरणातल्या उभ्या पाइपवर रंगविलेल्या फूटपट्टीवरील आकडेवारी सध्या धरणातले पाणी मोजण्याचा शास्त्रीय आधार आहे.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

Archive photo of Dahegaon Dam which supplies water to Nandgaon city.
Dr. Bharati Pawar : शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी जागृत व्हा : डॉ. भारती पवार

पाइपलाइनवर नदीपात्र ते वरची पातळी येथपर्यंत, चार व्हाल्व्ह आहेत. ते सगळे बुडाले तर धरण क्षमेतेने भरले असल्याचा निष्कर्ष काढण्यात येतो. धरणाची मूळ क्षमता ६९ दक्षलक्ष घनफूट असून जिवंत पाणीसाठा सुमारे ५९ दशलक्ष घनफूट असल्याचे मानले जाते.

आजमितीस तीन व्हाल्व्ह पाण्यात बुडाले असून पुढील आवर्तनानंतर लवकरच तिसरा व्हाल्व्ह उघडा पडण्याची शक्यता आहे. सद्य:स्थितीमध्ये धरणात सुमारे ३० ते ३२ दक्षलक्ष घनफूट पाणी आहे. असा ‘व्हाल्व्ह’ निष्कर्ष असला तरी उपलब्ध

आकडेवारीतून मृत साठा वगळणे गरजेचे आहे. महिन्याला पिण्याच्या पाण्यासाठी सुमारे ५ ते ६ दक्षलक्ष घनफूट पाणी सोडले जाते. म्हणजे चार महिने पुरेल एवढा जलसाठा आहे असे मानले तरी ही जलपातळी खाली गेल्यावर गढूळ पाण्याचा सामना करावा लागेल.

दहेगावच्या पाणलोट क्षेत्रात नेहमी उशिराने पाऊस पडतो. मॉन्सून लांबला तर नांदगावला गिरणा धरणाच्या आवर्तनाची वाट बघणे क्रमप्राप्त ठरणार आहे.

Archive photo of Dahegaon Dam which supplies water to Nandgaon city.
Nandurbar: निःस्वार्थपणे तहानलेल्यांना तृष्णा भागविण्याचे कार्य; पाटील यांची 10 वर्षांपासून स्वखर्चाने पाणपोई

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.